Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


या आठवड्याचे राशीभविष्य


Main News

मेष- समूहामध्ये किंवा गर्दीत जाताना स्वत:चा वावर सुरक्षित असू द्या. अपघात, घातपात किंवा विश्वासघात यांपासून संरक्षण मिळेल अशी तरतूद करा. सध्या बचावात्मक राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे. नोकरी व्यवसायात काहीबाबतीत मुद्दाम काही प्रश्न निर्माण केले जाऊ शकतात. त्यांची उत्तरे आपल्याला शोधावी लागतील. आरोग्याच्या बाबतीतही वेगळे नियोजन करणे गरजेचे आहे. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात काही संशयाचे वातावरण उभे राहू शकते. स्वत:ची निर्मळ मते आणि मोकळेपणा त्यातून बाहेर काढू शकतो.

वृषभ - नोकरी व्यवसायात काही गोष्टी टाळता येणार नाहीत. त्यातून मार्ग काढताना थोडीफार त्रेधा उडणे शक्य आहे. भागीदारी व्यवसायात सगळे व्यवहार लेखी असणे जास्त हिताचे. शिक्षण क्षेत्रात असणाऱ्यांना सप्ताह विशेष देणगी देणारा ठरू शकतो. कलाकारांना चांगले व्यासपीठ मिळेल. सामाजिकदृष्टय़ा एखादा सन्मानही वाटय़ाला येईल. आर्थिकदृष्टय़ा चांगले ग्रहमान आहे. प्रयत्नातून त्यात चांगली भर टाकता येईल. वास्तूविषयक व्यवहारात मात्र काही घोटाळे निर्माण होऊ शकतात. वैवाहिक जीवनात होणारे वाद वेळीच थांबवणे एवढेच आपल्या हाती आहे. 

मिथुन - ठरवलेले कार्य वेळेत पूर्ण करता येण्यासारखी शक्यता आहे. प्रवासातले नियोजन अचूक असणे तेवढे गरजेचे. हितशत्रूंसाठी फार वेगळी व्यूहरचना करण्याची गरज नाही. घरातूनच मिळणारा पाठिंबा आणि ज्येष्ठांचे मिळणारे अनुभवाचे व उपदेशाचे बोल आपल्याला पुढे जाण्यास खूप उपयुक्त ठरतील. कला, साहित्य, बांधकाम, शेअर मार्केट, इ. व्यवसायात असणाऱ्यांना या सप्ताहात मोठी झेप घेता येणार आहे. डोकेदुखी असणाऱ्यांनी मात्र या सप्ताहात जास्तीची काळजी घेणे हिताचे ठरावे. साहित्य व राजकारण वर्तुळात असणाऱ्यांनाही थोडे बचावात्मक धोरण ठेवणे हितकारक ठरू शकते. 

कर्क - सप्ताहातली वाटचाल काहीशी संघर्षांतून करावी लागणार आहे. आपले वाचन व अनुभव यातून काही गोष्टी साकार होऊ शकतात. जेवणातली एखादी सौम्य अन्नविषबाधा सप्ताहाचे वेळापत्रक बिघडवू शकते. डोकेदुखी आणि अ‍ॅसिडिटी असणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे हिताचे ठरावे. अनंत चतुर्दशीदरम्यान घेतलेले अंदाज हे अचूक ठरण्याची शक्यता जास्त आहे. संततीच्या प्रश्नात निघत असलेला मार्ग आपल्याला अन्य क्षेत्रात वेळ देण्यासाठी उपयुक्त ठरेल. वैवाहिक जीवनात वाहणारे सामोपचाराचे वारे उपयुक्त ठरतील. आगामी काळात काही चांगल्या घटनांची नोंद होण्यासाठी हा सप्ताह विशेष उपयुक्त ठरेल.

सिंह - सर्व उच्चपदस्थ, सरकारी अधिकारी, राजकारणात काही पदांवर असणारे लोक तसेच निरनिराळ्या संघटनांचे पदाधिकारी या लोकांसाठी हा सप्ताह काहीसा जपून वावर करायला लावणारा आहे. कोणत्याही गोष्टीचे पूर्ण आकलन केल्याशिवाय त्यावर प्रतिक्रिया देऊ नका. घरामध्येही किरकोळ कारणांनी होणारे वादविवाद आपल्या मध्यस्थीने थांबू शकतात. कुटुंबात होणारे शुभकार्य आपल्यासाठी शारीरिक त्रास देणारे असले तरी मानसिक असे मोठे समाधान देणारे ठरू शकते. वैवाहिक व कौटुंबिक जीवनातही आपल्या सहकार्याची गरज असणार आहे.

कन्या - वैवाहिक जोडीदार असो वा धंद्यातला भागीदार असो यांचे चांगले सहकार्य मिळेल. त्यांच्या मदतीने होणारी कामे ही विशेष यश आणून देणारे ठरू शकते. डोकेदुखी, मूत्राशयाचे विकार तसेच पोटाचे विकार यात लक्ष न दिल्यास वेगळे वळण मिळू शकते. आपल्या अनुभवविश्वाचा वापर सध्या चांगला करून घेऊ शकणार आहात. साहित्यवर्तुळातून नवे विश्व समोर येऊ शकते. कलाक्षेत्रातही वेगळ्या चांगल्या दिशा मिळू शकतात. आर्थिक संपन्नतेकडे वाटचाल होऊ शकते. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात चांगले दिवस आहेत. 

तूळ - कायदेशीर सल्ला वेळीच हाताशी असू द्या. कोणत्याही बेकायदेशीर गोष्टींना थारा देऊ नका. खाण्यापिण्याची पथ्ये आवर्जून पाळा. कुठेही आरोग्यसल्ला धुडकावून लावू नका. समतोल स्वभाव, हास्यविनोद आणि स्वत:चा स्वार्थ यांचा चांगला ताळमेळ घालण्याचे कसब आपल्याकडे आहे. त्यातूनच आपला मार्ग सुकर होणार आहे. सप्ताहाचा निर्णय अचूक असणे गरजेचे आहे. कोणताही अतिरेक होऊ देऊ नका. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या तब्येतीकडे लक्ष देणे जास्त महत्त्वाचे ठरेल. 

वृश्‍चिक - राजकारण, समाजकारण, कला, साहित्य, इ. क्षेत्रांत आपले वजन वाढणार आहे. आर्थिक प्राप्तीही वाढणार आहे. मात्र मतभेदाच्या जागा बाजूला ठेवत कौशल्याने या सगळ्यामध्ये रमायचे आहे. नव्या लोकांशी जुळवून घेताना होणारा त्रास हा साडेसातीचा आहे हे लक्षात ठेवा. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात काही मतभेद असतील तरीही संसाराचा गाडा आनंदाचा ठरणार आहे. आपल्या आरोग्याच्या बाबतीत मात्र वेगळा सल्ला देणे गरजेचे ठरावे. जुने विकार तोंड वर काढू शकतात. रोगनिदान चुकीचे होऊ शकते.

धनु - पितृपक्षात येणारे ग्रहमान हे आपल्यासाठी अनुकूल असल्याने त्याची पूर्वतयारी या सप्ताहात चांगल्या पद्धतीने करू शकाल. आपल्या अधिकारामध्ये झालेली वाढ नोकरदारांना सुखावह ठरेल. व्यापाराच्या नव्या क्षेत्रात घेतलेली उडी फायदेशीर ठरणार आहे. या सप्ताहात चालू असलेली बोलणी ही कायदेशीरदृष्ट्या आणि व्यावहारिक स्तरावर विशेष तपासून पाहा.  वैवाहिक व कौटुंबिक जीवनात बऱ्याच अंशी ताळमेळ चांगला राहील. मुलांच्या दृष्टीनेही एखादा महत्त्वाचा प्रश्न चांगल्या अर्थाने मार्गी लागू शकेल.

मकर - या नियोजनातून होणारी प्राप्ती या सप्ताहात मोठय़ा अभिमानाचा विषय ठरेल. उधारी वसुलीसाठी जोरजबरदस्ती टाळा. थोरामोठय़ांच्या शब्दाला मान द्या. आर्थिक व्यवहारात कायदेशीर बाजू विशेषत्वाने सांभाळा. भेटीगाठी आणि बोलाचालीमधून कोणाचा पाणउतारा होणार नाही याची काळजी घ्या. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात सध्या आरोग्य प्रश्नाला महत्त्व द्यावे लागणार आहे. खाणेपिणे आणि व्यायामाचे नियमन उचित असेल तरच यातून मार्ग निघेल. कोणताही अतिरेक होणार नाही याची मनापासून काळजी घ्या. 

कुंभ - व्यापार व्यवसायामध्ये काहीही गृहीत धरून चालणार नाही. अंदाज चुकण्याची शक्यता आहे. समोरच्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास टाकणे धोक्याचे ठरू शकते. आर्थिकदृष्ट्या चांगले ग्रहमान असले तरी अशा काही चुकांमधून फटके बसणे शक्य आहे. भागीदारी, कोर्टकचेऱ्या, पोलीसदरबारची प्रकरणे किंवा सरकारी कामे यात दमछाक होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या काही प्रश्नांना वेगळी उत्तरे शोधावी लागतील. त्यांच्या मानसिकतेचाही विशेष विचार करावा लागेल. चांगला मार्ग काढणे नक्की आपल्या हातात असेल.

मीन - थोडेफार वादविवाद आणि मतभेद असले तरीही हा सप्ताह आपल्याला बरेच काही देणारा ठरू शकतो. भागीदारीमधून चांगला पैसा मिळत राहील. येणारे प्रस्ताव विचार करण्यासारखे असतील. आर्थिकदृष्टय़ा सप्ताह चांगली फळे देणारा ठरू शकतो. आरोग्याच्या बाबतीत मात्र कोणतीही चालढकल परवडणारी नाही. मानसिक विकार किंवा डोकेदुखी तसेच हृदयविकार किंवा मधुमेह असणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे हिताचे ठरावे. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात सध्या अनेक अंगांनी अनुकूलता येत आहे. सगळ्यांच्या सहकार्याने व्यक्तिमत्त्व फुलत राहील.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin