Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


या आठवड्याचे राशीभविष्य


Main News

मेष -  शनी-मंगळाचे योग हे आपल्याला कोणत्या वळणावर नेऊन ठेवतील हे सांगता येत नाही. घाई, गडबड, कोणताही अतिरेक, रागाचे टोक, अहंकाराचा फणकारा अशा सगळ्या शक्यता पडताळून पाहात त्यावर नियंत्रण ठेवणे हे आपल्याच हाती असेल. कुठेही स्वत:ला फार मोठे न समजता जमिनीवरचा प्रवास करणे हे हितकारक ठरेल. एकीकडे मानसन्मान व आरोग्य प्रश्नातही स्वत:चेच डोके वापरून भलतेच काही करून बसाल तर पुढे मोठे अनर्थ होणे शक्य. 

वृषभ -कुठेही वाद न वाढवता व्यवहारात व व्यवसायात लक्ष घालायचे आहे. शिक्षण, साहित्य, कला, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांत आपली घोडदौड चालू राहणार आहे. आपले हितसंबंध ज्याच्यात असेल त्याच गोष्टींना प्राध्यान्य द्या. नवे मोठे वायदे व मोठे कंत्राट सध्या काही दिवस स्थगित ठेवलेले बरे. सध्या सामाजिक क्षेत्रातही मतभेदांचे वारे आहेत. आपल्याबद्दल गैरसमज पसरणार नाही याची काळजी घ्या. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनाही सध्या सबुरीचा सल्ला आहे. 

मिथुन - आपल्या क्षेत्रातला मानसन्मान मिळणे शक्य. त्याच क्षेत्रातील यशाचे उच्च टोकही गाठणे शक्य. आपल्या शब्दाला सप्ताहात मान मिळेल. अभ्यासपूर्ण केलेल्या वक्तव्यातून व कृतीतून फायदेही होतील. आर्थिकदृष्टय़ाही सप्ताहात अनेक चांगल्या घडामोडी घडणार आहेत. तांत्रिक व कायदेशीर चुका आपल्याला टाळता येतील. या दृष्टीने सप्ताहात आपले नियोजन अवश्य ठेवा. हितशत्रूंकडे सध्या लक्ष देण्याची गरज नाही. मात्र आपले आरोग्य प्रश्न तसेच वैवाहिक जोडीदाराचे मत याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणेही धोक्याचे ठरू शकते. 

कर्क -  सप्ताहातले नियोजनही व्यावहारिक पातळीवरच करणे जास्त महत्त्वाचे ठरावे. प्रसिद्धी, मानसन्मान या गोष्टी या सप्ताहात आपल्यासाठी ठरलेल्या आहेत. थोरामोठय़ांकडून मिळणारी वाहवा आणि साहित्य क्षेत्रातून होत जाणारे नाव यांचा अचूक फायदा घेऊ शकाल. अपघाताच्या शक्यता जागोजागी लक्षात घेऊन पुरेशी उपाययोजना करा. सध्या आपले चांगले दिवस आहेत त्याचा फायदा घ्या. भाऊबंदकीच्या वादात श्रीकृष्ण जयंतीच्या आसपास मतभेदांचे टोक असणे शक्य. व्यावहारिक व व्यावसायिक जगात येणारे अंदाज अचूक ठरतील.

सिंह - अभ्यास, अनुभव, परिस्थिती हाताळण्यातले यश आणि मित्रांचा सहभाग या गोष्टी प्रत्यक्ष हाताशी आहेत तरीही परिस्थितीवर योग्य तो मार्ग सापडत नाही. अशा स्थितीतून जाताना आपला अहंकार कुठेही उफाळून येऊ देऊ नका. एकाचा राग दुसऱ्यावर काढू नका. वाहनांच्या अपघातांच्या शक्यता वेळोवेळी लक्षात घेऊन पुरेशी काळजी घ्या. वाहनांचा वेग, चाकातील हवा आणि ब्रेक या गोष्टी जागोजागी तपासणे आपल्या हिताचे ठरेल. स्थावराच्या बाबतीत उद्भवणारे प्रश्न मनस्तापदायक असतील. 

कन्या - सांस्कृतिक व्यासपीठांवरून मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक असेल. साहित्यक्षेत्रातून वाहवा होईल. शिक्षण, न्याय, कला आणि साहित्य या क्षेत्रात आपला दबदबा वाढेल. अनेक कल्पना प्रत्यक्षात आणू शकाल. या सप्ताहात प्रवास मात्र अतिशय गरजेचे असतील तरच करणे हिताचे ठरेल. अपघातांच्या, वादविवादांच्या, घातपातांच्या आणि मतभेदांच्या जेथे जेथे शक्यता वाटतील तेथे तेथे शक्यतो त्या वाटेला न जाणे. जावेच लागले तर पुरेशी उपाययोजना, शांत डोके आणि स्थिर मन यांचा सतत पाठपुरावा करणे आपल्या हिताचे ठरेल. 

तूळ - पूर्णपणे मोकळ्या मनाने आणि सगळे आपल्यासाठी अनुकूलच आहे, अशी शक्यता कमीच आहे. आपला समतोल स्वभाव या सप्ताहात उपयुक्त ठरणार आहे. वैवाहिक जीवनातील, मित्रांसमवेतचे, तसेच प्रतिस्पध्र्याशी होत असलेले मतभेद प्रयत्नपूर्वक थांबवा. वडिलोपार्जित इस्टेटीच्या वादात निर्णायक अवस्था आणू नका. आर्थिक यश पुरेसे मिळत राहणार असले तरी त्यात समाधान मानणेही गरजेचे ठरेल. वैवाहिक जीवनात काहीसे गैरसमजाचे वातावरण असेल. प्रेम प्रकरणात मात्र भलतेच टोक गाठणे शक्य. कुठेही त्याचा आगडोंब उसळेल असे होऊ देऊ नका.

वृश्‍चिक - आपल्या राशीत होणारी शनी-मंगळांची युती आपल्याला अनेक ठिकाणी अडचणीची ठरू शकते. कुठेही सूडाचे, अहंकाराचे, प्रतिशोधाचे किंवा राग-लोभाचे टोक गाठू नका. त्याने नुकसानच होऊ शकते. आर्थिकदृष्टय़ा चांगले ग्रहमान असताना स्वत:च्या काही चुकांमुळे त्यावर पाणी पडणे शक्य. आर्थिक स्तरावर आपले निर्णय चांगले होतील. आर्थिक फायदाही घेता येईलही, पण अनपेक्षित आजार आणि अपघाताच्या शक्यता लक्षात घेऊन पुरेशी उपाययोजना कराच. 

धनु - सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व्यासपीठांवरून आपला मोठा वावर राहील. कुठेही द्वर्थी शब्द बोलून आपल्या यशावर धोंडा पडणार नाही याची काळजी घ्या. मतभेद आणि गैरसमज वेळीच थांबवा. आर्थिकदृष्टय़ा संपन्नतेकडे होणारी वाटचाल, अशा काही चुकांमुळे खंडित होऊ शकते. व्यवसाय किंवा व्यापाराच्या नव्या क्षितिजावरआपला वावर सहजच होत राहील. अंदाज अचूक ठरतील. तिथे येणारे अनुभव आगामी काळात महत्त्वाचे आणि उपयुक्त ठरतील. शिक्षण व साहित्य क्षेत्रात असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळणार आहेत. वैवाहिक जीवनात छान ताळमेळ राहील. 

मकर - आर्थिक व्यवहार, सामाजिक कार्य, सांस्कृतिक कार्यक्रम वा कौटुंबिक उपक्रम यात होणाऱ्या तांत्रिक व कायदेशीर चुका या सप्ताहात क्षम्य ठरणार नाहीत. अपघातांच्या, घातपातांच्या आणि मतभेदांच्या शक्यता वाटतात तिथे उपाययोजना करा. बौद्धिकदृष्टय़ा, शैक्षणिकदृष्टय़ा, तसेच साहित्यिक क्षेत्रात आपल्याला चांगले दिवस आहेत. कलाक्षेत्रातूनही चांगली साद मिळत राहील. केलेल्या कामाचे चीज होत राहील. वैवाहिक व कौटुंबिक जीवनातही किरकोळ मतभेद वगळता आलबेल असेल. 

कुंभ - व्यापार, व्यवसाय किंवा कामाच्या ठिकाणी अपघातांच्या शक्यता घेऊन विशेष काळजी घ्या. व्यावसायिक मतभेद काही दिवस बाजूला ठेवा. नवीन कामापेक्षा जुनी उधारी वसूल करीत राहणे महत्त्वाचे. जे मिळेल त्यात समाधान माना. वैवाहिक व कौटुंबिक जीवनातही काही दिवस मौन धरण्याचे आहेत. विचार कितीही खरे असले तरी समोरच्याला पटतीलच असे नाही. त्यातील सत्यता प्रत्यक्ष समोर येईल तेव्हा आपले सत्य लोकांना कळेल. आरोग्याच्या बाबतीत कोणतीही हयगय करू नका. 

मीन - अडथळ्यांची शर्यत पार करता येणार आहे. आर्थिकदृष्टय़ा अपेक्षित यश गाठता येईल. भागीदारीमध्ये तसेच वैवाहिक जीवनात मतभेद थांबलेले असतील. सहमतीच्या व्यवहारातून पुढे जाता येईल. एखादा संशोधन प्रकल्प उभा करता येईल. शिक्षकी पेशात असणाऱ्यांना मान-सन्मान मिळेल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात बऱ्याच अंशी आनंदाचे वातावरण राहील. प्रेमप्रकरण व विवाहेच्छुंचे प्रश्न मार्गी लागण्याच्या शक्यता वाढलेल्या आहेत, तसेच संततीच्या अपेक्षेत असणाऱ्यांना हा काळ गोड बातमी देणारा ठरू शकतो.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin