Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


जाणून घ्या या आठवड्याचे राशीभविष्य


Main News

मेष - एरव्ही अमावास्या ही आपल्यासाठी शुभ फलदायी असते. मात्र या सप्ताहातली अमावास्या ही ग्रहणाने दूषित आहे. त्यामुळे या सप्ताहात आपल्याला ताकसुद्धा फुंकून प्यावे लागणार आहे. नोकरी व्यवसायात काही गोष्टी उलटसुलट होऊ शकतात. अगदी हातातोंडाशी आलेला घास जाऊ शकतो. मोठ्या लाभाच्या आमिषेने नुकसान संभवते. पूर्ण खात्री केल्याशिवाय कोणाला कामाचा होकार देऊ नका. मोठी गुंतवणूक सध्या स्थगित करा. जुने विकार असलेले, शस्त्रक्रीया झालेले तसेच गर्भवती महिला यांनी या सप्ताहात पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे. 

वृषभ - भागीदारी व्यवसाय, कोर्टप्रकरणे, सामाजिक स्तरावरचे अप्रिय प्रसंग अशा माध्यमातून आपणास मनस्तापाचे प्रसंग येऊ शकतात. नशिबाचा फेरा केव्हाही पलटू शकतो. मात्र शिक्षण, कला, न्याय, साहित्य इ. क्षेत्रातील लोकांना हा सप्ताह चांगले काही देणारा ठरू शकतो. बढतीचे वेध लागतील. वरिष्ठांची नाराजी कमी करता येईल. आर्थिक गणिते चांगली जमतील. वैवाहिक जीवनात काही प्रसंग हे खरेच परीक्षेचे असतील. प्रेमप्रकरणांना वेगळे नकोसे वळण लागू शकते. घरातील ज्येष्ठांची तब्येत वा अन्य काही प्रश्न सगळ्यांचे वेळापत्रक बिघडवू शकतात. 

मिथुन - हितशत्रूंना परस्पर मिळत जाणारी उत्तरे, त्यांचे फसत जाणारे कारनामे, घरातील कोणाच्या आजारावर लागू पडत जाणारे औषध आणि नोकरी व्यवसायात मिळत जाणाऱ्या संधी यातून सप्ताह गाजणारा ठरणार आहे. आपणास मिळणारा एखादा सन्मान हा आपल्या अभिमानाचा विषय राहील. स्वत:च्या क्षमतांचा व बुद्धिमत्तेचा कस लागावा असे प्रसंग येतील आणि त्यात पासही होणार आहात. नोकरी व्यवसायात आपल्या नव्या कल्पनांचे स्वागत होईल. आर्थिक विकासाचे ध्येय गाठले जाईल. वैवाहिक जीवन आनंददायी राहील. 

कर्क - प्रत्यक्ष वस्तुस्थितीचे अवलोकन केल्याशिवाय स्वत:चे मत पक्के करू नका. आर्थिक दृष्टय़ा होणाऱ्या व्यवहारात घाई होणे परवडणार नाही. कोणालाही अविवेकी शब्द देऊन फसू नका. नवे काही मिळाले नाही तरी चालेल पण ‘चालू व्यवहारात चुकीचे निर्णय झाल्याने गोंधळ झाला’ असा पश्चात्ताप नंतर होणार नाही अशी काळजी घ्या. विचारपूर्वक केलेल्या व्यवहारात मोठी शिल्लक पाहायला मिळेल. साहित्य वर्तुळातून मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक असेल. नवे लिखाण व नवे विचार आपणास यशाच्या उंचीवर नेणारे ठरतील. घरगुती वातावरण मात्र सध्या मनासारखे नाही. 

सिंह - अजब असा नियतीचा न्याय पहायला मिळेल. ठरवणार एक, करावे लागणार दुसरेच. जावे एका दिशेने तर पोहोचणार भलतीकडेच. सध्या आपली फसगत पहायला काही जण टपून बसले आहेत हे विसरू नका. राजकारण, सामाजिक उपक्रम वा काही महत्त्वाचे असे व्यावसायिक निर्णय यात छोटीशी चूकही खूप काही किंमत मोजायला लावील. अपघात, घातपात, तीव्र मतभेद वा टोकाची भांडणे यांच्या जागा आधीच अभ्यासून शक्य ती उपाययोजना करा. कामाचे गणित व वेळापत्रक बिघडणार हे गृहीत धरून तसे नियोजन लवचीक ठेवा. फार मोठे धाडस या सप्ताहात आत्मघातकी ठरू शकते. 

कन्या - साहित्य, संगीत, कला, शिक्षण, व्यवसाय अशा अनेक क्षेत्रांतला आपला वावर हा लीलया राहील. नवे साहित्य वाचकांच्या पसंतीला उतरेल. नोकरदारांना अनेक चांगल्या संधी मिळतील.  हॉटेल, सोनेचांदीचे व्यापारी, पारंपरिक व्यवसायात असणारे तसेच शेअरमार्केटमध्ये काम करणारे यांना हा सप्ताह आर्थिक दृष्टय़ा चांगला जाईल. सरकारी ससेमिरा व अपघात यांच्यापासून वाचण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करा. कायदेशीर मार्ग सोडू नका. प्रवासात पुरेशी काळजी घ्या. एकीकडे उत्तुंग यश तर दुसरीकडे अशा काही अडचणी यातून मार्ग काढायचा आहे. 

तूळ - माणसांची पारख व व्यावसायिक अंदाज चुकणार नाही याची काळजी घ्या. उधारी वसुलीसाठी नको ते मार्ग अवलंबू नका. स्वत:बद्दल होऊ शकणारे गैरसमज वेळीच थांबवा. संगत कोणाची करतो आहोत, हेही पुन:पुन्हा तपासा. नवे व्यवहार, नवा व्यापार व नवे ग्राहक यांना सध्या फार महत्त्व देऊ नका. प्रवास, पत्रव्यवहार व भेटीगाठी यातून मार्ग मिळत राहील. बँकप्रकरणात अपेक्षित निर्णय घेता येतील. घरगुती आघाडी मात्र शांतता व समाधान देईल अशा अपेक्षा न ठेवलेल्याच बऱ्या. 

वृश्‍चिक - ग्रहणयुक्त अमावास्या असताना साडेसातीला बळ मिळत असते. या सप्ताहातली पिठोरी अमावास्या ही अशी आहे. सरकारी कामे वेळेत करा. कायदा मोडायचा विचार करू नका. सरकारी अधिकाऱ्यांशी वितुष्ट घेऊ नका. काही चांगली माणसे आपल्या आयुष्यात येतील. त्यांचा उपयोग करून घ्या. विचारवंत, हितचिंतक व नि:स्वार्थी लोकांचा उपयोग घेण्यास हा सप्ताह उत्तम आहे. त्यांच्या सल्ल्याने व ओळखीने पैशाची काही कामे चांगली मार्गी लागतील. अपघात व मतभेदांचा काळ अजून संपलेला नाही. 

धनु - सामाजिक व्यासपीठवरचा वावर, राजकारणाच्या आखाडय़ातील डावपेच, सार्वजनिक न्यासांच्या कामकाजातील निर्णय व घरगुती उपक्रमातील प्रतिक्रिया याबाबत फार सतर्क राहणे गरजेचे आहे. ही काळजी घेतल्यास सप्ताह अनेक बाबतीत चांगले यश देणारा ठरू शकतो. ज्येष्ठ व अनुभवी लोकांचा सल्ला उपयुक्त ठरेल. सकारात्मक विचारसरणीचा फायदा होईल. नोकरदारांनाही प्रगतीच्या संधी मिळतील. शिक्षण क्षेत्रात असणाऱ्यांनी मात्र जरा सबुरीनेच वागावे. विवाहेच्छूंसाठी चांगले प्रस्ताव येतील. 

मकर - आरोग्य हे जाणीवपूर्वक संभाळावे लागते तसेच पथ्य व औषधे या दोन्हीचा अवलंब करावा लागतो हे या सप्ताहात आपणास आवर्जून सांगावे लागेल. कारणही तसेच आहे. नशिबाची साथ या सप्ताहात आपल्याला चांगली मिळणार आहे. काही अपेक्षित व्यवहार मनासारखे घडणार आहेत. कुठे थांबायचे हे लक्षात यायला झालेला उशीर काही आजारपण घेऊन येऊ शकतो. जुने विकार असणाऱ्यांनी जास्त सतर्क राहणे गरजेचे. वैवाहिक जोडीदाराची तब्येतही दुर्लक्षित करून चालणार नाही. 

कुंभ - अवास्तव कल्पना, अतिरंजित आत्मस्तुती व अविवेकी वागणे यातून भलत्याच वळणावर जाऊन पोहोचणे शक्य. आहे तो व्यवसाय व नोकरीतली आहे ती स्थिती संभाळण्यावर भर द्या. तोंडी व्यवहारांपेक्षा लेखी व कायदेशीर व्यवहारांनाच प्राधान्य द्या. उधारीवसुलीतून आर्थिक ध्येय गाठता येणे शक्य. शक्यतो कोठे मध्यस्थी करायला जाऊ नका. विचारल्याशिवाय सल्ला देणे व मतप्रदर्शन करणे टाळा. वैवाहिक जोडीदाराची मते अगदीच धुडकाऊन लाऊ नका. त्यांच्या तब्येतीची आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे.

मीन - हृदयविकार वा त्वचाविकार असणाऱ्यांनी या सप्ताहात काळजी घेणे गरजेचे ठरावे. ही काळजी घेतल्यास सप्ताह आपणास काही बाबतीत अनपेक्षित यश देणारा ठरू शकतो. जोडीदाराची मदत, सहकाऱ्यांचे सहकार्य, वरिष्ठांचा पाठिंबा व थोरामोठय़ांचे आशीर्वाद या शिदोरीवर वेगाने पुढे जाता येईल. कामाचे गणित छान जमेल. मिळणाऱ्या संधीचे सोने करता येईल. कंटाळा, चालढकल व वेळकाढूपणा आवर्जून टाळा. नोकरदारांना बढतीसाठी व अपेक्षित ठिकाणासाठी केलेले बदलीचे प्रयत्न सफल ठरतील. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin