Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


साप्ताहिक भविष्य


Main News

मेष - पातंजल योगसूत्रातील अविद्या क्षेत्रमुत्तरेषां प्रसुप्ततनुविच्छिन्नोदाराणाम्। (२/४) हे सूत्र लक्षात ठेवा. याचा अर्थ म्हणजे चुकीचे असताना बरोबर असल्याचा धरलेला आग्रह. हा महागात पडेल. कोणत्याही गोष्टीचे अति उदात्तीकरण करू नका. सप्ताहात अनेक गोष्टी मनासारख्या घडत असताना अशा काही चुकांमुळे दुरावणार नाहीत याची काळजी घ्या. पत्रव्यवहार, बोलाचाली, महत्त्वाच्या बैठका यात अपेक्षित यश मिळेल. साहित्यिकांना मानसन्मान मिळतील. प्रवास यशदायी ठरतील. व्यापार, व्यवसाय, नोकरी प्रगतीकारक सिद्ध होतील. 

वृषभ - नोकरी- व्यवसायात येणारे प्रश्न आपण स्वत: सोडविण्यास खरे तर समर्थ आहात, पण काही गोष्टींना सध्या विलंब होणार आहे. त्यात आपल्या अपेक्षा वाढत्या राहणार आहेत. त्यातून निर्णय चुकणार नाहीत असे पाहा. त्या सर्वथा नाहीशा होणार नाहीत, पण त्यांचा अतिरेकही मन:स्थैर्य देत नाही. म्हणून सावध राहा. नियोजन नीट ठेवा. चुका टाळा. कोणाला दुखवू नका. आर्थिकदृष्टया थेट फायदा नसला तरी नाराज होऊ नका. आहे ते सांभाळण्यावर भर द्या. 

मिथुन - कला, साहित्य, संगीत, खेळ, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांत आपणास आघाडी राखता येणार आहे. व्यासपीठांवरून मिरवता येईल. आनंद आणि सुखाच्या कल्पना प्रत्यक्षात येतानाचा आनंद घेऊ शकाल. पातंजल योगसूत्रातील सुखानुशयी राग:। (२/७) हे सूत्र विसरू नका. येथे राग म्हणजे आसक्ती. सगळी सुखे व सुखसाधने मलाच मिळावीत हा अट्टहास टाळा. ही सुखाची आसक्ती मित्र दुरावेल अथवा काही शत्रू निर्माण करू शकेल. नव्या उद्योगाच्या रूपाने एखादे आर्थिक केंद्र हाती येईल. भेटीगाठी सफल ठरतील. 

कर्क - आपण तीव्र इच्छेने जे अपेक्षित कराल तसे होत असते. म्हणूनच ते चांगल्या मार्गी लावावे लागते. पातंजल योगसूत्रातील तीव्रसंवेगानामासन्न:। (१/२१) हे सूत्र कदाचित आपल्यासाठीच असेल. कोणत्याही गोष्टीच्या इच्छेतील उत्कटता आपण चांगली अनुभवू शकता. याचाच उपयोग या सप्ताहात करून घ्यायचा आहे. आजचा दिवस मोठय़ा कामांच्या आरंभासाठी योग्य नाही, पण पुढे चांगले निर्णय होतील. अंदाज अचूक ठरतील. नोकरी-व्यवसायात चांगला जम बसेल. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. 

सिंह - केलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळत राहील. अवतीभवती मदतीचे हात राहतील. ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळत राहील. नोकरी-व्यवसायात वर्चस्व प्रस्थापित करता येईल. बढती वा अपेक्षित ठिकाणी बदलीचे प्रयत्न यशस्वी ठरतील. मनासारखे निर्णय घेता येतील. यासाठी मात्र समाधानाची वृत्ती योग्य पातळीवर हवी. कोणाला दुखवू नका किंवा कमी लेखू नका. संतोषानुत्तम: सुखलाभ:। (२/४२) हे पातंजल योगसूत्रातले सूत्र आपल्या कामाचे आहे. समाधान वा संतोषवृत्ती सुस्थिर झाल्यास अनुत्तम सुखाचा लाभ होतो. 

कन्या - नोकरी-व्यवसायात कोणती योग्य व कोणती संधी अयोग्य याचा निवाडा करणे अवघड जाईल. त्यात आपण कायम द्विधा अवस्थेत असणारे, पण त्यामुळेच कदाचित काही फसव्या कल्पनाही समोर येणे शक्य. शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्प:। (१/९) या योगसूत्रानुसार सशाचे शिंग किंवा आजीबाईच्या मिशा अशा कविकल्पनांत अडकणार नाही याची काळजी घ्या. यालाच विकल्प असे म्हणतात. ही काळजी घेतल्यास सप्ताह चांगल्या अर्थप्राप्तीचा ठरावा. व्यापाऱ्यांना आपल्या निर्णयक्षमतेचा कस लावून देणारा ठरेल. 

तूळ - आपल्या राशीत अल्पकाळासाठी आलेला मंगळ व काही ग्रहस्थिती ही मनामध्ये विद्रोहाची व अल्प प्रमाणात का होईना, पण हिंसेची भावना आणू शकतात. अशा वेळी पातंजल योगसूत्रातील वितर्कबाधने प्रतिपक्षभावनम्। (२/३३) हे सूत्र लक्षात घ्या. चांगल्या घडलेल्या गोष्टींचे, सद्भावनांचे चिंतन करा. यातून अन्य शुभ ग्रहस्थितीचा फायदा नक्की घेऊ शकाल. नशिबाची मिळणारी साथ, फायदेशीर होत चाललेले आर्थिक व्यवहार, कलाक्षेत्रातील नावलौकिक व राजकीय सत्ताकेंद्राशी होत असलेली जवळीक यातून आगामी काळाचे चित्र चांगले होत जाणार आहे. अर्थचिंता कमी होईल. 

वृश्‍चिक - दु:खनुशयी द्वेष:। (२/८) पातंजल योगसूत्रातील या सूत्राचा अनुभव या सप्ताहात घ्याल. या ठिकाणी द्वेष म्हणजे अपेक्षाभंग. अनेक गोष्टी नियोजनपूर्वक ठरवून, व्यवस्थित तयारी करूनही यश देतीलच असे नाही. ऐन वेळी दगा देणारे मित्र, गैरसमज झाल्याने नाराज झालेले वरिष्ठ, निर्णयात झालेल्या काही चुका व नेमक्या वेळी बिघडलेली तब्येत यांचा फटका बसणे शक्य. अर्थात योग्य वेळी, योग्य त्या शब्दात व नेमक्या ठिकाणी याची दाद वा मदत मागाल तर यातून सुटकाही होऊ शकते. जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आपली तब्येत आहे, याचा विसर पडू देऊ नका. 

धनु - न्यायालयीन प्रकरणात मनासारखे वळण घेता येईल. अपेक्षित निकाल हाती येईल. भागीदारीत नियोजनाप्रमाणे टप्पा गाठता येईल. नोकरी-व्यवसायात मनासारखे वातावरण मिळेल. आर्थिकदृष्टय़ा महत्त्वाचे निर्णय होतील. घरातही मंगलकार्याचे पडघम वाजू लागतील. महत्त्वाच्या प्रश्नात चांगले मार्ग मिळाल्याने आनंददायी वातावरण राहील. याच वेळी योगसूत्रातील १/३० या सूत्रात सांगितलेल्या भ्रान्तिदर्शनचा दोष सुरू होऊ शकतो. म्हणजेच स्वत:ला आहे त्यापेक्षा मोठे समजून काही अतिरेकी निर्णय होऊ शकतात. त्यातून मात्र तोटा संभवतो. 

मकर - शनी आणि मंगळ सोडता अन्य ग्रहांची बैठक फारशी अनुकूल नाही. विपर्ययो मिथ्याज्ञानमतद्रूपप्रतिष्ठम्। (१/८) हे योगसूत्र विसरू नका. साप समजून भुई थोपटणे असा याचा थोडक्यात अर्थ. परिस्थितीचे यथायोग्य आकलन झाल्याशिवाय काही बोलाल, निर्णय घ्याल वा कृती कराल तर महागात पडेल. दोन्ही बाजू ऐकून घेतल्याशिवाय मतप्रदर्शन करणेही तोटय़ाचे ठरेल. आर्थिक व्यवहारात सकारात्मक पुढे जाता येईल. अंगी एक प्रकारची ऊर्जा भरेल. कामात स्वत:ला सिद्ध करता येईल. कधीकाळी वापरलेले व विस्मरणात गेलेले तंत्रज्ञान पुन्हा वापराल व फायदा घ्याल. 

कुंभ - एखाद्या गोष्टीचे आपण चिंतन करावे. त्यासाठी आवश्यक ती माहिती व ज्ञान संपादन करावे. साधनांची जमवाजमव करावी अन् कामाला लागावे. अशा थेट मार्गातून यश लांब जात नाही हे अनुभवाल. पातंजल योगसूत्रातील यथाभिमतध्यानाद्वा। (१/३९) हे सूत्र याच अर्थाचे आहे. चांगल्या गोष्टींचे केलेले ध्यान हे शुभ फलदायी असते. नोकरी-व्यवसायातही अशाच अनेक चांगल्या घटनांची नोंद करता येईल. स्वप्नपूर्तीचा काळ आहे. परिश्रमाला पर्याय नाही, पण यशही दूर नाही. 

मीन - घरगुती वातावरणात झालेली सुधारणा, कुटुंबातून येणाऱ्या आनंदवार्ता व जवळच्या नातलगांचे सुटत जाणारे प्रश्न यातून उत्साह टिकवता येईल. बाहेरच्या व्यवहारी जगातले नसलेले काही प्रश्न डोक्यात घेऊन कच खाऊ नका. सध्या फायदा-तोटा हा हिशेब न पाहता काम चालू ठेवण्यावर सकारात्मक भर द्यावा. नोकरदारांनी आत्मविश्वासाने कामाला लागावे. व्यापारी वर्गाने फार मोठय़ा व्यवहारात पुरेशी काळजी घ्यावी.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin