Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


जाणून घ्या या आठवड्याचे राशीभविष्य


Main News

मेष - आपला राशिस्वामी भाग्यस्थानात आणि एकूण ग्रहमान आपल्याला बऱ्याच अंशी अनुकूल आहे. कोणत्याही क्षेत्रात अरेरावी किंवा जोरजबरदस्ती न करता व्यवहार पूर्णतेस न्या. आर्थिक व्यवहार दमदार होतील. विरोधकांची धार कमी होईल. आरोग्य प्रश्नात सुधारणा होईल. नोकरदारांना सध्या अंग झाडून काम करावे लागणार आहे. साहित्य क्षेत्रात असणाऱ्यांना व्यासपीठ गाजवता येईल. क्रीडा क्षेत्रातून चांगले नाव राहील. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात आनंदाचे क्षण राहतील. वैवाहिक जोडीदाराला मिळणाऱ्या मानसन्मानाच्या आनंदात आपणही सहभागी व्हा.

वृषभ - कोणालाही न दुखावता गोड बोलून कामे करण्यावर भर द्या. काहीसा विरोध वा अडथळ्यांची शर्यत राहील, पण ते पार करणे सहज जमणार आहे. कामाचा व्याप वाढता असला तरी वाढती मानसिक शक्ती त्याला पुरेशी राहील. आरोग्य प्रश्नात वेळीच वाट काढा. कोणतेही व्यवहार चुकणार नाहीत याची काळजी घ्या. सतर्कतेने केलेल्या व्यवहारातून मोठी आर्थिक प्रगती गाठू शकणार आहात. नवे व्यापार व व्यापारी संबंध यांना काही दिवस स्थगिती दिलेली बरी.

मिथुन - दिवाळीतला व्यापार चांगला हाती लागू शकेल. आपले विक्री कौशल्य चांगले कामाला येईल. दिवाळीच्या दरम्यानचा हा सप्ताह आपल्याला आर्थिकदृष्ट्या मोठी उंची गाठून देऊ शकणार आहे. घरातून मिळणारा ज्येष्ठांचा आशीर्वाद, नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे सहकार्य, येणारी मोठी आवक आणि सुचणाऱ्या नव्या कल्पना यातून आपली वाटचाल दिमाखदार होत राहणार आहे. कामाचा ताण जाणून घेऊ नका. त्यातूनही आपल्याला पुढे खूप चांगले दिवस येणार आहेत. बस्तान चांगले बसेल. नोकरी-व्यवसायाचे गणित सुटेल.

कर्क - किरकोळ विरोध किंवा मनाविरुद्धच्या लहानसहान गोष्टी यातून मन लगेच खट्टू होणे शक्य. व्यवहार मनासारखे होणार असले तरी आपली मानसिकता सांभाळणे हेच आपल्यासाठी महत्त्वाचे ठरेल. बदललेले वातावरण, मिळालेले सहकार्य, आतून येणाऱ्या चांगल्या कल्पना आणि  प्रत्यक्षातली वस्तुस्थिती यांचा मेळ घालता घालता आपल्याला थकवा जाणवेलही, पण आर्थिक गणित आणि यशाची कमान मोठी होत जाणार आहे हे खरे. मुलांच्या दृष्टीने एखादा प्रश्न ‘जैसे थे’ राहाणे शक्य.

सिंह - आपल्या राशीतला राहू, पंचमातला मंगळ आणि एकंदर ग्रहस्थिती हे आपले कौशल्य पूर्ण सिद्ध द्यायला मदत करणारे ठरणार आहेत. राजकीय वाटचाल असो किंवा सामाजिक उपक्रमातला सहभाग, नोकरी-व्यवसायातली मोठी कामे असो की कौटुंबिकदृष्ट्या ठरत असलेले शुभकार्य, स्वत:च्या कामाचा वेगळा ठसा आपण उमटवू शकणार आहात. यशही त्यामानाने मोठे करू शकणार आहात. नोकरदारांनाही सध्याचा कामाचा उपयोग आगामी काळातील बढतीसाठी उपयोगी पडणार आहे.

कन्या - आपल्या आवडीच्या क्षेत्रात मिळालेले काम आणि एखादा मदतीला आलेला जुना सहकारी यातून दिवाळीच्या धावपळीत मोठी मजा येणार आहे. कामाचे यशही आपल्या खात्यात जमा होणार आहे. आर्थिक स्तर अपेक्षेएवढा गाठता येईल. नवी नोकरी किंवा नवा व्यवसाय लाभदायक ठरणार आहे. स्थावराच्या व्यवहारात घाई करू नका. नवे वाहन खरेदी करताना पुरेशी काळजी घ्या. दिवाळीची खरेदी करतानाही लहानमोठय़ा फसवणुकीपासून स्वत:ला दूर ठेवा. सध्या बरेचसे प्रसंग मनासारखे घडणार आहेत. त्यातून दिवाळीचा आनंद द्विगुणित होणार आहे.

 तूळ - सप्ताहातली सर्वोत्तम राशी असे आपले वर्णन करता येईल. आपल्या राशीत असलेले रवी, बुध आणि एकूण ग्रहस्थिती हे आपण ज्या कोणत्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात आपली मान उंचावणारी ठरणार आहे. व्यापारी वारे अनुकूल ठरणार आहेत. बांधलेले आडाखे, केलेली गुंतवणूक यांचा चांगला परिणाम मिळेल.  कला, साहित्य, शिक्षण, न्याय या क्षेत्रांतून स्वत:चे नाव मोठे करता येईल. वैवाहिक जीवनात थोडेफार मतभेद असले तरी त्यातून जे निष्पन्न होईल ते चांगलेच असणार आहे.

वृश्‍चिक - अकरावा आलेला गुरू आणि एकंदर ग्रहस्थिती ही आपल्याला दिवाळीचा आनंद मोठा करायला पुरेशी ठरणार आहे.  साडेसातीचा धसका मनातून काढून टाका. कोणालाही न दुखावता स्वच्छंद मनाने आणि मोकळ्या मनाने निर्णय घेत पुढे चला. आर्थिकदृष्ट्या चांगले ग्रहमान आहे. दिवाळीच्या तोंडावर असलेले हे ग्रहमान आपल्याला गतवैभव परत आणण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. बँक प्रकरणे मनासारखी होतील. वैवाहिक जीवनातही अनेक चांगल्या प्रसंगांची नोंद होईल. सासुरवाडीचा सोडवलेला एखादा प्रश्न आपली पत वाढवणारा ठरेल.

धनु - ठरवलेले अनेक प्रकल्प मार्गी लागणार आहेत. कौटुंबिक कार्य असो किंवा नोकरी- व्यवसायातली जबाबदारी असो, स्वत:ला आघाडीवर ठेवता येईल. सकारात्मक दृष्टिकोनातून आपली मान चांगलीच उंचावता येईल. पत वाढती राहील. शब्दाला मान मिळत राहील. असेल त्या क्षेत्रात आपले नाव पुढे होत राहील. आर्थिकदृष्टय़ाही आपल्यासाठी हा सप्ताह सर्वोत्तम ठरावा. अनेक अंगांनी मिळणारी अनुकूलता आपल्याला चांगलीच उपयुक्त ठरेल. वैवाहिक जीवनातही हास्याचे कारंजे उडत राहतील.

मकर - किरकोळ चुका टाळून किंवा फसवणुकीच्या शक्यता लक्षात घेऊन वाटचाल केलीत तर ही दिवाळी संस्मरणीय ठरणार आहे. सुचवलेल्या नव्या कल्पना, हाती आलेल्या नव्या व्यवसायाची वाट व मिळणारे नवे सहकारी यातून आपले व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण होत राहतील. आर्थिकदृष्टय़ा मोठा पल्ला गाठता येईल. केलेली गुंतवणूक सत्कारणी लागेल. राजकारणाचे येणारे प्रस्ताव अवश्य विचाराधीन ठेवा. सध्या आपल्याला अनेक अंगांनी अनुकूलता लाभेल, त्याचा अवश्य लाभ घ्या. वैवाहिक व कौटुंबिक जीवनातही असेच अनुकूलतेचे वारे वाहत राहतील.
 
कुंभ- दिवाळीचा आनंद लुटण्यासाठी ग्रहमान आपल्याला मदत करणारे आहे. नोकरी-व्यवसायात बऱ्याच गोष्टी मनासारख्या होतील. त्यातून व्यापार चांगला होत राहील. नोकरदारांनाही हातात मोठा पैसा मिळत राहील. घरात ठरणाऱ्या शुभ कार्याची तरतूद होईल. नवे वाहन किंवा नवीन वास्तू याचे स्वप्न पूर्ण होतानाचा आनंद लुटता येईल. आपल्या प्रत्येक क्षेत्रात आपले नाव मोठे होत राहील. एखाद्याने केलेली शाब्दिक थट्टा अगदीच मनावर घेऊ नका. त्यातून स्वत:चा आनंद हिरावून बसू नका.

मीन - कोणत्याही प्रलोभनाच्या मागे न जाता आपल्याला गरजेचे असतील त्याच प्रसंगात स्वत:ला झोकून द्या. वैवाहिक जीवनातील जोडीदार असो, भागीदारी व्यवसायातील भागीदार असो किंवा व्यापार- व्यवसायातील ग्राहकराजा असो, यांची संतुष्टता ही आपल्या पथ्यावर पडणार आहे. अपेक्षेप्रमाणे पैसाही येत राहील. व्यापार- व्यवसाय जोमात राहील. नोकरदारांनाही मनासारखे प्रसंग घडवून वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin