Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


असा जाईल पुढील आठवडा


Main News

मेष - एकीकडे खरेदीची धामधूम तर दुसरीकडे आरोग्याचे प्रश्न अशा दुहेरी मार्गावरून जाताना आपल्याला विचार करावा लागणार आहे. आर्थिकदृष्टय़ा सप्ताह फार मोठय़ा अपेक्षा ठेवणार नाही. तरीही भेटणारी नवी माणसे व होणाऱ्या नव्या ओळखी यांचा वेगळा फायदा करून घेता येणार आहे. आरोग्याचे प्रश्न मात्र कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्षून चालणार नाहीत. शनिजयंतीची अमावास्या वाईट नसली तरी काळजी घ्या. वैवाहिक जीवनात सध्या आलबेल असेल. 

वृषभ - आपल्या अंगीभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. सार्वजनिक व्यासपीठ गाजवता येईल. आर्थिक व्यवहारात चांगली प्रगती होईल. एखादा मोठा व्यवहार अनपेक्षितपणे घडून येईल. नव्या व्यवसायाच्या दृष्टीने पावले टाकली जातील. नोकरदारांना थोडा परीक्षेचा काळ संभवतो. समोर येणारा माणूस हा आपली परीक्षाही घ्यायला येऊ शकतो हे विसरू नका. वैवाहिक जीवनात काही ताणतणाव शक्य आहेत. अतिशय कौशल्याने त्यावर मात करावी लागणार आहे. 

मिथुन - येणारी वसुली आणि होणारे व्यवहार यातून पैशाचे मोठे प्रश्न थांबतील. बँक प्रकरणे मनासारखी होतील. वास्तुविषयक कर्जाना सकारात्मक प्रतिसाद मिळेल. नोकरदारांनीही या सप्ताहात कोणाशी किती मोकळेपणाने बोलावे यावर विचार करावा लागेल. मात्र आपला अभ्यास व बोलका स्वभाव यांचा योग्य फायदा घेता येईल. थट्टामस्करीत कोणी दुखावला जाऊ शकतो हे विसरू नका. आरोग्यदृष्टय़ा हा सप्ताह एखाद्या साथीच्या रोगाला बळी पडायला लावणारा संभवतो. 

कर्क - होणारे नवे व्यवहार, येणारे चांगले प्रस्ताव, वाढत जाणारी बँक शिल्लक आणि योग्य दिशेने चाललेले व्यापारातले अंदाज यांचा चांगलाच उपयोग होणार आहे. सध्या आपल्या करिअरवर लक्ष द्या, सप्ताह आपलाच आहे. अर्थप्राप्तीच्या दिशेने पावले जोरदार पडणार आहेत. व्यापाराचा एखादा नवा मार्ग हाती येईल. घरगुती प्रश्नांपेक्षा नोकरी, व्यवसाय व व्यापार यात जास्तीत जास्त लक्ष देणे आणि मनापासून काम करणे हे गरजेचे आहे. 

सिंह -आपण प्रसिद्धीच्या केंद्स्थानी राहणार आहात. राजकारणात एखादे चांगले पद मिळेल. समाजात मान उंचावेल. नोकरी-व्यवसायात महत्त्वाच्या कामासाठी आपली निवड होईल आणि त्यातून स्वत:ला सिद्धही करू शकाल.आपल्या व्यावसायिक प्रगतीसाठी जास्त कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. त्यातून बरेच काही साध्य होऊ शकेल. कामाचा निपटारा मोठय़ा गतीने करू शकाल. त्या दृष्टीने उंबऱ्याबाहेरच्या जगात अपेक्षित अशी मदतही मिळेल. 

कन्या - ऐनवेळी बिघडणारी तब्येत किंवा चुकून एखादा गेलेला शब्द आपले काम बिघडवू शकतो. या दोन गोष्टींवर मात केल्यास सप्ताह आपल्याला काही ना काही देणारा ठरू शकतो. कला वर्तुळातून नाव कमवू शकाल. साहित्य वर्तुळात मान मिळेल. एखादे पुस्तक प्रसिद्धीच्या वाटेवर जाईल. त्यातून होणारी अर्थप्राप्तीही सुखावणारी ठरेल. नोकरीच्या रुळलेल्या वाटेवरसुद्धा फायदे पदरात पाडून घेऊ शकाल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात सहकार्य मिळेल, आनंद राहील. 

तूळ - कोणत्याही प्रकारचा अतिरेक हा या सप्ताहाचे वेळापत्रक कोलमडून टाकायला पुरेसा ठरू शकतो. मूत्रविकार, त्वचाविकार, श्वसनमार्गाचे विकार किंवा महिलांना पाळीचे विकार यातून असे काही प्रसंग येऊ शकतात. ही काळजी घेतल्यास यशाची किमान काही अपेक्षा ठेवायला हरकत नाही. नोकरदारांना एखादा परीक्षेचा प्रसंग येऊ शकतो. चूक झाल्यास मात्र दुसरे टोक भोगावे लागेल. आर्थिक व्यवहारात शक्य ती पुरेशी काळजी घ्या. कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फार मोठे व्यवहार करू नका. 

वृश्‍चिक - या सप्ताहात काही वेगळ्या मार्गानी अपेक्षित यश मिळवता येईल. नोकरी-व्यवसायात कोणालाही न दुखावता केलेल्या व्यवहारातून फायदे पदरात पाडून घेऊ शकाल. नशिबाची मिळणारी अनपेक्षित साथ, प्रसंगी धावून येणारे अनोळखी चेहरे व उगाचंच वाटलं म्हणून करून घेतलेली एखादी चांगली गोष्ट अशा काही चांगल्या गोष्टींतून सप्ताह गाजणारा ठरू शकतो. काही सुखद धक्के बसू शकतात. नोकरी-व्यवसायातील आपले अपेक्षित यश आपल्याला सप्ताहात नक्की गाठता येणार आहे. 

धनु - मार्केटिंगच्या फसव्या जाळ्यामध्ये आपणही अडकण्याची शक्यता आहे. नसते प्रलोभन आपल्याला भुरळ पाडू शकते आणि त्यातून सप्ताहाचीच काय कदाचित पुढच्या आयुष्याचीही दिशा बदलू शकते. तेव्हा स्वत:च्या कष्टाने जे मिळेल त्यावर विश्वास ठेवून सप्ताहाची वाटचाल करा. नोकरी-व्यवसायात सगळीच अनुकूलता नसली तरी अपेक्षित यशापर्यंत जाण्याचा मार्ग मिळेल. आर्थिक सफलता पुरेशी राहील. नोकरदारांना आपले महत्त्व पटवून देता येईल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनातही काही चांगले प्रसंग उद्भवतील. 

मकर - एखादाच असा मोठा व्यवहार अनपेक्षितपणे घडून येईल की, पुढील अनेक दिवसांची चिंता मिटू शकेल. मात्र त्या मार्गात अनेक धोकेही असणार आहेत हे विसरू नका. सप्ताहातली शनिजयंतीची अमावास्या ही आपल्या अशा आर्थिक स्थानातूनच होत आहे. जवळ असलेला मित्र कधी उलटेल ते सांगता येणार नाही. कोणतीही गोष्ट गृहीत धरू नका. खात्री केल्याशिवाय त्या कामात पुढे जाऊ नका. बँक प्रकरणे काही दिवस स्थगित ठेवणे हिताचे. कुठल्याही कागदपत्रावर सही करताना विशेष काळजी घेणे आवश्यक.

कुंभ - नोकरी-व्यवसायातली अडथळ्यांची शर्यत अजून चालू राहणार आहे. विचार करून निर्णय घ्यावे लागणार आहेत.  घरातून मिळणारा पाठिंबा मात्र आपल्याला मोठी ऊर्जा देणारा ठरेल. नोकरी-व्यवसायात मोठे कोणतेही धाडस करू नका. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात होणाऱ्या मंगलप्रसंगांतून आपला कस लागणार आहे.  घरातील कोणाचे विवाह प्रश्न, शाळा प्रवेशाचे प्रश्न असोत ते व्यवस्थित मार्गी लागतील. नवीन वास्तूविषयक व्यवहारामध्ये अपेक्षित यश मिळू शकेल. 

मीन - नशिबाची साथ प्रत्येक वेळी मिळेल असे गृहीत धरू नका. पण सकारात्मक अशा प्रयत्नांना यश नक्की मिळेल हेही खरे. कायदेशीर मार्ग कुठेही सोडू नका. कोणाला किती महत्त्व द्यायचे हे वेळीच लक्षात घ्या. नोकरी-व्यवसायात सध्या अपेक्षित असे परिणाम दिसू लागणार आहेत. मागे केलेल्या प्रयत्नांचे फळ आपल्या पुढय़ात येणार आहे. आर्थिकदृष्टय़ा काही व्यवहार यशस्वी पार पडतील. सासुरवाडीच्या माध्यमातून काही व्यवहार मार्गी लागतील. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin