Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


वाचा या आठवड्याचे राशीभविष्य


Main News

मेष- सप्ताहातली अमावस्या व्यावसायिक व सामाजिकदृष्टया चांगले मोठे फळ पदरात पाडून देणारी ठरणार आहे. विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या मेष राशिगटांना हा सप्ताह विशेष उंचीवर नेऊन ठरणारा ठरू शकतो. जुन्या ओळखी, नवे होणारे व्यवहार आणि हाताशी असलेली कागदपत्रे यांचा सुयोग्य वापर करून आपली प्रगतीची वाटचाल गतिमान करू शकाल. अपेक्षित यश मिळवण्यासाठी फक्त कोणाला दुखावणार नाही एवढी काळजी घ्या. स्थावराचे एखादे भिजत घोंगडे मात्र त्रासदायक ठरू शकते. 

वृषभ - विविध अडचणींतून मार्ग काढताना जी कामे पूर्ण होऊन आपल्याला फायदेशीर ठरू शकतील, अशाच कामात हात घाला. वेळ वाया जाणार नाही असे पाहा. प्रवास, पत्रव्यवहार यांचा कंटाळा करू नका. स्थावराचे प्रश्न काही अंशी मार्गी लागतील. नव्या नोकरीमध्ये बस्तान बसवणे थोडे जड जाईल. नवीन ग्राहकांना संतुष्ट ठेवण्यासाठी विविध युक्त्या योजाव्या लागतील. आर्थिकदृष्ट्या सप्ताह अगदीच प्रतिकूल नसला तरी अपेक्षित साद मिळण्यासाठी स्वत:चा गोड बोलण्याचा स्वभाव चालू ठेवा. 

मिथुन - कुठेही कोणावर अतिविश्वास ठेवून मोठे व्यवहार करू नका. अनोळखी लोकांचा हवाला देण्याच्या भानगडीत पडू नका. सरळमार्गी व्यवहारातून निदान काही तरी पदरात पडेल याची जाणीव ठेवा. आपल्याकडे असलेली कागदपत्रे आणि पुरावे यांचा नोकरी-व्यवसायातील कामांमध्ये उपयोग करून घ्या. कोर्टदरबार किंवा पोलीस चौकीची प्रकरणे काही दिवस पुढे ढकला. आत्मविश्वास कमी होईल असे विचार टाळा. प्रवाहातून काही चांगल्या गोष्टी हाती पडू शकतील. आरोग्याच्या बाबतीतही विशेष काळजी घेणे हिताचे ठरेल. 

कर्क - आश्लेषा नक्षत्र गटांनी मानसिकता सांभाळणे हिताचे ठरावे. कोणतेही गैरसमज मुळातूनच तपासणे हिताचे. कोणत्याही भावनिक प्रश्नात जास्त खोल न जाता व्यावहारिक विचार करून पुढे चाला. सध्या खरे तर करियरच्या दृष्टीने मोठा पल्ला गाठता येणार आहे. थोरामोठय़ांच्या ओळखीचा आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादाचा फायदा होईल. मेजवानीचे बेत आखले जातील. प्रवासातून योग्य तो संदेश मिळत राहील. मुलांच्या दृष्टीने अवघड होत चाललेले प्रश्न सुटण्याच्या मार्गावर येतील. 

सिंह - कोणाची थट्टा करायला जाल किंवा कोणाचा अनपेक्षित असा हवाला द्यायला जाल तर चांगलेच अंगाशी येणे शक्य आहे. पूर्ण माहिती असल्याशिवाय कोणत्याही व्यवहारात खोल पाऊल टाकू नका. समाजकारण, राजकारण, अर्थकारण इ. क्षेत्रांत जपून पावले टाका. एकीकडे मोठा दरारा वाढत असताना दुसरीकडे हितशत्रूंच्या कारवाया वाढणार आहेत. ते बेदखल असणे हितकारक नाही. घरातील स्थावराचे किंवा भाऊबंदकीचे प्रश्न फारच कुशलतेने हाताळा. 

कन्या - कायद्याच्या कचाट्यात एखादा व्यवहार अडकण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत थोरामोठय़ांचा सल्ला, दीर्घ अनुभव आणि वस्तुस्थिती यासोबत कायद्याच्या प्रत्येक बाजूचा विचार करीत मोठे व्यवहार पूर्ण करा. कोणावर फाजील विश्वास ठेवणे मोठे धाडसाचे ठरू शकते. प्रवास, पत्रव्यवहार, कागदपत्रांची जपणूक या गोष्टी गांभीर्याने घ्या. जे मिळेल ते पदरात पाडून घ्या. चुका न करता वाटचाल करा. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात काही गैरसमजातून वादळ उठणे शक्य. 

तूळ - दशमस्थानात होणारी अमावास्या आणि लाभस्थानातले ग्रहमान आपल्याला यशाच्या एका विशेष उंचीवर नेऊन ठेवणारे ठरू शकते. आपला अनुभव, अभ्यास आणि प्रत्यक्ष कृती यांचा चांगला मेळ घालू शकाल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न आवर्जून करा. कोणालाही न दुखावता केलेल्या कृतीतून मोठे यश हाती लागू शकेल. नोकरदारांना वरिष्ठांच्या मदतीचा फायदा होईल. राजकारण्यांशी होणारी जवळीक फायदा देऊन जाईल. 

वृश्‍चिक - आषाढी अमावास्या आपल्याला प्रगतीच्या दिशेने नेणारी आहे. थेट फायदा पदरात पडणार नसला तरी तयार होणारी एकूण अनुकूलता आपल्याला विशेष आनंदित करणारी ठरेल. आजपर्यंतचा झालेला दुरावा कमी होईल. प्रश्नांना योग्य उत्तरे मिळत राहतील. आर्थिक प्रश्नांतली तीव्रता कमी होत राहील. घेतलेला ध्यास सत्कारणी लागेल. सध्या साडेसाती असली तरी अनेक बाबतींत होणाऱ्या अनुकूलतेचा फायदा घेऊ शकाल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनातही बऱ्याच अंशी वातावरण निवळलेले असेल. 

धनु - चुकून खाल्लेला एखादा पदार्थ किंवा नको ते प्रलोभन भलत्याच वाटेने नेऊ शकते. केवळ जिभेसाठी न खाता तब्येत जपण्यासाठीच खायचे हे लक्षात ठेवा. ही काळजी घेतली तर सप्ताहातली अनुकूलतेची दिशा विस्तारत जाणार आहे. कोर्टप्रकरणे, वा अनपेक्षित असे गुंतवणुकीचे आलेले मोठे पर्याय हे सध्या स्थगित ठेवणेच हिताचे. कुठेही बेकायदेशीर वाट चाखायला जाऊ नका. वैवाहिक व कौटुंबिक जीवनातही आरोग्य प्रश्न सोडल्यास बऱ्याच अंशी मनासारखी स्थिती असेल.

मकर - स्वत:ची मानसिकता आणि शारीरिक आरोग्य जपल्यास सप्ताहात अनेक गोष्टी मनासारख्या होणार आहेत. आर्थिक स्तर उंचावत जाईल. वादविवादाशिवाय केलेले व्यवहार फलद्रूप होतील. कोणाला दिलेला मान हा योग्य परतावा देणारा ठरेल. नोकरदारांना सध्या काम तेवढा फायदा हा मंत्र लक्षात ठेवणे हिताचे ठरावे. मुलांच्या दृष्टीने उद्भवणारा एखादा अनपेक्षित प्रश्न सोडवताना पुरेशी काळजी घ्यावी लागणार आहे. 

कुंभ - काही दिवस हे विरोधकांचे असतात. त्यांचा विचार करणे गरजेचे ठरेल. स्वत:च्या आरोग्य प्रश्नातही कोणतीही चालढकल करू नका. जुने दुखणे वाढू शकते. अनपेक्षित अशा प्रश्नांना सामोरे जावे लागेल. हितशत्रूंचा वाढता दरारा आपल्याला त्रासदायक ठरू शकतो. तरीही अनेक बाबतींमध्ये मिळणारे मित्रांचे वा कुटुंबीयांचे सहकार्य आपल्याला पुढे घेऊन जाण्यास पुरेसे ठरणार आहे. नोकरी-व्यवसायात होणाऱ्या वादांकडे थोडे दुर्लक्षच करणे हिताचे ठरेल. 

मीन - शिक्षण, साहित्य, कला, न्याय तसेच सामाजिक संस्था, इ. क्षेत्रांत काम करणाऱ्यांना या सप्ताहात पुरेशी जपून पावले टाकावी लागणार आहेत. चुकीचे गेलेले शब्द भलतेच प्रसंग आणू शकतात. एखादे व्यसन, प्रलोभने नको त्या वाटेवर नेऊन ठेवणारे ठरू शकते. सरळमार्गी अभ्यास करून आणि सकारात्मक पद्धतीने टाकलेले पाऊल आपल्याला बऱ्याच अंशी प्रगतीच्या वाटेवर नेणारे ठरेल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात सध्या जोडीदाराचे वर्चस्व असले तरी फार काही बिघडणार नाही. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin