Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


जाणून घ्या हा आठवडा कसा जाईल


Main News

मेष -  तब्येतीच्या बाबतीतही फार चालढकल करणे परवडणार नाही. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी स्थिती जैसे थे ठेवणे हे जास्त महत्त्वाचे. कोणताही फार मोठा धोका सध्या पत्करू नका. आहे त्या परिस्थितीतून आपल्याला फायदेशीर गणित जमवता येईलही पण घरगुती वातावरण शांत ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. सध्या कोणतेही दबावतंत्र उलटणारे ठरू शकते.

वृषभ - खर्चावर आणलेले  निर्बंध आणि केलेली शक्य तेवढी काटकसर याचा खूप उपयोग होणार आहे. नोकरी व्यवसायात फार मोठे बदल किंवा महत्त्वाचे निर्णय सध्या अपेक्षित नाहीत. आर्थिक गणित पुरेसे जमत राहील एवढे मात्र खरे. कला, साहित्य, संस्कृती, धार्मिक उपक्रम इत्यादी माध्यमातून आपला सामाजिक कार्यात संपर्क येईल. त्यातून आपला नावलौकिकही वाढता राहील. वैवाहिक जीवनात सध्या तरी आलबेल राहील याकडे आवर्जून लक्ष द्या. अनेक तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय मुलांच्या दृष्टीने कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका.

मिथुन -  पूर्ण काळजी घेऊन व्यवस्थित व्यवहार केले तर अतिचांगला सप्ताह जाणे सहज शक्य आहे. एखादा अनपेक्षित लाभ मिळू शकतो. त्वचेचे विकार, श्वसन मार्गाचे किंवा पोटाच्या विकारांसंबंधी त्रास असेल तर फार लांबवू नका. वेळीच काळजी घेऊन त्यावर उपाय योजना करा. हितशत्रूंची फार काळजी करण्याची गरज नाही. नोकरी व्यवसायात येणारे प्रसंग हे स्वतला सिध्द करण्यासाठी पुरेसे ठरणार आहेत. सरळमार्गी व्यवहार ठेवा, यश मिळू शकते.

कर्क -  थोरामोठ्यांचा मिळणारा आशीर्वाद, होत जाणाऱ्या गाठीभेटी, नवीन होऊ घातलेले पाहुणे आणि स्वतचा नियोजनबद्ध असा कार्यक्रम यांची छान सांगड घातली जाऊ शकणार आहे. नव्या कल्पना प्रत्याक्षात आणू शकाल. फायद्याचे थेट गणित जमवता येईल. बँक प्रकरणे मार्गी लागतील. घरातूनही पुरेसा पाठिंबा मिळेल. एकंदरीत सप्ताहातली भट्टी छान जमून येणार आहे. स्वतला त्यासाठी सिध्द करायचे तेवढे महत्त्वाचे. नोकरी व्यवसायात आर्थिक गणित चांगले जमेल. 

सिंह - मोठे वादविवाद आणि मतभिन्नता यामुळे तुमच्या नेतृत्व कौशल्याचा कस लागणार आहे. खरे तर आपले शब्द प्रमाण मानले जाणार आहेत, पण आपण त्यासाठी कोणती कारणे देत आहात हे जास्त महत्त्वाचे ठरेल. केवळ स्वार्थ पाहण्यापेक्षा काही सामाजिक दृष्टिकोनातून घेतलेले निर्णय हे दूरगामी चांगले परिणाम करणारे ठरतील. आर्थिकदृष्ट्या पायाभरणी होईल. प्रवास आणि पत्रव्यवहार यातून स्वतचे अनेक निर्णय मार्गी लावता येतील. 

कन्या -  मोठे व्यवहार करण्यापूर्वी योग्य त्या अनेक तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक घ्या, या सप्ताहात चुकणारे निर्णय हे दूरगामी परिणाम करणारे ठरू शकतात. गुंतवणूक असो किंवा नवीन कंत्राट मिळवणे असो कोणत्याही छुप्या अटींकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचा आगामी काळात फटका बसू शकतो. कामातली गती आणि डोक्यातले विचार याचा थेट संबंध असणारे नियोजन हिताचे ठरेल. 

तूळ - वैवाहिक जीवन, कौटुंबिक जीवन, व्यवसायिक वातावरण व सामाजिक परिवार यातून स्वत:चे वेगळेपण राखता येईल. फायद्याशी गाठ ठेवता येईल. घेतलेले निर्णय अंमलात आणता येतील. मिळणारी मदत, होणारे सहकार्य आणि स्वत:ला सुचणाऱ्या नवनव्या कल्पना यातून प्रगतीची वाट धरता येणार आहे. कामाचा आवाका वाढत राहिला तरी फायद्याच्या फार मोठ्या अपेक्षा मात्र ठेवू नका. भावंडांशी मोठे वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. 

वृश्‍चिक - ज्यांना आपण आयुष्यभर मदत करत आलो, ते आपल्या मदतीला येतीलच असे गृहीत धरू नका. साडेसातीमधे आपल्यावर प्रेम करणारी खरी माणसेच फक्त जवळ राहतात. त्यांना दुखवू नका. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात शक्य तेवढी शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा. नोकरी व्यवसायात कोणतेही धोके पत्करू नका. तसेच फार मोठे निर्णय सध्यातरी अमलात आणण्याच्या भानगडीत पडू नका.

धनु -  मोठी गुंतवणूक करणार असेल तर कायदेशीर सर्व सल्ला हाताशी ठेवा. कामाचे नियोजन केल्याशिवाय पुढे जाऊ नका. हा सप्ताह खूप मोठा फायदा देणारा मात्र कटकटीही निर्माण करणारा आहे. निखळ यश मिळेल अशी अपेक्षा सध्यातरी नको. सामाजिक, धार्मिक व कौटुंबिक कार्यातून एक वेगळे समाधान आपल्या हाती येईल. एखाद्याची निकड भागवल्याचे श्रेय मिळेल. त्यातून माणसे जोडली जातील. 

मकर -  कुठेही आक्रमकपणा सध्या उपयोगाचा नाही. नोकरी व्यवसायात आहे त्या गोष्टी जपणे जास्त महत्त्वाचे आहे. उगाच कोणावर काढलेला राग किंवा कोणाशी धरलेला आकस यातून नुकसानच शक्य आहे. नोकरी व्यवसायात तरी सध्या व्यवहारानेच वागलात तर आर्थिक स्तर नक्की उंचावता येईल. त्वचेचे विकार, मधुमेह किंवा रक्तदाब इ. विकार असणाऱ्यांनी या सप्ताहात विशेष काळजी घ्यावी. 

कुंभ - आपल्या अतिविचारी मनाला काही गोष्टी खटकणार आहेत. करायला जावे एक आणि व्हावे भलतेच अशा प्रसंगातून जावे लागेल. आपले म्हणणे समोरच्याला पटेलच असे नाही. गैरसमजांचा काळ असल्याने सध्या ताकही फुंकून पिण्याची वेळ आहे. सबुरीने घेण्याची गरज आहे. सगळेच काही तुटेल अशी शक्यता नाही पण वेळ जाणे शक्य. विचारपूर्वक, सल्ला घेऊन आणि अनुभवाच्या शिदोरीतून उतरलेले निर्णय घ्या, त्याचा फायदा नक्की होऊ शकेल. 

मीन - सप्ताहातली यशाची एकूण गोळाबेरीज ही आपल्याला अनुकूल अशीच ठरणार आहे. मनात आले आणि करून टाकले असे शक्यतो होऊ देऊ नका. विशेष नियोजन करून ते अमलात आणण्याचा प्रयत्न करा. थेट फायदा नसला तरी आगामी काळासाठीचा विचार चांगला होऊ शकेल. नोकरदारांना थोड्या संघर्षांतून का होईना पण बढतीची वाट मोकळी मिळू शकेल. अपेक्षित ठिकाणी बदलीचे प्रयत्न सफल ठरू शकतील. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin