Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


या आठवड्याचे जाणून घ्या राशीभविष्य


Main News

मेष - सध्या आपल्याला अपघातांच्या शक्यता लक्षात घेऊन अनेक ठिकाणी योग्य ती उपाययोजना करायची आहे. आगामी सुमारे दोन-तीन आठवडे या बाबतीत सतर्क राहायचे आहे. ही काळजी घेतल्यास आपल्याला या सप्ताहातही अनेक बाबतींत प्रगतीचे मोठे टप्पे गाठता येणार आहेत. कला, साहित्य, क्रीडा इ. क्षेत्रांतून पुढे जाण्याच्या मोठ्या संधी मिळतील. वैवाहिक जीवनात तसेच प्रेमप्रकरणात गाडी प्रगतीकडे जाताना दिसेल. संततीच्या अपेक्षेत असणाऱ्यांना गोड बातमी कळेल. 

वृषभ- भावभावनांच्या कल्लोळात आपले व्यवहारी मन भारी ठरणार आहे. मात्र कुठेही दुसऱ्याला दुखावले जाईल असे वागू नका. व्यापार- व्यवसायात सहमतीनेच पुढे जाता येणार आहे. गोड बोलून कार्यभाग साधा. व्यापाराच्या नव्या क्षितिजावर मोठी पताका लावता येणार आहे. नवे व्यावसायिक आपले व्यवसायबंध दृढ करू शकतील. आर्थिकदृष्टय़ा बऱ्याच अंशी अनुकूलता मिळणार आहे. वाडवडिलार्जित किंवा स्वकष्टार्जित स्थावराचे प्रश्न मोठय़ा वादात अडकणे शक्य. वैवाहिक जीवनातले मतभेद फार बिघडू देऊ नका. 

मिथुन -  प्रवास, पत्रव्यवहार, दळणवळण या माध्यमातून अनेक गोष्टी प्राप्त करू शकाल. आपला अभ्यास, अनुभव आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यांचा चांगला ताळमेळ घालू शकाल. व्यापार व्यवसायाच्या नव्या क्षेत्रात पदार्पण कराल. जुन्या क्षेत्रातून अजूनही चांगल्या संधी आहेत. कुठेही जास्तीचे बोलणे टाळा. विचारल्याशिवाय सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका अन्यथा नसते बालंट अंगावर येणे शक्य. वैवाहिक व कौटुंबिक जीवनातही सध्या आनंददायी वातावरण असेल.

कर्क -  नातेसंबंधात छोट्या कारणांवरून मनं कलुषित होणार नाहीत याची काळजी घेतल्यास सप्ताहात अनेक बाबतीत मोठी अनुकूलता मिळत राहणार आहे. व्यावहारिक जगतात आपला शब्द प्रमाण मानला जाईल. गुंतवणुकीच्या नव्या संधी समोर येत राहतील. नोकरदारांचे आपल्या बढतीच्या दिशेने केलेले प्रयत्न सत्कारणी लागतील. भावनिक मनाचा सकारात्मक उपयोग करून घेतल्यास या सप्ताहात मोठे यश गाठणे सहज शक्य आहे. मुलांच्या किंवा संततीच्या दृष्टीने मात्र उद्भवणारे प्रश्न हे अवश्य विचाराधीन ठेवा.

सिंह -अडथळे आणि विरोध यांचा सामना करीत आपल्याला आगामी काही दिवस स्वस्थ आणि शांत मनाने परिस्थितीला सामोरे जायचे आहे. आता केलेले प्रयत्न वाया जातील, असे समजण्याची गरज नाही. तरीही हातात आहे आणि प्रत्यक्षात नाही अशी स्थिती अनुभवू शकाल. गोड बोलून शांत मनाने विचार करीत पावले टाका. यातून गरजेइतके तरी पदरात पडेल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे. त्यातही शांतपणे विचार करून मतभेदांवर मर्यादा आणा. तडजोड आणि क्षमाशीलतेतून बरेच काही हाती लागेल.

कन्या -आपले निर्णय अनपेक्षित आणि अकस्मात बदलू नका. पूर्ण विचार करूनच पावले टाका. महत्त्वाचे दस्तऐवज, मौल्यवान वस्तू व आपली व्यावसायिक गुपिते यांना वेगळी वाट फुटेल त्या शक्यता लक्षात घेऊन उपाययोजना करा. आर्थिकदृष्टय़ा थेट फायद्याची अपेक्षा न धरता जे मिळेल ते पदरात पाडून पुढे चला. वैवाहिक जीवनात त्या मानाने बऱ्याच अंशी एकत्व अनुभवायला मिळेल. प्रेमप्रकरणे असो किंवा मोठय़ा भांडणातील टोक, सध्या ‘जैसे थे’ स्थिती ठेवणे जास्त हिताचे. जास्तीचे बोलणे टाळले तरी ते योग्य ठरेल.

तूळ - घरगुती आणि कौटुंबिक वादविवाद, मतभेद यांना महत्त्व न देता त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करणे हे जसे कौटुंबिकदृष्टय़ा महत्त्वाचे आहे तसेच व्यावहारिक आणि व्यावसायिक जगात आपली सगळी शक्ती पणाला लावणे हेही महत्त्वाचे आहे. बाहेरच्या जगात आपल्याला मिळणारा मानसन्मान आणि व्यावसायिक प्रगती यांचा हात सध्या कोणी धरू शकणार नाही. या दरम्यान भागीदारी असो, कोर्टप्रकरणे असोत किंवा अनपेक्षित उद्भवणारे वादविवादाचे प्रसंग असोत यावर वेळीच तोडगा काढून त्या गोष्टी काही दिवस बाजूला ठेवा. वैवाहिक जीवनात अनपेक्षित अशी वादळे उठणे शक्य. 

वृश्‍चिक - शनी-मंगळाचे योग आपल्या राशीतून चालू आहेत. साडेसातीचे हे वरचे टोक असते. विशेषत: अनुराधा नक्षत्र गटाने सध्या कुठेही फार मोठे निर्णय किंवा मोठे व्यवहार यांना स्थगिती द्यावी. सध्या आपले दिवस नाहीत हे गृहीत धरून पुढे जा. मतभेदांच्या शक्यता दिसल्यास दोन हात दूर थांबा. कोणाच्याही मध्यस्थीच्या भानगडीत पडू नका. सरळमार्गी केलेल्या व्यवहारात निदान पोटापुरते नक्की मिळत राहील. वैवाहिक व कौटुंबिक जीवनातही अशांतता हा भाग असू शकतो. सगळीकडे जपून राहणे हेच महत्त्वाचे.

धनु -  भाग्यातले ग्रहप्राबल्य, दहावा गुरू आणि अशुभ स्थानातले शनी- मंगळ ही स्थिती एकूणच आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याचे आहेत. याचा विचार करून सप्ताहातली व आगामी काही काळातली आखणी करा. यशाच्या परिसीमा गाठता येणार आहेत. पण त्याच वेळी मतभेद आणि वादविवाद यांना थारा देऊ नका. महत्त्वाचे दस्तऐवज व मौल्यवान वस्तू यांना पाय फुटू देऊ नका. हा काळ आपला स्वप्नपूर्तीचा ठरू शकतो. वैवाहिक व कौटुंबिकदृष्टय़ाही अनेक गोष्टी मनासारख्या असतील. 

मकर - काही गोष्टी या आपल्या हाताबाहेर असतात याचे भान ठेवा. कुठेही माझ्याच मताने मी चालेन असे होऊ देऊ नका. जे मिळेल ते पदरात पाडून घेत पुढे चला. नशीब आपल्या बाजूने कौल देणार आहे त्या दृष्टीने उधारी वसुलीवर लक्ष ठेवा. अर्धवट राहिलेल्या कामाचा पुढे जाऊन मोठा त्रास होणे शक्य. आरोग्याच्या बाबतीत चालढकल करू नका. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात सध्या मिळणारा पाठिंबा हा मात्र आपला ऊर्जास्रोत असणार आहे. तिथे तरी कोणाला दुखवू नका.

कुंभ- अतिशय कौशल्याने आपल्याला वाटचाल करायची आहे. कुंभ राशी ही अतिशय विचार करणारी राशी समजली जाते. आपला अभ्यास, पूर्वानुभव आणि आपल्यासारख्याच अनुभवी लोकांचा सल्ला यांचा अतिशय चपखल उपयोग करून घेता येणार आहे. कोर्ट प्रकरण पुढे ढकलणे हिताचे. व्यावसायिक व व्यावहारिक जगात शक्य ती तडजोड करा. नोकरदारांनी अन्य कोणाच्या तुलनेत आपले काम तपासण्याची गरज नाही. स्थावराच्या बाबतीत मात्र केलेली घाई-गडबड अंगलट येऊ शकते हे विसरू नका. 

मीन - व्यावहारिक कसोट्यांवर प्रत्यक्ष निर्णय घेत पुढे चला. फार दोलायमान स्थितीत राहणे नुकसानकारक ठरू शकते. व्यापार-व्यवसायातही आपल्याला जे मिळेल ते घेत पुढे जावे लागणार आहे. आरोग्यदृष्टय़ा शक्य आहे ती सगळी काळजी घेणे हिताचे ठरणार आहे. कुठेही अतिरेक होऊ देऊ नका. हितशत्रूंच्या कारवायांवर सूक्ष्म लक्ष असू द्या.  बँक प्रकरणे आणि कर्जाचे हप्ते या गोष्टी सहजच पार करता येतील. वैवाहिक जीवनात सहमतीचे व विश्वासाचे वातावरण असेल. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin