Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


या आठवड्याचे राशीभविष्य


Main News

मेष - नको तिथे नको त्या प्रतिक्रिया देऊ नका. प्रगल्भपणे केलेले विचार यातून आपल्याला बाहेर काढू शकतात. व्यवहाराचे गणित चांगले जमू शकते. काही गोष्टींमध्ये आपली प्रगती कोणी रोखू शकणार नाही. मात्र ज्यांना डोकेदुखीचा आजार आहे त्यांनी या सप्ताहात सगळ्या तपासण्या करून योग्य रोगनिदानापर्यंत पोहोचणे अवश्य ठरावे. आरोग्यदृष्टय़ा ही काळजी घेतल्यास सप्ताह आपल्या इच्छातृप्तीसाठी पुढे नेणारा ठरू शकतो. 

वृषभ - व्यवहारातले भागीदारीचे प्रश्न असोत, ग्राहक आणि विक्रेते हे संबंध असोत किंवा वैवाहिक जीवनातील वा कुटुंबातील नातेसंबंध असोत कुठेही कमीत कमी मतभेद ठेवून कामाला लागा. फायदा मिळेल, तो खिशात घालून पुढे चला. फार मोठय़ा फायद्याच्या अपेक्षा ठेवण्यापेक्षा छोटे छोटे फायदे घेत गेल्यास तेही आपल्यासाठी मोठे ठरणार आहेत. काही दिवस कला, सौंदर्य, साहित्य या गोष्टी बाजूला ठेवाव्या लागणार आहेत. व्यवहाराच्या वाटेवरून आपल्याला आपले आर्थिक गणित कोलमडणार नाही असे पाहावे लागणार आहे. 

मिथुन- गणितातल्या होणाऱ्या चुका आणि आकडेवारी करण्यात झालेला घोळ लांब कुठे तरी नेऊन ठेवणारा ठरू शकतो. त्यामुळे बँक कर्मचारी, निरनिराळ्या क्षेत्रांत काम करणारे कॅशिअर्स तसेच सी. ए. वा तत्सम व्यवसायातील लोकांनी या सप्ताहात विशेष जागरूक राहणे हिताचे ठरणार आहे. श्वसनमार्गाचे विकार, डोकेदुखी इत्यादी विकार असणाऱ्या महिलांनी या सप्ताहात विशेष काळजी घेणे जास्त हिताचे ठरणार आहे. कुटुंबात होणाऱ्या शुभ कार्यात आपला सहभाग विशेष महत्त्वाचा ठरेल. 

कर्क- गुंतवणुकीचे काही निर्णय चुकणार नाहीत याची काळजी लागणार आहे. आपल्या राशीतला रवी आणि धनस्थानातले गुरू हे या प्रसंगातील कोणतेही टोक गाठू देणार नसले तरी मनस्तापाचे प्रसंग अधूनमधून उद्भवणार आहेत. मन:शांती टिकवणे हे आपलेच काम आहे.  नोकरी-व्यवसायात आपल्याला प्रगतीची चिन्हे आहेत. वरिष्ठांची मर्जी सांभाळून स्वत:चा फायदा घेण्यात नोकरदारांना यश मिळेल. थंड डोक्याने केलेली कामे यशस्वी होतील. 

सिंह -अनुकूलता जशी आहे तसे आपल्याला फसवण्यासाठी म्हणा किंवा आपल्याकडून मोठे व्यवहार करून घेऊन नुकसानीत टाकण्यासाठी म्हणा, अनेक जण जाळे टाकून बसलेले असतील. राजकारण, समाजकारण वा आर्थिक व्यवहार यामध्ये हे अनुभव प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या आपल्याला येणे शक्य. कुठेही अनैसर्गिक असे वागायला जाऊ नका. सरळमार्गी पठडी सोडू नका. व्यवहारातील गुप्तता कसोशीने पाळा. त्यातूनच आपल्याला पुढील काळासाठीचे प्रगतीचे मार्ग सापडणार आहेत. 

कन्या - मनानेच घेतलेले औषध किंवा एखादे चुकलेले रोगनिदान यातून काही भलतेच प्रश्न निर्माण होणे शक्य आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही गोष्ट न केलेलीच बरी. ही गोष्ट सांभाळल्यास सप्ताहात आर्थिकदृष्टय़ा मोठय़ा उलाढाली होऊ शकतील. तज्ज्ञांचे मार्गदर्शन आपल्याला उपयुक्त ठरेल. भावंडांबरोबर असलेल्या भागीदारीमध्ये काही प्रश्न उद्भवणे शक्य.खेळ, साहित्य, न्याय, शिक्षण या क्षेत्रांत असणाऱ्यांना सध्या जपून पावले टाकावी लागणार आहेत. 

तूळ - त्यातून आपला अर्थप्राप्तीचा मार्ग आणि आनंदाचेही मार्ग हे बऱ्याचदा समांतर असतात. या सप्ताहात या सगळ्यांवर कुठे तरी मर्यादा येणार आहेत. या क्षेत्रातला कोणताही अतिरेक आपल्याला टाळायचा आहे. आर्थिक जडणघडण चांगली करण्यासाठी हा सप्ताह आपल्याला बरीचशी मदत करणारा ठरेल. मात्र त्यासाठी कोणत्या प्रकारची आणि किती किंमत मोजायची हे आधीच ठरवून ठेवा. जमत येणाऱ्या आर्थिक व्यवहारात हितशत्रूंची ढवळाढवळ अहितकारक ठरेल. त्यांना वेळीच ओळखून बाजूला ठेवा. 

वृश्‍चिक - वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे, विशेषत: सर्जन्स, औषधविक्रेते, पोलीस, मिलिटरी इ. संरक्षण दलाशी संबंधित काम करणारे तसेच मीडियाशी संबंधित पत्रकार व वरिष्ठ स्तरावर असलेल्या लोकांना या सप्ताहात कोणतीही चूक वा प्रतिक्रिया यांचा मोठा फटका बसू शकतो.  सप्ताहात नोकरी- व्यवसायातील कामेसुद्धा स्वत:ला जपतच करणे हिताचे ठरणार आहे. वादविवादाचे प्रसंग अलगद बाजूला ठेवा. आपल्यासाठी काही दिवस तडजोडीचे आहेत हे विसरू नका. 

धनु - आरोग्य प्रश्नात मिळत जाणारी वाट, सामाजिक क्षेत्रात कमी होत गेलेले गैरसमज आणि व्यावहारिक वाटेवर कमी होत असलेले अडथळे यांचा विशेष उपयोग करून घ्या. सप्ताहात संमिश्र असे ग्रहमान आहे. महत्त्वाचे दस्तऐवज आणि व्यावसायिक गुपिते हे प्रयत्नपूर्वक सांभाळावे लागणार आहेत. समोर येणारा प्रत्येक जण संतुष्टच होईल अशी शक्यता नसली तरी आपला स्वार्थही साधणे तेवढे महत्त्वाचे ठरणार आहे. सामाजिक कार्यातली आघाडी उल्लेखनीय ठरेल. 

मकर - अ‍ॅरियर्स पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करायला नोकरदारांना अनुकूलता मिळेल. त्याच वेळी वादविवाद, मतभेद आणि महत्त्वाच्या व महागडय़ा वस्तूंवरून मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात. सध्या काय मिळवले यापेक्षा काय वाचवले हाच प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. आरोग्यदृष्टय़ा कोणताही हलगर्जीपणा परवडणार नाही. स्वत:चा कोणताही हेका चालवू नका. मागे आलेले अनुभव अगदी तसेच येतील असे समजू नका. भागीदारी, कोर्ट प्रकरणे किंवा पोलीसदरबारची प्रकरणे यामध्ये दुराग्रह ठेवू नका. 

कुंभ - करायला जाणार एक आणि व्हावे भलतेच अशी स्थिती उद्भवणे शक्य. वादविवादांच्या आणि मतभेदांच्या शक्यता अजमावून पाहा. शक्यतो टाळा. सरळमार्गी व्यवहारांना प्राधान्य द्या. भले कमी मिळेल, पण जे मिळेल ते नेमकेपणाने पदरात पडेल. हीच मानसिकता सध्या अपेक्षित. आपले विचार कितीही व्यावहारिक असले तरी समोरच्याला ते पटतीलच असे नाही. त्यातून आर्थिक फायदा घेत बाजूला व्हा. जास्तीच्या भानगडीत न पडलेले बरे. 

मीन - कोणाच्याही मदतीशिवाय तुम्ही कोणतीही आणि कितीही कामे पूर्ण करू शकता याचा प्रत्यक्ष अनुभव या सप्ताहात घेऊ शकता. आजूबाजूला होणारे वादविवाद आणि मतभेद यात स्वत:हून मध्यस्थी करायला न जाणेच हितकर. आपण बरे आणि आपले बरे ही आपली मूळची मानसिकता या सप्ताहात आवश्यक ठरेल. नोकरी-व्यवसायात सध्या बरेचसे चांगले दिवस आहेत. त्यातून आपल्याला कार्यभाग साधता येईल. विवाहविषयक बैठकांतून गैरसमज टाळण्याचा प्रयत्न करा. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin