Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


असा जाईल आठवडा


Main News

येणारा आठवडा खुप महत्त्वाचा आहे. कारण अर्थिक वर्ष संपत असून, या निमित्ताने काही चांगल्या गोष्टी घडून येणार आहेत. विवाहेइच्छुकांना दोनाचे चार हात होण्याची शक्यता अधिक आहे. आपली अपेक्षित गोष्ट साध्य करता येईल. तर अर्थिक व्यवहार संभाळून करावे लागणार आहेत. एकंदरीतच हा सप्ताह संमिश्र स्वरुपाचा असेल. 

मेष -  या सप्ताहात विद्यार्थी वर्गाचे प्रश्न, स्वतःचे आरोग्य, महत्त्वाची कागदपत्रे याबाबत अधिक लक्ष देणे आवश्यक असणार आहे. आर्थिक बाजूचा विचार करता हा आठवडा समाधानकारक असणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आपण आपल्या कामाचा व अन्य गोष्टींचा गाजावाजा न करता काम करावे. 

वृषभ -  या आठवड्यात सर्व बाबतीतील आर्थिक व्यवहारात फारच सतर्कता ठेवावी लागणार आहे, विशेषतः जागा अथवा वाहनखरेदीच्या संबंधात. आपल्याला नोकरी व्यवसायात मन लावून काम करण्याची आवश्यकता असते. मुलांच्यावर लक्ष ठेवा, जेणेकरून ते ती चांगल्या संगतीत वावरतील. वैवाहिक जीवनात तडजोडीचे धोरण स्वीकारावे. 

मिथुन - ग्रहमान पाहता प्रयत्नांची जोड देऊन आपण आपल्या कार्यात सफलता मिळवू शकाल. त्याचप्रमाणे थोरामोठ्यांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरेल. काही उत्कृष्ट गोष्टी घडून येण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण प्रकाशात याल. सध्याचा काळ आपल्या प्रयत्नांनी पुढे जाण्याचा आहे. 

कर्क - नवीन कामे मिळविण्यापेक्षा जुन्या व्यवहारातील वसुली करणे आपणास मोलाचे ठरणार आहे. यामुळे आर्थिक बाजू सुधारण्यास मदत होईल. नोकरदारांना आपले ध्येय साध्य करता येईल. हॉटेल व्यावसायिक, सराफ, न्यायखाते, पोलिस अशा क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्तींनी व्यवहारात पारदर्शीपणा ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे. नव्या नोकरी शोधणाऱ्यांनी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

सिंह - आपल्याला नोकरी व्यवसायाला आपले वेगळे कौशल्य सिद्ध करावयाचे आहे. आपला आर्थिक स्तर उंचावता येईल. व्यापार व्यवसायात आपले कौशल्य दाखविता येईल व आपल्या ग्राहकांना खूश ठेवता येईल. राजकीय क्षेत्रात एखादी मानाची जागा मिळू शकेल. सामाजिक कार्यात अग्रेसर राहता येईल व व्यासपीठ गाजवता येईल. समोर आलेल्या गोष्टींचा विचार करून आपले ध्येय साध्य करता येईल. 

कन्या - या आठवड्यात कॅशिअर्स, अकॉऊंटंट अशा व्यक्तींनी काळजी करणे महत्त्वाचे राहील. कारण बुध-शनीचा केंद्रयोग असल्याने आपले कौशल्य पणाला लावावे लागणार आहे, अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. प्रलोभनांपासून दूर राहा. प्रकृतीच्या कुरुबुरी राहणार असल्याने त्याची काळजी घ्या. 

तूळ - हा सप्ताह आपल्याला नोकरी व्यवसाय, शिक्षण, न्याय, शेती, साहित्य आणि कलाक्षेत्रात प्रगती करणारा राहील. नवे करार होतील. बेकारांना नवीन नोकरीची संधी प्राप्त होईल. विवाहइच्छुकांना दोनाचे चार हात होण्याची व आपली अपेक्षित गोष्ट साध्य करता येईल.
 
वृश्चिक -  ग्रहमान बघता आपणास मर्यादित यश मिळविता येईल, मात्र, कामाची पराकाष्ठा करण्याची तयारी ठेवावी लागेल. सध्या कोणतेही नवे प्रयोग करू नयेत. पण आपल्या प्रयत्नातून आपल्याला बराच पल्ला गाठणे शक्य होईल. कोणालाही नाराज करू नका. वैवाहिक जीवनातील संघर्षाची दरी कमी होईल. मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागेल. 

धनू - आपले ग्रहमान पाहता दैनंदिन जीवनात काही अनपेक्षित गोष्टींमुळे निर्णय बदलावे लागतात त्यामुळे कालापव्यय होतो. पण नव्या ओळखी, मिळणारे चांगले संकेत आणि वस्तुस्थिती याद्वारे चांगल्या संधी मिळू शकतात. व्यापार व नोकरीसाठी जास्तीत जास्त वेळ द्यावा, जेणेकरून येणाऱ्या अडचणींतून मार्ग काढणे सोपे जाईल. सामाजिक संस्थातील आपला वावर वाढेल. 

मकर -  हा आठवडा गतिमान राहण्याची शक्यता राहील. आपल्या प्रवासातील कामे होतील. बराच काळ प्रलंबित असलेली येणी वसूल होतील. प्रकृतीस्वास्थ्य आणि आर्थिक चुका या दोन गोष्टींवर योग्य नियंत्रण ठेवल्यास आपणास खूप काही साध्य करता येईल. 

कुंभ -  अडथळ्यातून मार्ग काढून आपण आपली ध्येयपूर्ती पुरी कराल. स्वतःचा अहंकार सध्या बाजूला ठेवा. नोकरी व्यवसायातील होणारे वादविवाद ताबडतोब थांबविणे योग्य ठरेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना अपेक्षित संधी मिळेल. 

मीन - हा आठवडा कार्यात व्यस्त असणारा राहील. आपले ध्येय निश्चित करा. आपणास मिळणाऱ्या वेळेचा योग्य उपयोग करा. कामाचे योग्य नियोजन करा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. गुंतवणुकीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरी व्यवसायात आपण निश्चितपणे हळूहळू प्रगती करू शकाल. घरगुती खर्चाचे आकडे वाढणार आहेत, तेव्हा वेळीच त्याचे नियंत्रण करा. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin