Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


जाणून घ्या या आठवड्याचे राशीभविष्य


Main News

मेष - सप्ताहातली सोमवती अमावास्या आपल्यासाठी शुभफलदायी आहे. तृतीय स्थानातून होणारी ही अमावास्या प्रवास, पत्रव्यवहार यातून मोठी प्राप्ती करून देणारी ठरू शकते. मित्रपरिवार साथ देईल. जुन्या ओळखींचा व जपून ठेवलेल्या कागदपत्रांचा उपयोग होईल. स्वत:ची तब्येत ही मात्र चुकूनसुद्धा दुर्लक्षित करू नका. बँक प्रकरणे काहीशा गांभीर्याने हाताळा. वैवाहिक जीवनात थोडासा दुरावा असेल; परंतु तरीही सामोपचाराने घेणे हे आपल्यासाठी हिताचे ठरेल. 

वृषभ - शुक्र-मंगळाचे शुभयोग आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता आणणारे ठरतील. अचूक ठरत जाणारे अंदाज, अनपेक्षितपणे मिळणारी कोणाची साथ, अत्यावश्यक ठरलेले असे कृत्य आणि घरातून मिळणारा पाठिंबा यातून आपली महत्त्वाची कामे पुढे नेता येतील. खाण्यापिण्यावर संयम ठेवून सप्ताहाची वाटचाल करायची आहे. सध्या आपल्याला रोखीच्या व्यवहारातून बऱ्यापैकी फायदा घेता येणार आहे. कलासाहित्य व संगीत या क्षेत्रात असाल तर कोणाच्याही गैरसमजाला बळू पडू नका. 

मिथुन - उद्याची अमावास्या आपल्या राशीतून होत असली तरी काळजी करण्याचे कारण नाही. अनेक शुभ ग्रहांची मांदियाळी आपल्या राशीत विसावली आहे. वाढत जाणारा मित्रपरिवार, वाढत राहणारी आवक, वाढत राहणारा अनुभव आणि वाढती राहणारी कामाची संख्या यातून स्वत:चे वेगळेपण सिद्ध करता येईल. खाणे-पिणे व पथ्यपाणी या बाबतीत जरा जास्तच कठोर राहणे अपेक्षित. बढतीच्या दिशेने पुढे जाता येईल. युवक-युवतींना आपल्या मैत्रीच्या नात्यात एक चांगले वळण घेता येईल.

कर्क - बाराव्या स्थानात होणारी अमावास्या व अन्य ग्रहमान हे संमिश्र फलदायी ठरू शकतात. प्रवास अचानक ठरवू नका. मोठ्या व्यवहारात पुरेपूर काळजी घ्या. कोणाच्या नुसत्या तोंडी बोलण्यावर विश्वास ठेवू नका. सप्ताहात बऱ्याच गोष्टी अनुकूलही घडणार आहेत. बँक प्रकरणात कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही. थेट पैसा कमावला नाही तरी चालेल; परंतु चुका करून नुकसान ओढवणार नाही याची तेवढी काळजी घ्या. वैवाहिक जीवनात सध्या चांगले विषय असतील त्यातून उत्साहवर्धक घटनाही घडतील. 

सिंह - लाभस्थानात होणारी अमावास्या अनेक अर्थानी शुभ फलदायी ठरणार आहे. आपल्या कामासाठी दुरून येणारे मित्र दुर्लक्षित करू नका. त्यांच्याही वेळेचे मोल वेळेत ओळखा. राजकारण, समाजकारण, आर्थिक आघाडी आणि व्यावसायिक मित्र अशा सगळ्याच आघाडय़ांवर आपला वरचष्मा राहणार आहे. प्रेमप्रकरणात एखाद्या गैरसमजाचे वादळ येऊ शकते. वैवाहिक जीवनात आवडी-निवडीतील फरक वेळीच लक्षात घेऊन पुरेशी उपाययोजना करा. 

कन्या - आर्थिकदृष्ट्या आश्वासने तरी मिळतील. बँक प्रकरणात अपेक्षित मार्ग निघतील. व्यवसायाचा नवा मार्ग हाती येईल. व्यावसायिक शिक्षणासाठी खर्चाची तरतूद अवश्य बाजूला ठेवा. त्यातून पुढील काळात चांगली पायाभरणी होऊ शकते. नवे मित्र, व्यवसायाची नवी वाटचाल आणि नवी गुंतवणूक याबाबतीत ताकही फुंकून पिण्याचे धोरण ठेवलेले बरे. फार मोठी फसवणूक शक्य नसली तरी प्रश्न रेंगाळत राहणे शक्य. कौटुंबिकदृष्टय़ा काही वेगळे प्रश्न उद्भवणे शक्य. 

तूळ - सामाजिकदृष्ट्या दिलेले योगदान योग्य परिणाम निर्माण करणारे ठरेल. समाजकार्यातला सहभाग आपला अप्रत्यक्ष फायदा वाढवणारा ठरेल. कोणाला केलेली मदत वेळेवर कामाला येईल. यातूनच अनेक मोठे नातेसंबंध दृढ करता येतील. आर्थिकदृष्ट्या सप्ताह चांगला ठरणार असून सामोपचाराने केलेल्या कामातून मोठे यश पदरात पाडून घेऊ शकाल.  वैवाहिक जीवनात चांगले सूर जमून येतील. प्रेमप्रकरणात योग्य मार्ग सापडेल. मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी मित्र किंवा एखाद्या व्यावसायिक सल्लागाराची मदत घ्यावी लागेल.

वृश्‍चिक - या सप्ताहात तब्येत हा भाग सोडला तर अनपेक्षित लाभ आणि अनपेक्षित उधारी वसुली यातून अर्थकारण चांगले साधले जाणार आहे. आरोग्याच्या बाबतीत कोणतीही चालढकल करू नका. सामाजिक, आर्थिक, राजकीय तसेच आपल्या व्यावसायिक हितसंबंधात चांगली सुधारणा होऊ शकते. कोणाचे झालेले गैरसमज दूर होऊ शकतात. वैवाहिक जीवनातही समेट घडण्याचे प्रसंग येतील. कुटुंबातील मोठे प्रश्न सुटण्याचे संकेत मिळू लागतील. घरात मन:शांतीचा अनुभव घेऊ शकाल.

धनु - वैवाहिक जोडीदाराचे अनपेक्षित प्रश्न सोडवण्यात आपला काही काळ जाऊ शकतो. हे प्रश्न म्हणजे कदाचित त्यांच्या नोकरीचा असेल किंवा व्यावसायिक बस्तान बसवण्याचे असेल. पण कौटुंबिकदृष्ट्या लाभदायक ठरणाऱ्या अशा प्रश्नात आपणाला त्यांना मदत करायची आहे. त्यातून आपलेही काही प्रश्न सोपे होणार आहेत. धार्मिक उपक्रमातून मन:स्वास्थ्य मिळेल. नोकरदारांनीही सध्या सगळ्यांचे असेल तसेच धोरण सांभाळणे हिताचे. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. 

मकर -  ज्यांना आपण मदत केली त्यांचीही मदत वेळेवर येईलच असे नाही. आपले आरोग्य सांभाळणे हे आपल्यासाठी पहिले कर्तव्य ठरावे. विशेषत: श्वसनमार्गाचे विकार, मधुमेह, रक्तदाब व मूत्रविकार असणाऱ्यांनी या सप्ताहात विशेष सतर्क राहणे हिताचे. आर्थिकदृष्ट्या एखादा व्यवहार आपली गरज भागवणारा ठरेलही पण तेवढ्याने भागणार नाही. घरातील ज्येष्ठांचे प्रश्न, वाहनविषयक अनपेक्षित प्रश्न, तसेच हरवणे, गहाळ होणे अशा काही प्रश्नांतून मनस्ताप होणे शक्य. मुलांचे प्रश्न लगेचच सुटतील अशी शक्यता कमी.

कुंभ - सरळमार्गी यश देणारा हा सप्ताह ठरेल. अन्य कोणाच्या प्रश्नात न गुंतता स्वत:च्या कामात लक्ष घाला. नशिबाची साथ मिळेल. मुलांचे आरोग्याचे प्रश्न सोडता अनेक बाबतीत अनुकूलता अनुभवता येईल. कायदेशीर गोष्टींना मात्र फाटा देऊ नका. भागीदारीमध्ये होऊ शकणारे गैरसमज वेळीच दूर करा. नोकरदारांना नवी आव्हाने सहजच पेलता येतील. आपल्या विविधांगी वाचनातून व अनुभवातून आपण अनेक प्रश्न बाजूला करू शकाल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनातही चांगले आनंदाचे क्षण येतील.

मीन - वरिष्ठांनी सांगितले म्हणून असो किंवा आवश्यक त्या महत्त्वाच्या नोंदी ठेवण्याचे काम असो. आपल्याला त्या गोष्टी पुन:पुन्हा कराव्या लागतील. नोकरी-व्यवसायतही अशा काही गोष्टींमुळे आर्थिक नुकसान होणार नसले तरी वेळ जाणे शक्य. त्यामुळे मुख्य कामावर परिणाम होणे शक्य. आरोग्याच्या बाबतीत स्वत:कडे तसेच वैवाहिक जोडीदाराकडे पुरेसे लक्ष द्या. मुलांचे शैक्षणिक प्रश्नही मार्गी लागतील. स्वत:ला व्यसन व प्रलोभन यापासून मात्र वेळीच रोखणे फार महत्त्वाचे ठरेल.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin