Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


या आठवड्याचे जाणून घ्या राशीभविष्य


Main News

मेष - शक्तीचा जागर अनेक अर्थानी चांगला सिद्घ होणार आहे. मंगळ, शुक्र आणि बुधाची स्थिती आपल्यासाठी बऱ्याच अंशी अनुकूल आहे. शारीरिक शक्ती असो किंवा सामाजिक वजन, त्याचा उपयोग करून घेता येणार आहे. आयुष्यात येणाऱ्या अनेकांशी गोड बोलून कार्यभाग साधता येणार आहे. नवे विचार, नवा पायंडा आणि नवी स्थिती यांचा प्रगतीसाठी मोठा उपयोग होणार आहे. नोकरदारांना वरिष्ठांच्या आतल्या गोटात प्रवेश मिळेल. प्रेमिकांना हिरवा कंदील मिळेल. 

वृषभ - कुठेही अतिरेक होऊ देऊ नका. आर्थिक व्यवहार काटेकोर पाळा. संभाषण कौशल्यातून व्यवहार अपेक्षित असे वळवून घ्या. कला आणि साहित्य गुण चांगलेच उपयोगाला येतील. नोकरदारांना आपल्या कौशल्याचा थेट फायदा होईल. नव्या सरकारी नियमांचा फायदा होईल. शिक्षण संस्थांमध्ये असणाऱ्यांना आपली स्थिती मजबूत करता येईल. मुलांचे प्रश्न सहजासहजी सुटतील. होणारे नवे नातेवाईक आणि नव्या ओळखी यातून सप्ताह गाजणारा ठरणार आहे. 

मिथुन - घरातील ज्येष्ठ असो, बाहेरील मार्गदर्शक असो किंवा मित्रपरिवार असो आपल्या शब्दाला होकार मिळत राहील. मानसन्मानाच्या वाटा मोकळ्या होतील. शिक्षण, साहित्य, कलाविश्वातून नाव मोठे होत राहील. आर्थिक मजबुतीकडे चांगली वाटचाल होईल. घरातील जोडीदार व व्यवसायातील भागीदार यांच्या मताला मान देणे महत्त्वाचे ठरेल. काही चुका पदरात घ्याव्या लागतील.

कर्क - नोकरदारांना नव्या ठिकाणी मिळालेल्या संधीचे सोने करता येऊ शकणार आहे. घरात ज्येष्ठांचा होणारा सन्मान आणि घरातील कोणाचे मोठे होत जाणारे नाव यातून अभिमान भरून राहील. मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल. साहित्यविश्वात नाव मोठे होत राहील. आर्थिकदृष्टय़ाही सप्ताह मोठी झेप घ्यायला मदत करणारा ठरू शकेल. ६ तारखेला मात्र फार मोठे निर्णय घेणे परवडणारे नाही. त्या दिवशी येणारे अनपेक्षित नैराश्य वेळीच दूर करावे लागेल. 

सिंह - नवरात्रीचे हे दिवस आपल्याला अनेक अर्थानी प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. राजकीय आकांक्षा, शैक्षणिक यश, खेळातील नावलौकिक किंवा व्यवसायातली प्रगती अशा चौफेर बाजूंनी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचे आहे. नेमक्या वेळी मिळणारे सल्ले आणि धावून येणारे वरिष्ठ यांचा उपयोग करून घ्या. कोणालाही दुखवू नका. आपले कौशल्य पणाला लावा. आर्थिकदृष्टय़ाही सप्ताह भक्कम असा राहील. येणाऱ्या संधी आणि मिळणारे प्रस्ताव आपल्याला दसरा-दिवाळीसाठी महत्त्वाचे ठरू शकतात. 

कन्या - कामाची पद्धत आणि नियोजन यांचा पुन:पुन्हा विचार करा. प्रत्येक गोष्टीत योग्य ती उपाययोजना ठेवा. आत्मविश्वासाने पुढे चला. सप्ताह आपल्याला बऱ्याच अंशी मोठे यश आणून देणारा ठरणार आहे. जुने मित्र नव्याने ओळख देतील. शिक्षण क्षेत्रातील जुन्या ओळखींचा नेमका उपयोग होईल. राजकीय वर्तुळातून ऊठबस वाढेल. आपल्या हितासाठीच आली आहेत, अशी काही माणसे अनपेक्षित भेटतील. सप्ताहात अनेकदा मेजवान्या मिळतील. नोकरदारांनाही आपले कौशल्य सिद्ध करायच्या संधी मिळतील.

तूळ - दूरच्या प्रवासातून मिळणारे अनुभव किंवा अनपेक्षित सुचणारी एखादी कल्पना ही व्यवहारात उपयुक्त ठरणार आहे. व्यसन, प्रलोभन किंवा कुसंगती यापासून स्वत:ला वेगळे ठेवणे मात्र गरजेचे ठरणार आहे. आपल्या कलाकौशल्याने आपले नाव मोठे कराल. अनेक बाबतींत आपली वाटचाल पुढे चालू राहील. नोकरदारांनी सहकाऱ्याला कामात केलेली मदत मोठा परतावा देणारी ठरेल. आर्थिक स्तर वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नात अडथळे आहेत, पण यशही आहे. 

वृश्‍चिक - आपले प्रत्येक पाऊल प्रगतीच्या दिशेने पडणार आहे. खर्चाचे आकडेही समोर असतील पण ते गुंतवणूक स्वरूपाचे असतील. आवक वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यशाची किनार लाभणार आहे. जवळच्या मित्रांचे सहकार्य आणि कौटुंबिक पाठिंबा यातून मानसिकता सकारात्मक होत राहील. कामात मिळालेला वेगही आपल्याला अपेक्षित साध्य गाठायला उपयुक्त ठरेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराने मांडलेले काही खर्च मान्य करावे लागतील, त्यातून कौटुंबिक एकोपाही साध्य होईल. 

धनु - नोकरी-व्यवसायात आपल्या शब्दाला मान मिळेल. आर्थिक प्रगतीसाठी केलेला प्रत्येक प्रयत्न यशाकडे नेईल. बँक बॅलन्स वाढता राहील. हाती घेतलेले नवे प्रकल्प मार्गी लागतील. अनेक अडचणींतून पुढे आल्याचे समाधान मिळेल. उचललेले प्रत्येक सकारात्मक पाऊल हे आपल्याला प्रगतीचा, महत्त्वाचा टप्पा गाठणारे ठरतील. नोकरदारांना आपले कौशल्य दाखवण्याच्या संधी मिळतील. वैवाहिक व कौटुंबिक जीवनातही प्रत्येक सदस्याची होणारी प्रगती हा आपल्या अभिमानाचा विषय ठरेल. 

मकर - मिळणाऱ्या संधी, केलेले नियोजन आणि उचललेले पाऊल योग्य दिशेने वाटचाल करील. अपेक्षित असे सहकार्य मिळत राहील. मिळणाऱ्या संधींचा फायद्या घ्या. आर्थिकदृष्टय़ाही थोडी उशिरा का होईना पण परिस्थिती सक्षम होत राहील. नव्या संधींची वाट बघणे आता पुरेसे ठरेल. त्यांचाही उपयोग आपण करू शकाल. वैवाहिक जीवनात काही भावनिक प्रसंग उद्भवतील. त्या वेळी व्यावहारिक निर्णय घेणे आपल्यासाठी गरजेचे ठरेल. विशेषत: सासुरवाडीचा एखादा प्रश्न ऐरणीवर येईल. 

कुंभ - अनावश्यक बोलायचे नाही म्हणून तोंडावर हात ठेवा. दुसऱ्यांचे दोष उगाळत बसू नये यासाठी ते दिसूच नये म्हणून डोळ्यांवर हात. काही प्रमाणात फसवणुकीच्या शक्यता आहेत. अनोळखी लोकांसमोर कानांवर हात. या तिन्ही माध्यमातून अशी काळजी घेतल्यास सप्ताह पुढे नेणारा ठरू शकतो. व्यावहारिक, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक स्थिती फार अनुकूल नसली तरी प्रतिकूलतेवर मात नक्की करता येईल आणि त्यातून आपल्याला अपेक्षित साध्य गाठता येईल. 

मीन - आर्थिक व्यवहारही त्याबरोबरीनेच सक्षमपणे होत राहतील. आपले महत्त्व वाढत राहील. आपल्यावर फिदा होणारी माणसे भेटतील. आपले कौतुक होत राहील. अनेक क्षेत्रांत आपला दबदबा निर्माण होत राहील. आरोग्यदृष्टय़ा अगदी शरणागती पत्करण्याची गरज नाही. योग्य औषध आणि पथ्यपाणी यातून बाहेर पडणेसुद्धा शक्य आहे. नोकरी-व्यवसायात मिळणारे प्रस्ताव व अधिकार आणि वाढणारी अर्थआघाडी यातूनही आपला आत्मविश्वास आणि आनंद वाढता राहील. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin