Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


या आठवड्याचे जाणून घ्या राशीभविष्य!


Main News

मेष - ग्रहस्थितीमध्ये बरीचशी सुधारणा झालेली आहे. आठव्या शनीचे परिणाम बऱ्याच अंशी कमी होऊ लागलेले आहेत. कोणाशीही वाईटपणा न घेणे हे जास्त सयुक्तिक ठरेल. नोकरी-व्यवसायात मिळणारे सहकार्य, ग्राहकराजाची प्रसन्नता, वरिष्ठांची खप्पामर्जी आणि स्वत:ची निरनिराळ्या क्षेत्रांतली शक्तिस्थाने यातूनही छानसे रसायन या सप्ताहात आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. अनेक गोष्टी मनासारख्या होतील. अर्थआघाडी भक्कम होत राहील. घरात शुभकार्याचे पडघम वाजतील. 

वृषभ - शिक्षण क्षेत्र असो वा न्याय, क्रीडा असो वा साहित्य अशा अनेक क्षेत्रांतून आपला सक्रिय सहभाग वाढता राहील. महत्त्वाची पदे हाती येतील. थोरामोठ्यांचे सहकार्य चांगले मिळेल. व्यसन आणि प्रलोभन आवर्जून बाजूला ठेवावे लागेल. नको त्या माणसांची संगत वेळीच थांबवणे हिताचे ठरेल. आर्थिक प्रमेये जमत येतील. कोणत्याही स्थितीत अनाठायी खर्चावर र्निबध आणून अपेक्षित पावले टाका. आपला फायदा या सप्ताहात मोठय़ा प्रमाणात होऊ शकणार आहे. 

मिथुन - बोलताना आपण कोठे आहोत, कोणाशी बोलतो आहोत आणि काय शब्द वापरतो आहोत यावर कटाक्षाने लक्ष ठेवा. अन्यथा तोंडाशी आलेला घास परत जाऊ शकतो. भागीदारीत काही वादविवादाचे प्रसंग उद्भवतील. कोर्टकचेऱ्यांतून वेगळेच खलिते येऊ शकतील. तरीही प्रगतीची वाट चालू राहणार आहे. कलाविश्वातून नाव मोठे होत राहणार आहे. मिळणाऱ्या संधीचे सोने करण्यासाठी अवश्य सिद्ध व्हा. प्रेमप्रकरणांना काही वेगळे वळण मिळणे शक्य. 

कर्क - ग्रहमान प्रसन्न आहेत. आपण कल्पना करा. त्याचे नियोजन करा. ते वास्तवात आणण्यासाठी पूर्ण शक्तीनिशी कामाला लागा. यश आपलेच आहे. सप्ताहातली अमावस्या काही बाबतीत मनस्ताप देणारी असली तरी अन्य दिवसांत आपण अनेक गोष्टींतील यश खेचून आणू शकणार आहात. प्रवासात होणाऱ्या ओळखींचा चांगला फायदा होईल. मोठय़ा पदांवर आपले नाव कोरले जाईल. भाऊबंदकीचे मिटणारे प्रश्न, घरात ठरणारे शुभ कार्य आणि मुलांच्या शुभवार्ता यातून आनंद वाढता राहील.

सिंह - सप्ताहातील रवी-गुरूचा योग आपल्याला जास्तीत जास्त फायदेशीर ठरणार आहे.  वडिलार्जित इस्टेटीचे वाद यशस्वी टप्पावर येऊन ठेपतील. सामाजिक उपक्रमातला सहभाग विशेष कार्यसिद्धी देणारा ठरेल. महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्यांच्या अंगीभूत गुणांना चांगला वाव मिळेल. नोकरदारांनाही आपले कार्यकर्तृत्व वाढवण्याच्या चांगल्या संधी मिळतील.  चांगल्या वाटेने प्रवास सुरू होईल. सप्ताहातली अमावस्या ही वेगळे काही प्रश्न निर्माण करणारी ठरू शकते. 

कन्या - आपल्या राशीतला रवी-गुरू योग आपल्याला अनेक चांगल्या पदावर नेणारा ठरू शकतो. वास्तूविषयक कामामध्ये चांगले पाऊल पडू शकते. येणाऱ्या संधी, मिळणारे प्रस्ताव, हाती येणारा पैसा आणि योग्य दिशेने होत असलेली वाटचाल यांचा सुयोग्य मेळ बसून छान असे परिणाम पाहायला मिळतील.  दूरच्या प्रवासाचे नियोजन अगदी योग्य असे करणे गरजेचे. आध्यात्मिक क्षेत्रात असणाऱ्यांना या सप्ताहात चांगले अनुभव मिळतील. आपल्या राशीतून या सप्ताहात एक ग्रहण होत असल्याने अमावास्येच्या एक दिवस पुढे-मागे मानसिक खच्चीकरण होऊ शकते.

तूळ - आपल्या राशीतला शुक्र आणि अन्य ग्रहमान हे आपल्याला काही बाबतीत मोठे चांगले परिणाम घडवून आणणारे आहेत. गुंतवणुकीच्या मोठ्या संधी मिळतील. केलेल्या कामात चांगले यश मिळत राहील. प्रवास, पत्रव्यवहार, भेटीगाठी यांचा चांगला फायदा होईल. आर्थिक आघाडीवर मात्र एखादी छोटीशी चूक एखादा मोठा फटका देऊ शकते. आरोग्यबाबतीत साथीच्या रोगाची लागण लागणे शक्य. वैद्यकीय सल्ला हाताशी असू द्या. कोणतेही वैद्यकीय रिपोर्ट्स हे चुकलेले नाहीत याची पुन्हा एकदा खातरजमा करून घ्या. 

वृश्‍चिक - लाभातले रवी-गुरू हे आर्थिक स्थिती चांगली भक्कम करतील. कर्ज प्रकरणातून दिलासा मिळत राहील. सावकारी पाश कमी होतील. रोजच्या खर्चावर फार र्निबध आणणे तेवढे गरजेचे. आत्तापर्यंत अडकलेली कामे बऱ्याच अंशी मार्गी लागतील. कोणाबद्दलही सूड किंवा दु:ख मनात न आणता त्यांना सामोरे जा. व्यापाऱ्यांनी फसव्या योजनांना बळी पडणार नाही याची पुरेशी काळजी घ्यावी. नोकरदारांनी आपली कोणी भलतीच थट्टा करीत नाही ना, याकडे लक्ष द्या.

धनु - सप्ताहातली सर्वोत्तम राशी असे आपल्या राशीचे वर्णन करता येईल. एकंदरीतच ग्रहस्थिती ही आपल्याला अनुकूल अशीच आहे. नोकरी, व्यवसायात यशाचे मोठे पाऊल पडू शकेल. सामाजिक क्षेत्र असो, सांस्कृतिक व्यासपीठ असो आपला वावर हा मानाचा राहील. राजकारणात पुढे जाण्याच्या संधी मिळतील. आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा हा सप्ताह अनुकूल असा आहे. सर्वपित्री अमावास्येच्या दरम्यान व्यवहारी जगात जरा काळजी घेतल्यास सप्ताह आपल्याला अपेक्षित यश गाठून देऊ शकतो. 

मकर - खर्चावर योग्य र्निबध आणूनच सप्ताहातील सकारात्मक वातावरणाचा फायदा घ्या. होणाऱ्या नव्या ओळखी आणि राजकीय वर्तुळाचा नेमका फायदा हा या सप्ताहात आपल्याला विशेष यश देणारा ठरू शकतो. नोकरी, व्यवसायात गोड बोलून कार्यभाग साधता येईल. नोकरदारांना जास्तीच्या कामाचा ताण पडणे शक्य. आरोग्याच्या बाबतीत सतर्कच राहा. वैवाहिक व कौटुंबक जीवनात बऱ्याच अंशी शांत वातावरण असेल. काही सकारात्मक निर्णयातून पुढे जाण्याच्या संधी मिळतील. 

कुंभ - सप्ताहात यशाची पावले अनेक मार्गानी आपल्याकडे येणार आहेत. समोरच्याला न दुखावता व आपले जास्तीचे पांडित्य न दाखवता व्यावहारिक वाटेवरून चला. वैज्ञानिक, डॉक्टर्स, संशोधक, इंजिनीयर, मोठे व्यापारी तसेच अकौंटिंगची कामे करणाऱ्यांना या सप्ताहात नवी मोठी कामे मिळू शकतात. अमावास्येच्या आसपास एखादा प्रश्न उद्भवल्यास मुळापर्यंत जाऊन शोध घ्या. वैवाहिक जीवनात काही गैरसमज होणे शक्य. प्रेमप्रकरणांना काही दिवस स्थगिती द्या. 

मीन -पूर्ण आत्मविश्वासाने पुढे चाला. सप्ताहात बऱ्याच गोष्टी आपणास प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणार आहेत. मोठे फायदे होणार आहेत. नोकरदारांना नव्या चांगल्या संधी मिळतील. सहकारी, नातेवाईक, हितचिंतक यांचा चांगला फायदा होईल. न्याय क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगळे चांगले यश मिळू शकते. आध्यात्मिक क्षेत्रातही नव्या विलक्षण अनुभवांची नोंद होईल. प्रेमप्रकरण असो किंवा विवाहविषयक कोणतेही कार्य असो. सध्या आत्मविश्वासाने पुढे जाता येईल. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin