Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


आठवड्याचे भविष्य


Main News

मेष - चंद्राचे होणारे भ्रमण अचानक प्रवास घडवून आणणारे राहील. यशस्वी होण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. स्वत:चे प्रयत्न स्वत:च करावेत. हाती पैसा आला तरी खर्च उभा राहणार आहे. नातेवाईकांशी मतभेदाची शक्यता आहे. आव्हानात्मक कामे स्वीकाराल. अवाजवी धाडस करण्याचे टाळावे. स्वसंपादीत धनाचा उपभोग घेता येईल. समाधान लाभेल. आपल्या आवडत्या छंदास व्यावसायिक स्वरुप देण्यास योग्य काळ आहे. 

 वृषभ -  तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. स्वत:ची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी सतत कार्यरत प्रय}शील राहाल. कुसंगतिपासून दूर राहा. आपली आर्थिक बाजू बळकट करणा:या घटना घडतील. जुनी थकेलेली येणी वसूल होतील. घरात शुभसमारंभाचे आयोजन केले जाईल. घरातील वातावरण आनंदी राहील. मातृसौख्य लाभेल. आपल्या वाणीवर सभोवतालच्या व्यक्ती हुरळून जातील. आपले ध्येय साध्य करता येईल. सामाजिक क्षेत्रतील आपल्या आघाडीच्या नेतृत्वामुळे समाजात प्रतिष्ठा उंचावेल. 

मिथुन - नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय पूरक ग्रहमान आहे. नवीन गुंतवणूक करताना ङ्कात्र विचारपूर्वक करावी. व्यवसायात जवळच्या नातेवाईकांना सहभागी करून घेणो शक्य असेल तर जरूर करा. नव्या कामाचा प्रस्ताव येईल. व्यावसायीक प्रदर्शनातून चांगला फायदा होईल. हौसे मौजेखातर खर्च कराल. जूने मित्र भेटतील. एखाद्या सेवाभावी संस्थेतून किंवा सहकारी संस्थातून काम करता येईल. वरिष्ठ पदावर काही काळ काम करण्याची संधी मिळेल. मनाजोग्या ठिकाणी बदली होईल. 
 
कर्क -  व्यवसाय उद्योगात अभिनव तंत्रज्ञानाचा वापर करुन फायदा करुन घेता येईल. परप्रांताशी व्यावसायिक संबंध सुधारतील. कामाचे चांगले नियोजन कराल. धावपळीचे, कष्टाचे सार्थक होईल. नव्या कामात अपेक्षित यश मिळेल. साहस, आत्मविश्वास भरपूर असेल. कामाची नवी योजना आखाल. तुमच्या कार्यक्षेत्रत सुसंधी लाभतील. कला, साहित्य क्षेत्रतील लोकांना नवीन संधी उपलब्ध होतील. आशावादी धोरण स्वीकारुन आपली ध्येयपूर्ती होईल. पुढे घडणाऱ्या घटनांची आपल्याला चाहूल लागेल. 

 सिंह - दुसऱ्यांकडून काम करुन घेण्यात यशस्वी व्हाल. तब्येतीविषयी डॉक्टरांकडून वेळच्या वेळी तपासणी करुन घ्या. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल. बढती -बदलीसाठी नोकरीत केलेल्या प्रयत्नांना यश येईल. आपल्या इच्छा कृतीत येतील. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचा सल्ला व्यवसायाच्या दृष्टीने लाख मोलाचा ठरेल. प्रतिष्ठीत व्यक्तीच्या ओळखीतून कामे मार्गी लागतील. 

कन्या - आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल. व्यावसायिक भाग्य बीजे पेरली जातील. नोकरीत आपल्या अधिकार कक्षेत वाढ होईल. परक्या माणसाकडून अचानक मदत मिळाल्यामुळे लाभ होतील. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रत प्रगती होईल. सरकार दरबारी असलेल्या कामास विलंब होण्याची शक्य आहे. मन सैरभैर होणाऱ्या घटना घडतील. तीर्थस्थळांना भेटी देण्याचे योग येतील. दैनंदिन कामात थोडी दगदग झाली तरी त्याचे फळ उत्तम मिळेल. आपले काम दुसऱ्यावर सोपवू नका. आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. 
 
तुळ -  नवीन व्यावसायिक करार घडतील. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. वरिष्ठ पदावर काही काळ काम करण्याची संधी मिळेल. मनाजोग्या ठिकाणी बदली होईल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. जोडीदाराच्या मतांचा पगडा राहील. जनसंपर्कातून चांगला फायदा होईल. पुढे घडणाऱ्या घटनांची आपल्याला चाहूल लागेल. धार्मिक - आध्यात्मिक प्रगती साधता येईल. 

वृश्चिक  - चंद्राचे होणारे भ्रमण विद्याथ्र्यासाठी स्पर्धापरीक्षांतून यश मिळवून देणारे राहील. प्रवासात आपले ङ्कहत्वाचे दस्तऐवज सांभाळावेत. मात्र यशस्वी होण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. स्वत:चे प्रयत्न स्वत:च करावेत. हितशत्रूंच्या कारवायांना मोठय़ा युक्तीवादाने सामोरे जावे लागेल. मोठय़ा व्यक्तींच्या मदतीने उद्योग, नोकरीत उत्कर्ष करणाऱ्या घटना घडतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. मातुल घराण्यासंबंधी जिव्हाळा वाटेल. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. 

धनु -  सामाजिक, राजकीय क्षेत्रतील व्यक्तींच्या बोलण्याचा चांगला प्रभाव टाकणारा आहे. तरुणांना सुसंधीचा लाभ मिळेल. नवीन कार्यारंभ करण्याचा उत्साह निर्माण होईल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल.अंगी धडाडी येईल. कर्तुत्वशक्ती वाढल्याने धाडसी कामे कराल. आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटेल. नोकरीत अधिकार व सत्ता वाढेल. व्यापार-व्यवसायात नफा होईल. मात्र तात्पुरत्या स्वरुपात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. चांगल्या व्यक्तींची भेट होईल. 

  मकर - पूर्वनिोजित प्रवास काही कारणाने रद्द करावे लागतील. जुन्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत येतील. एखाद्या सेवाभावी संस्थेतून किंवा सहकारी संस्थातून काम करता येईल. महत्त्वाचे निर्णय घेताना अतिशय विचारपूर्वक अथवा योग्य व्यक्तीच्या सल्ल्यानेच घ्यावेत. जोडधंद्यातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल. कौटुंबिक शुभ-समारंभाचे आयोजन केले जाईल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील. वकर्तृत्वाच्या बळावर मोठी मजल माराल. ध्यानधारणोत प्रगती होईल. 

 कुंभ - नोकरी-व्यवसायातून आवक वाढणार आहे. आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. एखादी गोष्ट आपण निश्चित करु शकू हा विश्वास वाटेल. जोडधंद्यातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल. प्रतिष्ठीत  व्यक्तींचे सहकार्य लाभेल.प्रतिष्ठीत व्यक्तीच्या ओळखीतून कामे मार्गी लागतील. दैनंदिन कामात थोडी दगदग झाली तरी त्याचे फळ उत्तम मिळेल. आपले काम दुसऱ्यावर सोपवू नका. कौटुंबिक शुभ-समारंभाचे आयोजन केले जाईल. मिष्टान्न भोजनाचे योग येतील. 

 मीन - सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. व्यावसायिक प्रदर्शनातून चांगला लाभ घडून येईल. रचनात्मक कामातून लाभ होतील, आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. नवीन व्यवसायासाठी भांडवल उभे कराल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना चांगल्या संधी लाभतील.  आत्मपरीक्षणाचा आपल्याला खूप फायदा होईल. सामाजिक कार्यात आपल्याला योग्य प्रतिसाद मिळेल. समाजात आपल्या मतांचा आदर होईल. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin