Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


जाणून घ्या या आठवड्याचे राशीभविष्य


Main News

मेष - धामधुमीचा सप्ताह आहे, धावपळीचा सप्ताह आहे आणि त्यातूनही आपल्याला अपेक्षित असे साध्य गाठायचे आहे. आरोग्य तक्रारींकडे दुर्लक्ष न करता आपल्याला ही धामधूम पचवायची आहे. मोठय़ा गर्दीच्या ठिकाणी स्वत:ला सावध ठेवणे गरजेचे आहे. वादविवाद, भांडणे, मतभेद यांना वेळीच पायबंद घाला. नोकरदारांनी जास्तीच्या कामाची मानसिक तयारी ठेवणे हिताचे. आर्थिकदृष्टय़ा सप्ताहात खूप काही हाती लागणार आहे. फक्त शांत स्वभावाने आणि विचारपूर्वक पावले उचलून पुढे चाला.

वृषभ - अचूक नियोजन आणि त्याप्रमाणे कार्यवाही याची गरज या सप्ताहात लागणार आहे. बऱ्याचदा आपल्याला समोरच्या व्यक्तीवर अवलंबून राहावे लागणार आहे. तरीही आपलेही असे काही करून घेता येणार आहे. व्यवसायातले ग्राहक असोत, नोकरीतले वरिष्ठ असोत, राजकारणातले विरोधक असोत किंवा कुटुंबातले सदस्य असोत सध्या सगळ्यांना समवेत घेऊनच पुढे जाणे आपल्या हिताचे ठरणार आहे. आर्थिकदृष्टय़ा काही व्यवहार दणदणीत होणार आहे. त्याचा योग्य तो विनियोग करणे गरजेचे ठरावे.

मिथुन - कामाचे गणित चांगलेच जमणार आहे. मिळणारे सहकार्य मोलाचे ठरणार आहे. आपल्या व्यक्तिगत चारित्र्यातून आपल्याला प्रगतीचा मोठा टप्पा गाठता येणार आहे. कुठेही हयगय करू नका. निर्णय घेण्यात कमी पडू नका. प्रवासाला नाही म्हणू नका. आपले मार्गदर्शक आणि हितचिंतक यांचा योग्य वेळी आशीर्वाद मिळणार आहे. आर्थिकदृष्टय़ा सप्ताहात चांगले योगदान मिळत राहील. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात अनेक कामे चांगल्या अर्थाने मार्गी लागतील.

कर्क - सामाजिक सन्मानाचे प्रसंग असो किंवा मित्राला मदत करण्याची वेळ असो, अनेक बाबतीत आपल्याला काही अनपेक्षित निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्याची चाहूल उद्या सोमवारीच लागणार आहे. घरातील कोणाचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काही वरिष्ठांच्या भेटीचे नियोजन करावे लागेल. प्रवासातून बऱ्यापैकी साध्य गाठता येईल. आरोग्यतंत्र मात्र वेळीच हाताळून बिघडवण्याच्या वाटेवरून परत आणणे गरजेचे ठरेल.

सिंह - कष्टाला पर्याय नाही हे कितीही खरे असले तरी त्याचे परिणाम लगेच मिळतील अशी अपेक्षा करू नका. नोकरी-व्यवसायात सध्या आपला वरचष्मा असला तरी निर्णय प्रत्यक्ष आपल्या मनासारखे होतीलच अशी शक्यता कमी संभवते. मात्र मोठय़ांचे सहकार्य आणि नोकरी-व्यवसायात निरनिराळ्या मार्गाने येणारी अनुकूलता यातून पुढे मात्र नक्की जाता येईल. आर्थिकदृष्टय़ा मोठे व्यवहार काही तडजोडीतून पार करता येतील. नोकरदारांना बढतीच्या दृष्टीने विशेष कामगिरी करता येईल.

कन्या - आपल्या राशीतली बुध-गुरूची जोडगोळी अजून काही दिवस टिकून राहणार आहे. त्यातूनही आपल्याला पुढचे चांगले मार्ग दिसत राहणार आहेत. कला, साहित्य, संगीत अशा विविध क्षेत्रांतून आपल्याला मागणी वाढणार आहे. कामाचे तास वाढले असले तरी त्याचा परिणामही चांगला मिळणार आहे. व्यापाऱ्यांना सुचणारा व्यापाराचा नवा फंडा चांगलाच गाजवता येणार आहे. विक्रीचे अचूक तंत्र जमणार आहे. वैवाहिक जीवनात काही चांगल्या गोष्टींची नोंद होईल. स्थावरचे व्यवहार आनंददायी ठरतील.
 
तूळ - दिवाळीतली महत्त्वाची राशी म्हणून आपला उल्लेख दर वर्षी करता येतो. कारण आपल्या राशीतूनच लक्ष्मीपूजनाची अमावस्या असते. नुकताच रवी आपल्या राशीत आलेला आहे आणि त्याचे शुभपर्व सुरू झालेले आहे. व्यापारीवर्गाला नेमकी दिशा मिळेल. खरेदी-विक्रीचे अपेक्षित आकडे गाठता येतील. नवा व्यापार चांगलाच उठाव देईल. भागीदारीतून काही वेगळे प्रश्न मार्गी लागतील. स्वत:चे हितसंबंध जपण्यासाठीचे प्रयत्न यशस्वी ठरतील. स्थावरच्या व्यवहारात गाडी पुढे जाईल.
 
वृश्‍चिक -  दिवाळी साजरी करण्यासाठी हा सप्ताह उपयुक्त ठरणार आहे. मनपसंत खरेदी होत राहील. व्यापार-व्यवसायात चांगली पावले पडत राहतील. आर्थिकदृष्टय़ा अपेक्षित असे साध्य गाठता येईल. नोकरदारांना जुन्या चुका कळल्याने त्या दुरुस्तीच्या संधी मिळतील. कामाचा ताण वाढत असला तरी त्यातून स्वत:ला सिद्ध करता येईल. वैवाहिक जीवनात अनेक प्रसंग मनपसंत राहतील. आनंददायी वातावरणात आगामी दिवाळीच्या सप्ताहाला सामोरे जाल. नवे घर किंवा नवे वाहन हे स्वप्न पूर्ण करू शकाल.
 
धनु - व्यापार-उद्योगात मोठी धामधूम चालू राहणार आहे. मात्र स्वत:ची व्यावसायिक गुपिते, महत्त्वाचे दस्तऐवज, चेकबुक इ. तसेच मौल्यवान वस्तू यांना भलतीकडेच पाय फुटणार याची काळजी घ्या. वेळोवेळी त्याची दखल घेत राहा. करायला जावे एक आणि व्हावे भलतेच असे होणार नाही याची काळजी घेत राहणे या सप्ताहात गरजेचे ठरेल.  विजयी घोडदौड अशीच चालू राहील. अनेक क्षेत्रांत आघाडीवर राहाल. कला, क्रीडा, शिक्षण, न्याय, शेती, पत्रकारिता इ. विविध क्षेत्रांतून आपल्याला मागणी वाढती राहील.
 
मकर - सप्ताहात आपली तळी उचलणारे अनेक जण भेटतील. त्यातल्या काही जणांचा त्रास देण्याचा दृष्टिकोन वेळीच लक्षात घेतला तर काही बाबतींतला अनर्थ कमी होऊ शकेल. सगळ्याच गोष्टी पूर्ण मनासारख्या नसल्या तरी दिवाळी साजरी करावी, अशी आनंदाची परिस्थिती नक्की असेल. स्थावरचे व्यवहार, कौटुंबिक प्रश्न, मुलांचे काही प्रश्न तसेच सामाजिकदृष्टय़ा होऊ घातलेला आपला मानमरातब या सगळ्यांना एका वेळी सामोरे जावे लागणार. त्यातून आपली छबी चांगलीच सुधारत जाणार आहे. आर्थिकदृष्टय़ा मोठय़ा संधी चालून येतील. वैवाहिक जीवनातही चांगल्या घटनांची नोंद होईल.
 
कुंभ - मधुमेह, हृदयविकार, मूत्रविकार किंवा अ‍ॅलर्जीचा विकार असणाऱ्यांनी या सप्ताहात वेगळी काळजी घेणे गरजेचे ठरेल. त्यातून मोठा आर्थिक पल्ला गाठता येईल. पुढील मोठया कालावधीसाठीची तरतूद वेगळी करून ठेवता येईल. वाढणाऱ्या ओळखी आणि येणारे नवे हितसंबंध यातून यशाला वेगळी सोनेरी किनार देऊ शकाल. कौटुंबिक जीवनात मंगलकार्याचे बेत सफल ठरतील. नोकरदारांना केलेल्या कष्टाचे पूर्ण फळ मिळेल. आपला दिवाळीसाठीचा कार्यभाग साधण्यासाठी हा सप्ताह विशेष महत्त्वाचा आहे. त्यातून अपेक्षित अशी घोडदौड नक्की राखू शकाल.

मीन - वाढणारा आत्मविश्वास, मिळणारे सहकार्य, येणारे प्रस्ताव आणि होत असलेली कामे यातून छानसे परिणाम हाती येत राहतील. ठरवल्याप्रमाणे पुढे जाता येईल. आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आणखी जास्त प्रयत्नांची गरज नाही. कुठेही जोरजबरदस्ती करू नका. कोणाला फार मोठा सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका. आपला स्वार्थ जिथे असेल त्याच मार्गे आपण पुढे जा. अनेक बाजूंनी आपल्याला अपेक्षित असे वातावरण आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्या. नोकरदारांना अनेक दिवस खोळंबलेली कामे मार्गी लावता येतील.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin