Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


साप्ताहिक राशीभविष्य


Main News

मेष - कामधंद्यात सावध पवित्रा घ्या. आपल्या प्रगतीस चालना देण्याचे काम गुरु करणार आहे. आपल्या वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेऊन कार्यप्रणालीत योग्य सुधारणा करा.गुरू-शुक्राचा योग आपल्याला वैवाहिक जीवनात विशेष आनंद देणारा ठरणार आहे. भागीदारीत मनासारखे निर्णय होतील. कोर्ट-कचेरीच्या कामात अपेक्षित तडजोडी साध्य होतील. नोकरी-व्यवसायात चांगला मार्गदर्शक भेटेल. विवाहेच्छूंची प्रतीक्षा थांबेल. मुलांच्या दृष्टीने एखादा चांगला निर्णय घेऊ शकाल. 

वृषभ -  नोकरी-व्यवसायातली वाटचाल सोपी होईल. सहकाऱ्यांची मदत आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन यातून आपला प्रवास काहीसा सुलभ होईल. मोठी गुंतवणूक किंवा घरगुती स्वरूपाचे फार मोठे प्रश्न सोडविण्यासाठीचे निर्णय घाईने घेऊ नका.  तज्ज्ञांशी चर्चा करूनच निर्णय घ्या. आर्थिक थेट प्रगती होणार नसली तरी आगामी काळासाठीची पायाभरणी नक्की होईल. प्रतिष्ठा, पत, पैसा यापेक्षा सध्याचा काळ हा व्यावहारिक दृष्टीने पुढे जाण्यासाठीच महत्त्वाचा आहे. 

मिथुन - हितशत्रूंच्या कारवायांकडे लक्ष देण्यापेक्षा स्वत:चा सरळमार्गी असा प्रवास ठेवा. कामामध्ये स्वत:ला झोकून द्या. कारण हा सप्ताह आणि आगामी काही दिवस आपल्याला आर्थिकदृष्ट्या मोठा पल्ला गाठून देण्यास मदत करणारा ठरणार आहे. छोट्या छोट्या गोष्टीत अडकून राहण्यापेक्षा व्यावहारिकदृष्टया फायदेशीर ठरू शकणाऱ्या कामांनाच प्राधान्य द्या. प्रवास, पत्रव्यवहार, गाठीभेटी यांमध्ये पुरेशी काळजी घ्या. नोकरी-व्यवसायात अनेक मार्गानी आपले मनसुबे पूर्ण होणार आहेत. 

कर्क - सप्ताहातला गुरू-शुक्र योग आणि गुरुवारचा दिवस आपल्यासाठी विशेष महत्त्वाचा ठरावा. नोकरी-व्यवसायात आपल्याला मोठे करणाऱ्यांचे ऋण फेडू शकाल. आर्थिकदृष्टय़ा प्रगती गाठण्यासाठी हा सप्ताह विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. व्यापारी व व्यावसायिकांनाही हा सप्ताह एखादे घबाड आणून देणारा ठरू शकेल. शिक्षण, व्यापार किंवा व्यक्तिगत सल्लागार अशा सगळ्याच क्षेत्रांत कर्क राशिगटाला पुढे जाण्यासाठी हा सप्ताह महत्त्वाचा ठरणार आहे. 

सिंह - प्रवास, गाठीभेटी आणि नोकरी-व्यवसायातील महत्त्वाची बोलणी यामध्ये स्वत:चा वरचष्मा ठेवू शकाल. मनात असलेले अनेक प्रकल्प पुढे नेऊ शकाल. सध्या एक विशेष ऊर्जा आपल्याला आतूनच जाणवणार आहे.  घरगुती वादांचे कोणतेही परिणाम नोकरी-व्यवसायात होणार नाहीत याची तेवढी काळजी घ्या. सध्या आपले करिअर, शिक्षण आणि सामाजिक उपक्रम याकडे जास्त लक्ष देणे महत्त्वाचे ठरेल. 

कन्या -  कोणालाही न दुखावता किंवा न दुरावता आपली कामे करून घ्या. व्यवसायातील उधारी-वसुलीकडे लक्ष द्या. आपला अभ्यास, वाचन आणि अनुभव याचा छान उपयोग करून घेता येणार आहे. आपला मुद्दा समोरच्याला पटवून देण्याची आपली हातोटी चांगलीच कामाला येईल. आरोग्याच्या बाबतीत मात्र सतर्क राहणे फार गरजेचे ठरावे. प्रवासात कुठेही मोठा धोका पत्करू नका. 

तूळ - सप्ताहातला आपला प्रगतीचा आलेख हा चांगलाच वर जाणारा ठरणार आहे. शिक्षण, न्याय, खेळ व कला या क्षेत्रांत असणाऱ्यांना प्रगतीच्या एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवणारा सप्ताह ठरणार आहे. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात शक्य ती तडजोड करा. भागीदारी असो किंवा कोर्टदरबारची प्रकरणे, गोड बोलून कामे करून घेण्यावर भर द्या. आर्थिकदृष्ट्या सप्ताह थोडा कटकटीतून प्रगती देणारा ठरू शकतो. 

वृश्‍चिक - अनेक बाजूंनी त्रस्त असताना मदत करायला येणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. हक्काची मदत आपल्याला मिळू शकेल. मग ते भावंडं असतील किंवा पितृतुल्य असे कोणी असतील त्यातून आपल्याला आत्ताचे गंभीर प्रश्न बाजूला करता येतील. नोकरी-व्यवसायात मार्ग मिळू शकेल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात शांतता, संयम आणि सहनशीलतेची गरज आहे.

धनु - आपल्या अंगीभूत गुणांना वाव मिळेल. केलेला अभ्यास सत्कारणी लागेल. अनुभवांचा थेट फायदा होईल. ज्येष्ठ-वरिष्ठ यांच्या साहाय्याने चांगलेच पुढे जाता येईल. आपण शिक्षण क्षेत्रात असाल, न्याय क्षेत्र असो, सल्लाकार्य असो, सरकारी नोकरीत असाल किंवा कला क्षेत्रात असाल तर आपल्याला हा सप्ताह विशेष भेट देऊन जाणार आहे. कोणाला नोकरीतच अपेक्षित असे सुत जमेल तर कोणाला व्यापाराच्या नव्या क्षितिजाकडे झेप घेता येईल.

मकर - येणारी अनपेक्षित अशी दिव्य अनुभूती आपला उत्साह वाढवील. सप्ताहातील अनेक कामेही त्यातून आनंदाने मार्गी लावता येतील. एखाद्या दिव्य अशा व्यक्तींवर असलेला विश्वास सार्थकी लागेल. त्यातून नोकरी-व्यवसायातील कामाला चांगलीच ऊर्जा मिळेल.   कोणतेही दबावतंत्र न वापरता त्यात आपल्याला अपेक्षित यश मिळवायचे आहे. वैवाहिक व कौटुंबिक जीवनही त्या मानाने आनंदाचे राहील. घरात अडलेले विवाह मार्गी लागतील. 

कुंभ - अनपेक्षितपणे कोणाला केलेली मदत किंवा विस्मृतीत गेलेले असे सत्कार्य या सप्ताहात धावून येईल. कोणाचा अनपेक्षित असा सहवास तर कोणाची मदत, जुन्या ओळखी आणि कुटुंबातील कोणाच्या सहकार्याने होत जाणारे काम, अशा माध्यमांतून सप्ताह आपल्याला मोठ्या प्रगतीची चिन्हे दाखवणारा ठरणार आहे. उगाच कुठले राजकारण करीत बसण्यापेक्षा सरळमार्गी व्यवहारांना प्राधान्य द्या. 

मीन - नोकरी-व्यवसायातील अनेक कामांना चांगली गती मिळेल. आर्थिक प्रगतीसाठी जुनी येणी लक्षात घ्या. त्यांच्या वसुलीवर भर द्या. नोकरी-व्यवसायात नवीन कंत्राटापेक्षा आहे त्या कामांनाच प्राधान्य देणे जास्त हिताचे ठरावे. धार्मिक व सामाजिक कामात फार आघाडी नको मात्र उपस्थिती पुरेशी ठरेल. स्वत:ला कुठेही फार मोठ्या प्रमाणात पुढे न करता दुसऱ्या किंवा तिसऱ्या फळीवरून केलेली कामेसुद्धा आपल्याला अपेक्षित यश देणारी ठरतील. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin