Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या


Main News

मेष -  तूळ राशीत मंगळ स्तंभी आहे. ही ग्रहस्थिती व अन्य ग्रहयोग पाहता ताटात सगळे वाढलेले आहे, पण खाता येत नाही, अशी अवस्था सप्ताहात होणे शक्य. अनेक बाबतीत अनुकूलता दिसून येईल. पत्रव्यवहारातून अनेक गोष्टी मार्गी लागतील. भेटीगाठीतून मार्ग सुचत जातील, पण चुकून गेलेला एखादा शब्द किंवा अनपेक्षित अशी झालेली देहबोली यातून चुकीचे संदेश जातील आणि कामावर परिणाम होईल. ही काळजी घेतल्यास सप्ताह आपल्याला बऱ्याच अंशी पुढे नेणारा आहे. कला, साहित्य, शिक्षण या क्षेत्रांत दबदबा निर्माण होईल.
 
वृषभ -  एकीकडे व्यापार- व्यवसायात प्रगतीच्या मोठय़ा वाटेने जाता येईल. पारंपरिक व्यवसाय करणारे, शेअर मार्केट, हॉटेल व्यावसायिक, सोने-चांदीचे व्यापारी इ. क्षेत्रांतील लोकांना हा सप्ताह एखादी मोठी देणगी देणारा ठरू शकतो. नव्याने आलेला प्रस्ताव किंवा अनपेक्षित धनलाभ यातून असे शुभ धक्के बसू शकतात. मात्र त्याच वेळी आरोग्याच्या काही विचित्र तक्रारींनी आपले सप्ताहाचे नियोजन बिघडणे शक्य. आरोग्यसल्ला हाताशी असणे जास्त गरजेचे. वैवाहिक जीवनात काही गोष्टी मनाविरुद्ध घडणारही आहेत.
 
मिथुन - योग्य शब्द, योग्य ठिकाणी वक्तव्य आणि योग्य व्यक्तींसमोर चर्चा एवढेच पथ्य पाळणे गरजेचे आहे. हितशत्रूंवर परस्पर नियंत्रण बसविता येईल. नोकरी-व्यवसायात नवे मार्ग हाताळता येतील. आर्थिकदृष्टय़ा काही शॉर्टकट्स हाती येतील. त्यातून स्वत:च्या हिमतीवर मोठे उद्योग उभे करता येतील. अभ्यास, वाचन, मनन, चिंतन यांचा चांगला उपयोग करून घेता येईल. वैवाहिक व कौटुंबिक आघाडीवरही बऱ्याच अंशी शुभ फलदायी असेच ग्रहमान आहे.
 
कर्क - या सप्ताहात एखाद्या मोठ्या गुंतवणुकीचा मोठा प्रस्ताव येईल. नवीन वास्तूच्या अपेक्षेत असणाऱ्यांना योग्य प्रस्ताव मिळेल. बँक प्रकरणातून अनुकूलता वाढेल. नोकरी-व्यवसायात सध्या आर्थिक फायद्याची गणिते बसवण्यापेक्षा आहे ते टिकविणे आणि उधारी वसुली यावर लक्ष देणे जास्त हिताचे ठरावे. व्यापाराच्या नव्या कोणत्याही प्रस्तावांना सध्या थेट होकार न देता थोडे थांबवणे जास्त हिताचे. वैवाहिक जीवनात सहमतीचे दिवस आहेत.

 सिंह - विरोधकांची थोडीफार सरशी होऊ शकेल, पण तरीही आपण त्यावर आपण मात करण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक प्रगतीचे वारे आपल्यासाठी जोर धरीत आहेत. कुठेही कमी पडणार नाहीत याची काळजी घ्या. यासाठी जे कोणी मदत करतील त्यांची मदत घ्या. कोणालाही दुखवू नका. गोड बोलून कामे करण्यावर भर द्या. नोकरीत महत्त्वाच्या पदावर कामगिरी बजावण्याच्याही संधी मिळतील. वैवाहिक जीवनात थोडाफार अबोला राहील.
 
कन्या - आपल्या आजूबाजूला घरात कोणी आहेत त्यांची जाणीव ठेवा. अन्यथा या एकटेपणातून थोडावेळ का होईना नैराश्य जाणवू शकते. वास्तविक नोकरी-व्यवसायात सध्या मोठय़ा संधी आहेत. कामही पुरेसे येत आहे. त्यातून आर्थिक प्रगतीचा मार्गही दिसत आहे. पण स्वत:ची तब्येत आणि मानसिकता सांभाळूनच या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. माणसे तुटू देऊ नका. वैवाहिक जीवनात निर्माण होणारा दुरावा दूर करण्याचे प्रयत्न वेळीच करा.
 
तूळ - साहित्य व संगीत या क्षेत्रांतून पुढे जाण्याच्या संधी मिळणार आहेत. नावलौकिक वाढता राहील. केलेल्या कष्टाचे चीज होत राहील. येणारे प्रस्ताव अवश्य विचाराधीन ठेवा. कोणालाही न दुखावता पूर्वनियोजित कामात स्वत:ला झोकून द्या. आर्थिकदृष्टय़ा सध्या मोठा पल्ला गाठता येणार आहे. त्यातून स्वत:ची एक स्वतंत्र अशी शैली निर्माण करू शकणार आहात. नोकरदारांनाही आपल्या अंगभूत गुणांना वाव मिळाल्याने बढतीच्या दिशेने वाटचाल होईल.
 
वृश्‍चिक -  सवंगडी, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याकडून थेट फायदा होईल अशी अपेक्षा न ठेवणे हिताचे. काही दिल्याशिवाय काही मिळत नसते हा अनुभव घेत असाल. आपली माणसे खरेच कोण आणि आपली म्हणवणारी कोण हा उलगडा होऊ शकतो. सध्या आरोग्यातच्या प्रश्नाकडे जास्त लक्ष द्यायचे आहे. मोठय़ा गुंतवणुकीच्या वेळी अनेकांचा सल्ला हाताशी ठेवा. महत्त्वाचे दस्तऐवज, मौल्यवान वस्तू, रोकड या गोष्टींचा अपव्यय होणार नाही किंवा चोरीला जाणार नाही अशी काळजी घ्या.
 
धनु - स्वत:ची क्षमता पूर्णपणे वापरण्याच्या संधी मिळतील. आव्हाने बिनधास्त स्वीकारा. स्वत:ला सिद्ध करा. बढतीच्या दिशेने प्रवास करा. व्यापारात मोठय़ा प्रगतीच्या संधी अवश्य घ्या. सामाजिक क्षेत्रात गैरसमज टाळण्याचा प्रयत्न करा. व्यासपीठावरचा वावर हा जागरूकतेने करा. बोलताना योग्य त्याच शब्दांचा वापर करा. सध्या व्यवहारात काय मिळवले यापेक्षा चुकीने काय घालवले हे महत्त्वाचे. कौटुंबिक जीवनातही चांगली दिवस आहेत.
 
मकर - नको तिथल्या वादात पडू नका. केवळ चर्चेमध्ये जास्त वेळ घालवू नका. असंगाशी संग करू नका. यातून आपले नुकसान होणे शक्य आहे. सरळमार्गी योग्य व्यक्तींचे सहकार्य घेत कार्यभाग साधल्यास अपेक्षित फळ हाती घेता येईल. आर्थिकदृष्टय़ा गरज पूर्ण होऊ शकेल. बँक प्रकरणातून गुंता वाढेल. भाऊबंदकी अशीच त्रासदायक ठरू शकेल. कोर्टकचेरी किंवा पोलीस ठाण्यातील कामे पुढे ढकलणे हिताचे आहे.
 
कुंभ - शिक्षण, साहित्य, संशोधन, न्याय इ. क्षेत्रात असणाऱ्यांना मोठय़ा चांगल्या संधी मिळतील. परदेश प्रवासाची स्वप्ने पाहू शकाल. फायदेशीर व्यवहारांना सामोरे जाऊ शकाल. अनेकांची मदत मिळेल. त्यातून स्वत:चे ईप्सित साध्य करून घेऊ शकाल. भागीदारी व कोर्टप्रकरणे यात सध्या जैसे थे असणेच बरे. कोणत्याही बेकायदेशीर व्यवहारांना थारा देऊ नका. कायदा मोडण्याचा प्रयत्न करू नका. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात मिळणारी साथ जास्त मोलाची ठरेल.
 
मीन - येणाऱ्या प्रत्येकाच्या दु:खात सक्रिय सहभागी व्हायलाच पाहिजे असे नसते. दुसऱ्यांना मदत करताना स्वत:चा पाय खोलात जाणार नाही असे पाहा. कोण अती भावनिक होऊन आपला गैरफायदा घेईल हे सांगता येणार नाही. हे  संभाळल्यास या आपल्या वाटचालीत मोठी अनुकूलता आहे त्याचा उपयोग करून घ्यायचे राहून जाईल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात आनंदपर्व आहे. घरातले मोठे प्रश्न मार्गी लावाल.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin