Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


या आठवड्याचे राशीभविष्य


Main News

मेष - ग्रहांची अनुकूलता बऱ्याच अंशी आहे. आरोग्यप्रश्न वेळीच थांबवल्यास आर्थिक प्रश्नाकडे योग्य ते लक्ष पुरवता येणार आहे. कामाच्या दृष्टीने योग्य ती आखणी करणे जास्त महत्त्वाचे ठरेल.  शैक्षणिक संधी दुर्मीळ असतील. आपले सगेसोयरे आणि नातेवाईक यांना हाताळण्यात कोणतीही चूक करू नका. कुठेही मुद्दा थेट प्रतिष्ठेपर्यंत नेऊ नका. तडजोडीतून यशाचा मोठा मार्ग मिळत राहील हे विसरू नका. वैवाहिक जीवनात मिळणारा पाठिंबा चांगला असेल.

वृषभ - कुठेही अतिविश्वास किंवा फाजील कृती अंगाशी येऊ शकते. नोकरी असो किंवा व्यवसाय, समोरच्याला नीट ओळखल्याशिवाज आपल्या कोणत्याही गोष्टी त्याच्या स्वाधीन करणे हिताचे ठरणार नाही. कोणतेही निर्णय घेताना अनुभव आणि अभ्यास याची गरज आहे. कोणत्याही ठिकाणी नियम ओलांडण्याचा प्रयत्न करू नका. स्थावराचे प्रश्न काही दिवस स्थगित ठेवा. वैवाहिक जीवनातील मतभेदांना कुठेतरी मर्यादा आणा. 

मिथुन - भागीदारी किंवा वैवाहिक जीवनातील जोडीदार यांच्या मनाचा थांगपत्ता लागणे अवघड आहे. प्रवास, पत्रव्यवहार, प्रसिद्धी आणि सामाजिक कार्य या गोष्टींमध्ये थोडे अंग चोरूनच काम केलेले बरे. कोणत्या गोष्टीचा भलताच अर्थ निघेल आणि गैरसमजातून वादळ निर्माण होईल हे सांगता येत नाही. आरोग्यदृष्टय़ा फार मोठे धोके नसले तरी किरकोळ गोष्टींमुळे आजारी पडून वेळ वाया जाणे शक्य. आर्थिकदृष्टय़ा थेट कामे होणे संभव नाही.

कर्क - सप्ताहातले अन्य ग्रहमान पाहता या सप्ताहात शुक्रवार १२ तारीख सोडली तर बऱ्याच अंशी अनुकूलता आहे. शुक्रवारी मात्र कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. तसेच त्या दिवशी स्वत:ला एकांतात ठेवणे योग्य नाही. बाकी सप्ताह अनेक बाबतीत अनुकूल ठरणार आहे.कामाचे गणित बरोबर जमेल. येणाऱ्या बातम्या आणि मिळणारे संदेश यातून अपेक्षित असे निर्णय घेत योग्य ती वाटचाल करता येईल. थोरामोठय़ांचा आशीर्वाद आणि सहकार्य आपल्याला अपेक्षित पल्ला गाठण्यास मदत करणारे ठरेल. 

सिंह - अपेक्षेपेक्षा मोठा पल्ला गाठण्यासाठी थोरामोठय़ांचा सल्ला आणि मुळातला अभ्यास या गोष्टींची गरज आहे. आर्थिकदृष्टय़ा सप्ताह बऱ्याच अंशी मनासारखा आहे. बढतीच्या दिशेने केलेल्या प्रयत्नात नोकरदारांना यश मिळेल. व्यापारी वर्गाला सरकारी नियमांचा जाच होणे शक्य. कुठेही कायदा मोडून भलतेच निर्णय घ्याल तर अंगाशी येणे शक्य. कौटुंबिक जीवनात अजूनही मतभेदांची दरी राहणार आहे. त्यात लगेच मार्ग निघेल अशी अपेक्षा करू नका. 

कन्या -  आत्तापर्यंत अडून राहिलेल्या कामांना कुठेतरी गती मिळेल. न सुटलेल्या प्रश्नांमध्ये श्वास घेण्याइतपत जागा होईल. निर्णयाच्या द्वंद्वावर अडकलेली अनेक कामे मार्गी लागण्याच्या वाटेवर येतील. नोकरदारांना वरिष्ठांची नाराजी कमी करण्याचे संकेत मिळतील. गुंतवणुकीचे पर्याय वेळोवेळी पुन्हा तपासून पहाणे अजूनही गरजेचे ठरावे. आíथकदृष्टय़ा अगदीच वाताहात नाही. पुरेसे व्यवहार होत राहतील आणि आगामी अनुकूलतेचे संकेत मिळतील. वैवाहिक जीवनात सध्या वेगळे आनंदपर्व सुरू होत आहे. 

तूळ - थोरामोठय़ांना न दुखावता त्यातील योग्य तो फायदा आपल्यासोबत घेत चला. भाऊबंदकी, वडिलार्जति इस्टेट आणि स्थावरजंगम या गोष्टी विवादास्पद ठरणार आहेत. त्यात फार वेळ दवडू नका. नोकरी व्यवसायात स्वतला सिद्ध करण्याचे अनेक प्रसंग येणार आहेत. त्या संधी योग्य वेळी घेणेच आपल्या हिताचे ठरणार आहे. नोकरदारांचा अतिवरिष्ठांशी येणारा संपर्क पुढील वाटचालीसाठी मोठा फायदेशीर ठरेल. व्यापारी वर्गाला खुणावणारे नवे व्यवसायाचे वळण फायदेशीर ठरेल. 

वृश्‍चिक - नोकरी व्यवसायातल्या कामांमध्ये आपली आघाडी कायम राखू शकणार आहात. आíथक फायद्याचे गणित बऱ्यापकी जमवून आणता येईल. अडथळ्यांची शर्यत पार कराल. नातेवाईक व मित्रपरिवार यांना सुरक्षित अंतरावर ठेवा. ज्येष्ठांच्या मदतीने मार्ग सुकर होईल. नोकरदारांनाही सध्या हायसे वाटावे असे ग्रहमान आहे. शिक्षण व व्यापार क्षेत्रातल्या लोकांना हा सप्ताह एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवणारा ठरू शकतो. वैवाहिक व कौटुंबिक जीवनातही बरेचसे मतभेद कमी होत येतील. 

धनु - आपले सामाजिक कार्य, राजकीय मंडळींबरोबर असलेली ऊठबस, आपल्या हाती असलेले व्यापारातील हुकुमाचे पान आणि मित्रपरिवारांमध्ये आपली होत असलेली वाहवा अशा सगळ्या आघाडय़ांवर स्वतला चांगले सिद्ध करत वाटचाल चालू राहणार आहे. या सप्ताहात या सगळ्यांना एक चांगली किनार मिळणार आहे. आपले गणित कुठेही चुकणार नाही याची काळजी घ्या. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या माध्यमातून काही नवे व्यवहार मार्गी लागतील. त्यामुळे कौटुंबिक गणितही चांगले जमून येणार आहे. 

मकर - सप्ताहात होणारा गुरूबदल आपणास काहीसा अनुकूल आहे. गुरूचे भ्रमण आपल्यासाठी थेट परिणामदायक नसले तरी काही माध्यमातून आपल्याला ती चांगली फळे इथूनपुढे अनुभवायला येणार आहे. घरातील अडलेल्या अनेक प्रश्नांमधून मार्ग निघणार आहे. कामांमध्ये झालेले गरसमज बऱ्यापकी दूर होण्याच्या शक्यता आहेत.वैवाहिक व कौटुंबिकदृष्ट्या फार मोठे प्रश्न नसले तरी भावभावनांचे कल्लोळ मनामध्ये जास्तच राहिल्याने होणारे शारीरिक त्रास थांबवणे आपल्याच हाती असेल.

कुंभ -  सहकार्याची मिळणारी साथ, ज्येष्ठांचा मिळणारा सल्ला, आपला अनुभव आणि नव्यानेच समोर येणारे नवेनवे संशोधन यातून आपला दीर्घकालीन प्रगतीचा पल्ला गाठण्यासाठीचा प्रवास सुरू होऊ शकतो. आगामी काळासाठी हाती घेतलेल्या कामात मोठी वाटचाल करता येईल. नोकरी व्यवसायात समविचारी लोकांना बरोबर घेऊन चला. कौटुंबिक व वैवाहिक जीवनातले काही प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुटुंबातील ज्येष्ठांचा सहभाग महत्त्वाचा ठरेल. 

मीन - आजवर सहावा असलेला गुरू येत्या अकरा तारखेला सातवा होत आहे. आपल्यावर त्याची येणारी कृपादृष्टी ही आपल्याला अनेक कामांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणायला मोठी मदत करणारी आहे. विरोधकांचे डावपेच गळून पडतील. हितचिंतकांचे कार्यही आपल्याला मदत करणारे ठरेल. नोकरी व्यवसायात अपेक्षित अशा तडजोडीतून चांगला मार्ग निघत जाईल. व्यसन, प्रलोभन मात्र फारच महागात पडेल.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin