Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


या आठवड्याचे जाणून घ्या राशीभविष्य


Main News

मेष- रवी पंचमात असला तरी राहूयुक्त असल्याने उपयुक्त नाही. त्यामुळे काही बाबतीत काळजी घ्यावीच लागणार आहे. विशेषत: आपल्या मनामध्ये अनेकांच्या बाबतीत जे काही गैरसमज करून ठेवलेले असतील ते काढणे महत्त्वाचे आहे. मोठ्या सहकार्याची अपेक्षा कोणाकडून करू नका. तरीही आर्थिक व्यवहारात एक विशेष टप्पा गाठला जाणे शक्य. उधारी-वसुली मात्र पदरात पाडून घेता येईल. सणांच्या निमित्ताने वैवाहिक व कौटुंबिक जीवनात वातावरण उत्साहवर्धक करता येईल.

वृषभ- श्रीगणेशाचे होणारे आगमन आपल्या काही विघ्नांचा नाश करणारे ठरतील. भागीदारी किंवा कोर्टकचेरी यातून मार्ग सापडेल. शिक्षण, कला व साहित्य क्षेत्रात चांगलेच पुढे जाता येईल. कोणत्याही परिस्थितीत काम थांबवणे हे योग्य ठरणार नाही. आर्थिकदृष्ट्या अनेक काही चांगल्या घडामोडी होणार आहेत. नोकरदारांनी कोणाशीही वाद न घालता आपल्या कामाशी गाठ ठेवावी. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात शुभ वार्ता कानी येतील. आत्मविश्वास वाढावा असे वातावरण राहील. संततीसंदर्भातल्या वार्ता उत्साहवर्धक असतील.

मिथुन - चौथ्या आणि सहाव्या स्थानातले ग्रहबल हे फारसे उपयुक्त नसले तरी आपल्याला कामासाठी एक वेगळी ऊर्जा सतत मिळत राहणार आहे. सध्या काही चुका होत असल्या तरी कोणत्याही कामातली कुचराई वा चालढकल योग्य ठरणार नाही. आर्थिकदृष्टय़ा फार मोठय़ा उलाढाली नसल्या तरी श्रीगणेशाच्या आगमनाने कौटुंबिक जीवन मात्र आनंददायी होणार आहे. घरात ज्येष्ठांच्या सहमतीने एकोपा दिसून येईल. कोणाच्या विवाहविषयक चर्चाना सकारात्मक वळण मिळेल. कोणाच्या बेकारीचा प्रश्न मार्गी लागेल.

कर्क - विचारपूर्वक, शांत मनाने आणि लक्ष देऊन कामे केल्यास या सप्ताहात मोठे यश मिळू शकते. खरे तर कर्क राशीच्या आपणास मनाची क्षमता मोठी असते. सप्ताहात चांगले यश मिळू शकते. गुरुवारी मात्र आपल्याला फार मोठे निर्णय घ्यायचे नाहीत. आर्थिकदृष्टय़ा फार वेगळी स्थिती नाही. ‘जैसे थे’ स्थिती राहील. वैवाहिक व कौटुंबिक जीवनातही फार मोठे बदल सध्या संभवत नाहीत. प्रवास, पत्रव्यवहार व भेटीगाठी इ. मधून मात्र मोठी कामे मार्गी लागू शकतात.

सिंह - घरातली किंवा बाहेरची कामे करताना आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. स्थावरच्या बाबतीत होणारे वादविवाद वेळीच थांबवा. आर्थिक स्थिती सध्या ठीक असेल, मात्र फार मोठे प्रयत्न करण्याच्या फंदात न पडलेले बरे. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात काही प्रश्न तसेच प्रलंबित राहणार आहेत. श्रीगणेशाच्या आगमनाने काही प्रश्न सुटूही शकतील, मात्र धीर धरणे आवश्यक. सगळे काही आत्ताच मिळावे अशी अपेक्षा नको.

कन्या - आपल्या राशीतले बुध, शुक्र आणि गुरू हे ग्रह आपल्याला एका मोठय़ा उंचीवर नेवून ठेवणारे ठरू शकणार आहेत. श्रीगणेश चतुर्थी, ऋषिपंचमी आणि गौरीचे सण यात या सप्ताहात अनेक मार्गानी अनुकूलता मिळणार आहे. काही संकटे येतीलही पण आपल्या स्वत:च्या क्षमतेने त्यातून मार्ग निघेल.  आर्थिक आघाडीसाठी विशेष लक्ष ठेवा. त्यातून आपला कार्यभाग साधला जाणार आहे. तसेच वैवाहिक व कौटुंबिक जीवनातही चांगल्या घटना दर्शवणारा सप्ताह ठरणार आहे. भावंडाच्या बाबतीत मात्र कोणतेही गृहीत धरणे चुकीचे ठरणार आहे.

तूळ - सप्ताह तसा अडचणीचा ठरू शकणार आहे. महत्त्वाचे ग्रह बाराव्या स्थानात तर पापग्रह धनस्थानात आहेत. कुठेही कोंडी होणे शक्य. आपले बोलणे असो, खर्चाचे वाढणारे आकडे असो किंवा काही विशिष्ट सवयी, यातून त्रास होऊ शकणार आहे. त्यातून आपला सप्ताह सत्कारणी लागू शकेल. श्रीगणेशाचे आगमन आपल्याला कौटुंबिक आधार देणारे ठरेल. कुटुंबातले आणि वैवाहिक जीवनातले वाद बऱ्याच अंशी कमी राहतील. मुलांच्या दृष्टीने निर्माण होणारा नवा प्रश्न  वेळापत्रक बिघडवू शकतो.

वृश्‍चिक - साडेसातीचा कहर चालू असताना लाभस्थानात आलेले ग्रह आपल्याला अडचणीतून मार्ग काढून द्यायला आलेले आहेत हे लक्षात ठेवा. आर्थिकदृष्टय़ा मोठी झेप घेता येणार आहे. थोरामोठय़ांच्या ओळखीतून व सहवासातून महत्त्वाचे प्रश्न सुटणार आहेत. नोकरी-व्यवसायात कुठेही अतिरेक होऊ देऊ नका. विचित्र माणसांच्या नादी लागू नका. विपरीत कर्म करताना दहा वेळा विचार करा. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात काही सुखकारक घटनांची नोंद होईल. संततीच्या दृष्टीने सुखद धक्के बसतील.

धनु - बाराव्या स्थानात असलेले शनी, मंगळ आणि दहाव्या स्थानातले महत्त्वाचे ग्रह यातून या सप्ताहात चांगली ऊर्जा मिळणार आहे. चुकीच्या गोष्टी आपोआप बाजूला पडणार आहेत. प्रत्येक ठिकाणी आपले कर्तव्य करण्यात मात्र कुठेही कमी पडू नका. नोकरी-व्यवसायात सध्या मोठी उड्डाणे घेता येणार आहेत. अनेकांची साथ मिळणार आहे. कौटुंबिक जीवनातही आनंदाचे कारंजे बहरणार आहेत. एकूणच शुभ सप्ताह असे या सप्ताहाबद्दल सांगता येईल. मुलांच्या दृष्टीने मात्र प्रवास किंवा त्यांचे नको ते उद्योग यातून थोडाफार मनस्ताप शक्य.

मकर - संमिश्र ग्रहमानातून सप्ताह जाणार आहे. सप्ताहातले सणवार साजरे करताना कुठेही कंजुषी करू नका. आपल्या वैभवाप्रमाणे अवश्य ते करा. मोरयाचे आगमनही अशाच एकोप्याने आणि आनंदाने कराल. नोकरी-व्यवसायातही या गोष्टींचा अवश्य विचार करा. द्यायचे ते उत्तम अन्यथा नाही. या सूत्रातून आपल्याला माणसेही चांगली जोडता येणार आहेत. मानसन्मान मिळतील. वैवाहिक व कौटुंबिक जीवनातही चांगले सामरस्य घडून येईल. आर्थिक कारणांवरून मात्र वाद होणे चांगले ठरणार नाही.

कुंभ - दशमातले शनी, मंगळ अष्टमातले त्रिग्रह आणि सप्तमातले रवी-राहू ही ग्रहस्थिती ही आपल्या सगळ्या क्षमतांना मोठे आव्हान देणारी ठरू शकते. नशिबाची साथ प्रत्येक वेळी मिळेलच हे गृहीत धरू नका. सरळमार्गाने, अभ्यास करून, सगळ्यांना विचारात घेऊन, एकोप्याने कामाला लागाल तर हा सप्ताह आपला होऊ शकेल.  आर्थिक आघाडीवरही हाच सल्ला पाळल्यास किमान अपेक्षित असा स्तर गाठता येणे शक्य. सासुरवाडीचा एखादा अनपेक्षित प्रश्न ऐन वेळी सोडवण्यासाठी सिद्घ व्हावे लागेल.

मीन - ग्रहमान खरे तर बरेचसे अनुकूल आहे. आपल्या प्रत्येक कामाला चांगले यश मिळणार आहे. उपास-तापास आणि काही धार्मिक संकल्पना यामुळे मात्र त्रास होणे शक्य आहे. सप्ताहात आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, कौटुंबिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्याही चांगली घोडदौड राखता येईल. आपल्या शब्दाला मान मिळेल. कोर्टदरबारच्या प्रकरणांना अपेक्षित वळण मिळेल. भागीदारीतून अपेक्षित फायदा होऊ शकेल. नोकरदारांनाही मिळालेले सहकार्यही मोठे फायदेशीर ठरेल. कुटुंबात सख्य राहील.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin