Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


या आठवड्याचे राशीभविष्य


Main News

मेष -आपल्याकडून निर्णय घ्यायला झालेला उशीर, वेळेत न पोहचवले गेलेले निरोप, आवश्यक असलेल्या नोंदी न ठेवणे आणि स्वत:चाच दुराग्रह चालू ठेवणे यातून एखादा मोठा फटका बसू शकतो. आरोग्याच्या प्रश्नातही असचे दुर्लक्ष झाल्यास गुंतागुंत वाढू शकते. आर्थिकदृष्टय़ा सप्ताहात फार मोठय़ा उलाढालींची अपेक्षा नसली तरी उधारी वसुली आणि रोखीचे व्यवहार यातून अपेक्षित टप्पा गाठता येणे अवघड नाही. वैवाहिक जीवनात बऱ्याच अंशी शांतता अनुभवाल. 

वृषभ - पत्रव्यवहार अपेक्षित असे परिणाम देतील. नोकरी व्यवसायात कोणतेही उचललेले पाऊल सरळमार्गी कामला येईल. आपल्या अनुभवावर आधारित घेतलेले निर्णय फलदायी ठरतील. त्यामुळे गत अनुभव विसरू नका. सहकारी, वरिष्ठ यांचे सहकार्य मिळेल. त्याचवेळी आपल्याशी वितुष्ट असणाऱ्या हितशत्रूंच्या कारवाया वाढत्या राहणे शक्य. भागीदारीमध्येही काही गैरसमजांची भर पडेल. घरातील ज्येष्ठांमध्ये पडलेले वैचारिक अंतर मनस्ताप देणारे ठरेल. 

मिथुन - हितशत्रूंवर परस्पर गप्प राहण्याची वेळ येईल. नवे काही शिकायला मिळाल्याने आपल्या कौशल्यात भर पडेल. नोकरी व्यवसायात स्वत:चा दबदबा निर्माण करण्याच्या संधी आपोआप चालून येतील. कोणत्याही गोष्टीत फार जास्त काळ अडकून राहण्यापेक्षा नित्य नूतन कृतीकडे लक्ष द्या. त्यातून आपला प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे. नोकरदारांनीही नव्या कामात जास्त उत्सुकतेने लक्ष घालणे हिताचे. 

कर्क - १५ व १६ तारखेला घेतलेले मोठे निर्णय हे दीर्घसूत्री आणि कमी फायदेशीर ठरतील. बाकी सप्ताह आपल्यासाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. जुने मित्र भेटणे, व्यावसायिकदृष्टय़ा नव्या मित्रांची ओळख होणे, व्यवसायाची नवी दिशा मिळणे, नवे काही शिकायला मिळणे या सगळ्यांचा एक चांगला मेळ जमून येईल. मित्रपरिवार किंवा घरातील मुलामुलींच्या बाबतीत फार मोठय़ा अपेक्षा न ठेवता व्यवहाराने असतील ते निर्णय घेऊन पुढे जाणे हिताचे. 

सिंह - कोणताही दुराग्रह, एकाच कामाचा अट्टहास, अनावश्यक दबावतंत्र आणि सूडबुद्धीचे राजकारण या गोष्टींपासून स्वत:ला अलिप्त ठेवणे आणि असे वागणाऱ्यांपासून दोन हात दूर राहणे हेच सप्ताहात आपल्यासाठी हितकारक ठरणार आहे. अन्यथा नुकसानीचे कोणते टोक गाठले जाईल याचा अंदाज येणे अवघड आहे. गोड बोलून सहमतीच्या विचारधारेतून आर्थिकदृष्टय़ा चांगले व्यवहार होणे शक्य आहे. धार्मिक वा राजकीय क्षेत्रातील एखादे सत्ताकेंद्र हाती येऊ शकते. 

कन्या - नोकरी-व्यवसायात पुरेसा फायदा खिशात घालता येईल. कोणत्याही व्यवहारात व्यवहारचातुर्य दाखवून स्वत:ला सिद्ध करता येईल. खरेदी-विक्रीमध्ये कौशल्य पणाला लावता येईल. नोकरदारांना आपला बढतीचा मार्ग प्रशस्त करता येईल. वरिष्ठांचे मिळणारे सहकार्यही त्यात मोलाची भर टाकील. व्यापाऱ्यांना नेमक्या वेळी घेतलेल्या निर्णयाचा मोठा फायदा होईल. वैवाहिक जीवनात सध्या कोणत्या ना कोणत्या कारणावरून दुरावा असेल, मात्र तो वाढणार नाही याची काळजी घ्या.

तूळ - गुंतवणुकीच्या मिळणाऱ्या नव्या संधी, कलाक्षेत्रात वाढत जाणारा नावलौकिक, सामाजिक क्षेत्रात मिळत राहणारा मानसन्मान आणि स्वत:ला आतून मिळणारे आत्मिक समाधान अशा छान चौकटीतून सप्ताहातला प्रवास होणार आहे. आर्थिक फायदा म्हणजेच सर्वस्व असते असे नाही यावरही विश्वास बसू शकेल. आर्थिक गणितेही जमणार आहेत पण त्याहीपेक्षा अन्य मार्गाने होणारे फायदे जास्त महत्त्वाचे ठरणार आहेत. एकंदरीतच साहित्य, कला, संस्कृती अशा अंगाने आपली मोठी प्रगती होऊ शकणार आहे. 

वृश्‍चिक - मतभेदातूनही समेट घडवला जाईल. आर्थिक व्यवहारात झालेले गैरसमज दूर करता येतील. ज्येष्ठांच्या सल्ल्याने काही मोठे व्यवहार मार्गी लावता येतील. तब्येत सांभाळतच नोकरी-व्यवसायातील कामांना गती देता येईल. त्यातून आगामी काळाचे मोठे प्रश्न मार्गी लावता येतील. वरिष्ठांशी व जुन्या  ग्राहकांशी वितुष्ट घेऊ नका. आपल्या गोड बोलण्यातून कार्यभाग साधा. सूडबुद्धीने न वागता सरळमार्गी व्यवहारात मोठा फायदा होणे शक्य आहे. 

धनु - सामाजिक कार्यातला सहभाग काळजीपूर्वक ठेवा. नावलौकिक वाढण्यापेक्षा गैरसमज वाढणार नाहीत व त्यातून वाटय़ाला बदनामी येणार नाही याची काळजी घ्या. सध्या नोकरी-व्यवसायात नव्या व्यवहारांपेक्षा तुंबलेली कामे मार्गी लावणे जास्त हिताचे. उधारी-वसुलीवर लक्ष ठेवून येणे, आकडा कमीत कमी ठेवण्यावर भर द्या. त्यात या सप्ताहात मोठे यशही मिळणार आहे. 

मकर - स्वत:चे कष्ट, अभ्यास, काम करण्याची तयारी आणि प्रत्यक्ष कृती यांचा मेळ चांगलाच बसणार आहे.  बँक प्रकरणात व एकूणच आर्थिक व्यवहारात कोणतीही चूक राहू देऊ नका.स्वत:च्या आरोग्याच्या बाबतीत रोगनिदान योग्य वेळी होत नाही असा संशय आल्यास आणखी एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. ती हेळसांड परवडणारी नाही. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात निर्माण झालेले प्रश्न बऱ्याच अंशी चांगल्या अर्थाने मार्गी लागतील. 

कुंभ - जाहिरातीच्या युगात येऊ घातलेले प्रलोभन वेळीच थांबवा. अनियोजित खरेदीतून सप्ताहाचे वेळापत्रक बिघडणे शक्य. त्यात होणारी फसगत मनस्तापदायक ठरू शकते. नोकरी-व्यवसायात सध्या आर्थिकदृष्टय़ा चांगले दिवस असले तरी चुकांचाही मोठा फटका डावलता येणार नाही. नोकरी-व्यवसायातले मतभेद असलेले ग्राहक बाजूला ठेवून अन्य ग्राहकांशी संपर्क प्रस्थापित करा. नव्याने मोठे व्यवहार होतील. आर्थिक फायद्याचा मोठा भाग हाती येईल. 

मीन - एखादी नव्या व्यापाराची संधी असो, नोकरीतील बढती असो किंवा घरात ठरणारे शुभकार्य असो. उत्साहाच्या आणि आनंदाच्या लहरींवरून सप्ताहाचा प्रवास होईल. आर्थिकदृष्टय़ा काही व्यवहार थेट चांगले होतील. अपेक्षित अशा लोकांची मदत मिळेल. कोणत्याही परिस्थितीत व्यसन आणि प्रलोभन दूर ठेवणे हिताचे. बँक कर्मचारी, शिक्षण क्षेत्र, न्याय क्षेत्र व खेळाडू यांना हा सप्ताह एखादी वेगळी भेट देणारा ठरू शकतो. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin