Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


या आठवड्याचे राशीभविष्य


Main News

मेष - मध्यस्थी करायला जाल आणि भलतेच अंगाशी येऊ शकते. माहितीची खात्री करूनच चर्चा करा. सप्ताहात नोकरी व्यवसायातल्या कामांना गती मिळणार आहे. वास्तुविषयक प्रयत्नांना विशेष दिशा मिळणार आहे. शिक्षण क्षेत्रात असणाऱ्यांना नावलौकिक मिळेल. अर्थप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न यशदायी ठरतील. स्वत:चे आरोग्यतंत्र सांभाळणे अती गरजेचे. वैवाहिक जीवनात सध्या अजब शांतता असणे शक्य. 

वृषभ - भागीदारी असो वा किंवा जुने शत्रुत्व यामध्ये असा बेबनाव होणे शक्य. कुठेही टोकाची भूमिका घेऊ नका. आपल्याकडून कोणाचा अवमान होईल असे वागू नका. बाकी प्रवास, पत्रव्यवहार आणि नित्याची कामे यातून अपेक्षित यश गाठता येणे अशक्य नाही. आर्थिकदृष्टया सप्ताह अपेक्षित टप्पा गाठून देणारा ठरणार असला तरी खर्चावर र्निबध आणणे फार आवश्यक ठरेल. 

मिथुन - नोकरी-व्यवसायात बऱ्याच अंशी अनुकूलता मिळत राहणार आहे. त्याचा फायदा घ्या. कामाचा कोणताही ताण मनावर घेऊ नका. मिळणारे सहकार्य आणि वरिष्ठांची मर्जी यातून आपला मार्ग सोपा होत जाणार आहे. गरज पडल्यास प्रवासही अवश्य करा. मेजवानीचे बेत असताना मात्र खाण्यापिण्यावर र्निबध आणणे त्यातल्या त्यात हिताचे ठरेल. वैवाहिक जीवनात सध्या छान सामंजस्य राहील. 

कर्क - आपल्या राशीतून होणारी गुरुपौर्णिमा आपल्याला अनेक अंगांनी मोठी करणारी ठरू शकणारी आहे. आपला पूर्व अभ्यास, अनुभव आणि सध्या असलेली स्थिती यातून मोठी कामे सहज मार्गी लावू शकणार आहात. कुठेही जास्त भावनिक न होता व्यवहाराच्या वाटेवरून चालायचे आहे. ज्येष्ठांचा मिळणारा सल्ला आपल्याला अति उपयुक्त ठरू शकेल. गुरुपौर्णिमा दिवस त्या दृष्टीने आपल्याला महत्त्वाचा ठरू शकेल. अनेक दिवस मनात रेंगाळलेली कामे पूर्ततेकडे जाताना पाहून समाधानाचा सुस्कारा सोडाल. 

सिंह - व्यावहारिक पातळीवरही आपल्याला ज्येष्ठांचा मिळणारा सल्ला, मोठय़ांचे आशीर्वाद, सहकाऱ्यांचे सहकार्य आणि अपेक्षित ठिकाणी मिळणारा मानसन्मान यातून आपले व्यक्तिमत्त्व जास्त चांगले खुलत जाणार आहे. आर्थिक आघाडीही बऱ्यापैकी सशक्त होत राहील. गुंतवणुकीच्या नव्या संधी मिळतील. जुन्या कागदपत्रांचा चांगला उपयोग होईल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनातही बऱ्याच अंशी चांगले संबंध राहतील. 

कन्या - अन्य कामात वेळ घालवण्यापेक्षा आपल्या आर्थिक उद्दिष्टपूर्ततेसाठी जास्तीत जास्त कामाला लागा. अनेक बाबतीत आपला पुढाकार सत्कारणी लागेल. केलेली मदत उपयोगाला येईल. गुंतवणुकीचा योग्य फायदा मिळेल. नोकरी व्यवसायात असे यश आपण आणू शकाल. सप्ताहातली गुरुपौर्णिमा त्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. आध्यात्मिक क्षेत्रात असणाऱ्यांना हा सप्ताह वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा ठरू शकतो. 

तूळ - ठरणारे व्यवहार, होणारी आवक आणि पदरात पडणारी उधारी, वसुली यातून पशाचे गणित छान जमत येईल. अपेक्षित असलेले फायदे पदरात पाडून घेऊ शकाल. नोकरी-व्यवसायात आपल्याला व्यावहारिक जगात तरी वेगळे आणि चांगले असे सिद्ध करण्याच्या संधी मिळतील. गाठीभेटी, त्यात होत असणाऱ्या चर्चा यातून नवे, वेगळे आणि चांगले असे शिकायला मिळेल. घरात होणाऱ्या शुभकार्यात आपला शब्द प्रमाण मानला जाईल. 

वृश्‍चिक - आत्तापर्यंत झालेला त्रास कमी होण्याची चिन्हे दिसू लागतील. कामातली अनुकूलता वाढती राहील. नशिबाची साथ मिळत राहील. थोरामोठय़ांच्या संगतीत होणारे विचारमंथन उपयुक्त ठरेल. आजपर्यंत झालेल्या चुका कमी करून योग्य मार्गावर जाण्याची वाट मिळेल. वादविवादात आपला मुद्दा चांगला पटवून देऊ शकाल. आíथक दृष्टय़ा सप्ताह अगदीच वाईट नाही. नोकरदारांनाही बदलत्या वातावरणात उत्साह वाढता राहील. 

धनु- वातावरणीय बदलातून होणारे विकार आपले वेळापत्रक बिघडवू शकते. खाण्यापिण्यावर ठेवलेले बंधन, पाळलेले पथ्यपाणी आणि योग्य वेळी घेतलेला आरोग्यसल्ला यातून सप्ताहातले नियोजन अपेक्षेप्रमाणे पार पाडू शकणार आहात. कुठेही, कोणत्याही बाबतीत अतिरेक होणार नाही याची काळजी घ्या. नशिबाची साथ प्रत्येक वेळीच मिळेल असे नाही. वैवाहिक जीवनात सासुरवाडीच्या प्रश्नांमुळे काही गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. 

मकर - भागीदारीमध्ये मिळणारे सहकार्य, कोर्टप्रकरणात निघणारे मार्ग आणि वैवाहिक जीवनात जुळत जाणारे सूर यातून एक नवे आनंदपर्व सुरू होणे शक्य. आर्थिक आघाडीवर कोणतीही चूक राहणार नाही तसेच बोलून कोणाला दुखावले जाणार नाही याची काळजी घेतल्यास बऱ्यापकी अनुकूलता दिसते आहे. आरोग्यदृष्टय़ा मधुमेह, रक्तदाब किंवा अनुवंशिक विकारांनी त्रस्त असणाऱ्यांना सप्ताह काहीशी धोक्याची घंटा वाजवून देणारा ठरू शकतो. 

कुंभ - आत्तापर्यंत पाळलेले नीतिमत्तेचे नियम हे असेच चालू ठेवायचे असतील तर सप्ताहात कोणत्याही प्रलोभनांना बळी पडायचे नाही हा नियम आधी स्वत:वर लादून घेणे आवश्यक आहे. मित्र-परिवारासह कुठेतरी पिकनिकनिमित्ताने असे काही प्रसंग ओढवू शकतात. स्वतवर नियंत्रण हाच एकमेव पर्याय त्यावर असू शकतो. अनावश्यक खर्च, आपल्याबाबत होऊ घातलेले गरसमज आणि शत्रूंच्या कारवाया यावर वेळीच नियंत्रण आणणे या सप्ताहातले प्रथम कर्तव्य ठरावे. 

मीन - मागे कधी केलेल्या कामाची पोचपावती या सप्ताहात अनपेक्षितरित्या मिळेल. शुभसंकेतांनी सप्ताह गाजणारा ठरेल. आध्यात्मिक क्षेत्रात असणाऱ्यांनाही हा सप्ताह विशेष उंचीवर नेणारा ठरू शकतो. नवी नोकरी असो किंवा नवा व्यवसाय, आपल्याला सहज पुढे जाण्याच्या शक्यता आहेत. ज्येष्ठांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील. मुलांच्या शिक्षणविषयक वा विवाहविषयक प्रश्नात येणारी अनुकूलता जास्त सुखावणारी ठरणार आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin