Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


असा जाईल हा आठवडा


Main News

या सात दिवसांमध्ये चंद्र मेष राशीपासून कर्क राशीपर्यंत जाईल. या आठवड्यात चंद्रावर प्रत्येक दिवशी कोणत्या न कोणत्या ग्रहाची दृष्टी राहील. यामुळे शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारचे योग जुळून येतील. सहा ग्रहांचा प्रभाव चंद्रावर असल्यामुळे काही लोकांसाठी आठवडा चांगला तर काहींसाठी अडचणी निर्माण करणारा ठरू शकतो. 

मेष 
चंद्राचा गोचर व राशिस्वामी मंगळाच्या दृष्टीतून सुखप्राप्ती होईल, तसेच कामात वाढ होईल. मित्रांची मदत मिळेल तसेच नवी कामेही मिळतील. जास्त खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मर्यादित. वाहनसुख प्राप्त होईल व संततिसुखही मिळेल.
वृषभ 
दशमीच्या चंद्रामुळे समस्या वाढू शकतात. बुधवारी दिलासा मिळेल. शुक्राची दृष्टी समाप्त होणार असल्याने नैराश्य येणार. धार्मिक यात्रेचा योग येण्याची शक्यता आहे. उत्पन्न सामान्य तथा मुलांकडे लक्ष द्यावे लागेल. बुधवारी किंवा शुक्रवारी वाद होऊ शकतो.

मिथुन 
बुधासोबत शुक्राची दृष्टीही मिळेल. ही वेळ चांगली राहील. बुधवार, गुरुवारी समस्या वाढू शकतात. उत्पन्नही कमी होईल. शुक्रवारपासून पुन्हा चांगली स्थिती. इतरांकडून मदत मिळेल. आठवड्यात लहान प्रवासाची शक्यता. यासोबत संतांची भेट होईल.

कर्क 
सूर्याच्या आशीर्वादाने राशींना बळ मिळणार आहे. चंद्राच्या आशीर्वादाने धनलाभ होण्याची गरज आहे. टीका करणारे समर्थन करतील, तर शत्रूंचे बळ कमी होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी सन्मान मिळेल. जबाबदारी वाढेल. वर्चस्व वाढेल तथा वादात विजय मिळेल.

सिंह 
संपूर्ण आठवड्यात चंद्राचा गोचर शुभ राहील. लाभदायक स्थिती वाढेल व प्रतिष्ठेत वाढ होईल. आत्मविश्वास कायम राहील. मनात विरक्त भाव राहतील. शत्रुत्व समाप्त करण्याची इच्छा राहील. गुरुवारनंतर चंद्र अनुकूल न राहिल्याने चिंता वाढू शकतात.

कन्या 
राहू राशीतून निघाल्यामुळे दिलासा मिळेल. चंद्राच्या आशीर्वादाने धन प्राप्तही होईल. भाग्य अनुकूल होत जाईल तथा कार्यात व्यग्र राहाल. प्रवासाचा योग टळू शकतो किंवा त्यामध्ये अडचणी येऊ शकतात. मित्रांशी भेट होईल. आठवड्यात धोकेबाजांपासून सावध राहा.

तूळ 
मंगळाचा गोचर व चंद्राच्या दृष्टीने उत्पन्नवाढीमुळे अानंद प्राप्त होईल. दुसऱ्यांना मदत करावी लागू शकते. कामात सातत्य राहील व नवे कामही प्राप्त होईल. शत्रूंचा पराभव होईल. संपत्ती प्रकरण तुमच्या बाजूने होणे शक्य. आठवड्यात मौल्यवान सामान हरवू शकते.

वृश्चिक
शुक्र राशीतून निघणार आहे तथा शनी राहणार आहे. उत्पन्न मिळेल. परंतु, विलंबाने. काम होण्यात अडचणी येतील. डबा व्यवसाय तथा अन्य प्रकारच्या सट्टा करणाऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबातच मतभेद वाढू शकतात. आठवड्यात अतिरिक्त सावधगिरी बाळगा.

धनू 
बुध गोचर व शुक्राचा प्रवेश राहील. खर्च जास्त असेल, उत्पन्नाची स्थिती कमी राहील. मनात भीती कायम राहील. आशा मावळतील. बुधवारपासून काहीशी सुधारणा. उत्पन्नातील वाढीसोबत योजना यशस्वी होतील, सहकार्यही मिळेल. कामाच्या ठिकाणी गौरव वाढेल.

मकर 
सूर्याची कृपा व चतुर्थातील चंद्राचा प्रभाव कायम राहील. उत्पन्न मनासारखे मिळणार नाही. समपदस्थांपासून मागे राहण्याचे शल्य बोचणार आहे. मंगळवारी सकाळी परिस्थितीत सुधारणा होईल. विरोधकांची बाजू कमजोर होईल तथा वादात विजय मिळेल. मोठे काम मिळण्याची शक्यता.
कुंभ 
गुरू-राहूच्या दृष्टीसोबत केतूचा गोचर अाहे. वेळ अनुकूल आहे. अचल धनसंपत्तीत वाढीचा योग आहे. वडिलोपार्जित संपत्तीचा वाद सुटेल. मन प्रसन्न राहील तसेच प्रतिष्ठित लोकांना भेटण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी किरकोळ वाद उत्पन्न होऊ शकेल.

मीन
द्वितीय चंद्रमा आहे. वेळ कार्यानुसार अनुकूल आहे. सुख मिळेल तसेच धनाची प्राप्तीही सहज होईल. बुधवारपासून वेळेत काही नकारात्मक बदल होऊ शकतात. ही वेळ सजग राहण्याची आहे. हट्ट करणे महागात पडू शकते. योजनांमध्ये फेरबदल करावा लागेल.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin