Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


असा जाईल पुढील आठवडा


Main News

मेष - शुक्राचे राश्यांतर आपल्याला कौटुंबिक स्वास्थ्य देणारे ठरेल. काही प्रश्न विनासायास सुटतील. प्रवासातून होणाऱ्या गाठीभेटींचा चपखल उपयोग करून घेता येईल. नोकरी- व्यवसायात सध्या सहकार्याचे वातावरण सुरू राहील त्यातून आपल्याला अनेक प्रश्नांतून मार्ग मिळत राहतील. स्वत:च्या क्षेत्रात चांगले वर्चस्व निर्माण करू शकाल. नोकरदारांना बढतीच्या प्रयत्नात यश मिळेल. घरामध्ये शुभकार्याचे पडघम वाजू लागतील. मात्र स्वत:च्या आरोग्याच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा होऊ देऊ नका

वृषभ - रवी, बुध आणि शुक्राचे राश्यांतर आपल्याला अनेक अर्थानी अनुकूल ठरणार आहेत. आर्थिक कामांना चांगली गती मिळेल. आर्थिक बाजू भक्कम होऊ लागेल. अडलेल्या कामातून मार्ग निघत राहील. कामाचा ढीग उपसताना त्यामानाने थकवा कमी राहील. कर्ज फेडणे, कर्ज वसुली इ. बाबतीत केलेल्या प्रयत्नांना चांगले यश मिळेल. घरात चांगल्या घटनांनी आनंद संचारेल. वैवाहिक जीवनातले मतभेद कमी होतील. मतभेदांच्या मुळाशी गेल्याने प्रश्न सोडविणे सुलभ जाईल. 

मिथून - आपल्या राशीतली रवी-शुक्राची जोडी आणि एकंदर ग्रहस्थिती आपल्याला आनंद पर्वाकडे नेणारी ठरू शकते. अंगभूत गुणांना वाव मिळाल्याने स्वत:ला सिद्ध करता येईल. कला, साहित्य, शिक्षण, न्याय, सांख्यिकी, बँक इ. क्षेत्रातील अनेकांना या सप्ताहात आपली राहिलेली कामे पूर्ण करून घेता येतील. त्याचा पुरेसा मोबदलाही वसूल करून घेता येईल. भाऊबंदकीचा त्रास कमी होईल. आपल्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने वाटचाल वेगवान करता येईल. कौटुंबिक जीवनातही सध्या मनासारखे वातावरण राहील. 

कर्क - सप्ताहात नव्या वस्तूंच्या खरेदीचा फंडा जोरात राहू शकतो. अर्थात उपयुक्त अशाच वस्तूंची खरेदी संभवते. वाहन असेल, वास्तू असेल किंवा व्यावसायिकदृष्टय़ा आवश्यक अशा वस्तूंच्या खरेदीतून आपली गुंतवणूक वाढणार आहे. तरीही अनाठायी खर्चावर र्निबध आणणे गरजेचे आहे. सप्ताहात आपल्याला अनुकूल अशा घटनांची मोठी नोंद होत राहील. नाराज सदस्य व नाराज मित्रपरिवार यांची नाराजी दूर झाल्याने ते जवळ येतील. कामाचा व्याप सगळ्यांच्या सहकार्याने चांगला सांभाळता येईल. 

सिंह - सध्या नोकरी-व्यवसायात शक्य तेवढे जास्त योगदान द्या. त्यातून परतावा मिळण्याच्या शक्यता खूप मोठय़ा वाढणार आहेत. आर्थिक चिंता मिटवण्याच्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांना जोरदार यश मिळेल. बँक प्रकरणे मनासारखी होतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित फायदा घेता येईल. नवीन खरेदीही अपेक्षित दराने होऊ शकेल. आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी या सप्ताहात चांगल्या घडामोडी होऊ शकतात. नवे कंत्राट, व्यापाराचे नवे क्षितिज आणि नवे सहकारी यातून एक वेगळा दिमाखदार असा कार्यभाग साधता येईल. 

कन्या - ग्रहस्थिती ही आपल्याला चांगल्या भाग्योदयाकडे घेऊन जाणारी ठरू शकते. व्यावसायिक शत्रुत्व आणि मोठी स्पर्धा बऱ्याच अंशी थांबेल. अकारण झालेले व्यावसायिक गैरसमज दूर होतील. आपल्या बोलण्याच्या कौशल्याने आपण अनेक क्षेत्रांत पुढे जाऊ शकाल. कोणाशीही शत्रुत्व न घेता केलेल्या प्रयत्नांना मिळणारे यश हे मोठय़ा प्रगतीचे निदर्शक ठरेल. अनुकूलतेत वाढ हाच फायदा समजा. पारंपरिक व्यवसाय व वडिलार्जित इस्टेटीच्या संबंधात मात्र ताकही फुंकून पिण्यासारखी स्थिती असेल. 


तूळ - आर्थिक व्यवहारात झालेले घोळ किंवा चुका वेळीच सुधारल्यास सप्ताह आपल्याला मोठय़ा अपेक्षापूर्तीचा ठरू शकतो. व्यवहारातल्या अटी आणि शर्ती वेळोवेळी तपासण्याचा प्रयत्न करा. त्यातून गैरसमज जरी दूर झाले तरी मुख्य फायदा हाती घेण्यास सुलभता येईल. सध्या अनेक अंगांनी अनुकूलतेचे वारे वाहत राहणार आहेत. त्याचा योग्य तो फायदा घेण्यासाठी आपण सज्ज राहा. अनेक बाबतीत दिलासा मिळेल. कामे गतिमान होतील. ओळखींचा योग्य वेळी उपयोग होईल. आर्थिक स्थिती भक्कम होत राहील. 

वृश्चिक- सप्ताह फार प्रतिकूल नसला तरी फार अनुकूलसुद्धा संभवत नाही. सावधगिरीने पावले टाका. गोड बोलून फायदा उठविणाऱ्यांना वेळीच ओळखा. नोकरी-व्यवसायात दिशाभूल करून आपल्याला नुकसानीत आणणारे ग्राहक भेटू शकतील. वयाने, अनुभवाने आणि मानाने ज्येष्ठ अशांचा सल्ला उपयुक्त ठरेल. असे ज्येष्ठ घरातले असोत किंवा बाहेरचे असोत ते दुखावले जाणार नाहीत एवढी काळजी घ्या. कौटुंबिक जीवनातही बऱ्याच अंशी सहमतीचे वातावरण असेल 


धनू - आपले महत्त्वाचे दस्तऐवज, व्यावसायिक गुपिते, बँकेच्या लॉकरमधील वस्तू आणि होत असलेले फायदेशीर व्यवहार यांची गुप्तता काही दिवस तरी पाळणे गरजेचे आहे. अशा महत्त्वाच्या गोष्टी प्रतिस्पध्र्याच्या हाती लागणार नाहीत याची काळजी घेतल्यास सप्ताहात अनेक गोष्टींत मोठा भाग्योदय संभवतो. नोकरीत काही जणांना अनपेक्षित बढतीचे बक्षीस मिळेल.
नोकरदारांना सध्या सुगीचे दिवस आहेत. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात चांगल्या वातावरणाची अपेक्षा आहे. 

मकर - आपला स्वार्थ साधण्यासाठी, फायदा खिशात घालण्यासाठी आणि अपेक्षित असे व्यवहार करून घेण्यासाठी जे काही कायदेशीर आणि सामाजिकदृष्टय़ा योग्य असे मार्ग असतील ते अवश्य हाताळावे लागतील. कोणाच्याही आहारी जाणे सध्या परवडणारे नाही. आपला स्वार्थ बघाल तर आपल्याला या सप्ताहात आर्थिकदृष्टय़ा मोठा पल्ला गाठता येणार आहे. व्यसन, प्रलोभन या गोष्टी मोठा अडथळा ठरू शकतात. आरोग्यदृष्टय़ाही चालढकल करू नका. तसेच जास्तीच्या तज्ज्ञांचा सल्ला हाताशी असणे महत्त्वाचे. शुभ 


कुंभ - मित्रांचे मिळणारे सहकार्य, वरिष्ठांची मर्जी, सहकाऱ्यांचा मदतीचा हात आणि कौटुंबिक सदस्यांकडून मिळणारा पाठिंबा यातून पुढे जाता येईल. व्यापारी वर्गाला खरेदी-विक्रीचे व्यवहार मनासारखे करून घेता येतील. सहमतीचे पर्व अनुभवू शकाल. आर्थिकदृष्टय़ा मोठा पल्ला गाठता येईल. गुंतवणुकीच्या नव्या संधी वाटय़ाला येतील. आरोग्यदृष्टय़ा मात्र मधुमेह, हृदयरोग व पोटाचे विकार असणाऱ्यांनी सप्ताहात विशेष काळजी घेतलेली बरी. मुलांच्या दृष्टीने सुटत जाणारे प्रश्न हे आपली काळजी कमी करणारे ठरतील. 

मीन - वैवाहिक जीवनातले किंवा कुटुंबातील कोणाचे सुटत जाणारे मोठे प्रश्न आपल्याला मोठी ऊर्जा देणारे ठरतील. त्याचा उपयोग आपल्याला नोकरी-व्यवसायातील कामांसाठी करता येईल. त्या आघाडीवरही आपण बऱ्यापैकी पुढे जाऊ शकाल. खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अपेक्षित दर मिळत राहील. उधारी वसुली आणि कर्जप्रकरणे यात अनुकूलता मिळत राहील. आत्मविश्वासही वाढता राहील. वादविवाद, मतभेद, प्रलोभन आणि अनावश्यक स्पर्धा या वाटेला मात्र न जाणेच हिताचे ठरेल. 
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin