Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


२०१६ नववर्षाचे राशीभविष्य


Main News

मेष - यंदाचे वर्ष तुम्हाला आर्थिक दृष्ट्या उत्तम राहणार असून, आरोग्याच्या दृष्टीने म्हणावे तितके साथ देणारे नाही. जानेवारी नंतरचा काळ तुम्हाला यशस्वीतेकडे घेऊन जाईल. फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला आर्थिक प्राप्त चांगली होईल. तसेच या महिन्यात तुम्हाला प्रवासाचाही योग आहे. मात्र, फेब्रुवारी पासून जून पर्यंतचा कालावधी तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने तापदायक राहणार आहे. मार्च महिन्यात भांडण तंटा, वाद विवाद यांपासून दूर रहा. एप्रिलनंतर तुमचा काळ पुन्हा उत्तम राहणार असून, तो जूनपर्यंत कायम राहील. जुलै महिन्यात तुम्हाला लोकप्रिय व बड्या लोकांना भेटण्याचे योग येतील. जानेवारी ते मार्च या दरम्यान केलेल्या कामाचे रिझल्ट तुम्हाला सप्टेबर मध्ये मिळतील. मात्र, तुमच्या शत्रु पक्षातील लोक सप्टेबरमध्ये पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे. या काळात डोके शांत ठेवा. समजूतदारपणे निर्णय घ्या. नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात प्रकृतीला जपा. 

वृषभ - यंदाच्या वर्षात तुम्हाला घरगुती अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.बऱ्याचदा तुमचा पाय घसरण्याची शक्यता आहे. परंतु, तुमच्या विचारांच्या जोरावर तुम्ही अशा स्थितीतून मोठ्या शिताफीने मार्ग काढाल. जानेवारीच्या मध्यापासून सकारात्मक गोष्टी घडायला सुरूवात होईल. फेब्रुवारीत पती पत्नी, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड यांच्यात काहीसा तणाव निर्माण होईल. मार्चमध्ये आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. एप्रिलमध्ये आर्थिक लाभ होईल. मे आपणासाठी आनंददायी राहणार असून, या महिन्यात अनेक प्रश्न मार्गी लागतील. जुन, जुलैमध्येही आपणासाठी काळ चांगला असून, धनप्राप्तीचा योग आहे. ऑगस्टमध्ये शासकीय कामे मार्गी लागतील. प्रेमी युगुलांसाठी हा महिना फायदेशीर राहणार आहे. सप्टेबर, ऑक्टोबरमध्ये आपल्या छुप्या शत्रूंपासून दूर रहा. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये आरोग्याची काळजी घ्या. हातापायाला दुखापत होईल, अशी कामे शक्यतो टाळा. 

मिथुन - नव्या वर्षात आपणास आपल्या हितशत्रूंपासून सावधगिरी बाळगावी लागेल. खरे तर ते तुमची प्रगती रोखू शकत नाहीत. परंतु, तुम्हाला कारणाशिवाय त्रास देऊ शकतात. आर्थिक स्थिती यंदा बेताचीच राहील. जानेवारी महिन्यात तब्बेतीची काळजी घ्या. फेब्रुवारीत विरोधकांपासून थोडे दूरच रहा. मार्चमध्ये आपली आर्थिक स्थिती बेताचीच राहील. मात्र, एप्रिल महिना आपल्यासाठी खास असेल. जूनमध्ये आर्थिक खर्चांवर निर्बंध लादा. जुलै (मध्य), सप्टेबर आणि ऑक्टोबर या वर्षातला तुमचा सर्वोत्तम काळ राहील. या महिन्यात तुमचे प्रत्येक पाऊल तुम्हाला सफलतेकडे घेऊन जाणारे असेल. त्यासाठी विचारपूर्वक पाऊल टाकण्याची गरज आहे. नोव्हेंबर महिन्यात प्रवासाचा योग आहे. मात्र, तुम्ही स्वत: गाडी चालवत असाल तर सावधगिरी बाळगा. डिसेंबर महिन्यात आरोग्याकडे लक्ष द्या. विचार आणि प्रत्यक्ष कृती यांचा योग्य मेळ घातल्यास हे वर्ष आपणास बऱ्यापैकी यशदायी ठरू शकते.

कर्क - हे वर्ष आपणास सुबत्तेचे व भरभराटीचे लाभणार आहे. या वर्षात आपणास जवळचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांचे चांगले सहकार्य लाभेल. जानेवारी महिन्यात आप्तेष्ठांसोबत वाद टाळा. फेब्रुवारी महिना आपणास मानसिक बळ वाढवणारा ठरेल. मार्चच्या मध्यापासून शारिरिक त्रास कमी होईल. एप्रिल महिण्यात फेब्रुवारी महिण्याची पुनरावृत्ती घडेल. आपली कामे मार्गी लागतील. मे महिन्यात आर्थिक फायदा होईल. जून महिना आपणास थोडा खडतर राहील.  त्यामुळे महत्त्वाची कामे शक्यतो थोडी पुढच्या महिन्यात ढकलली तरी उत्तम. जुलै महिना पुन्हा आपणास फायदेशीर राहणार आहे. जुलै महिन्यातली स्थिती ऑगस्टमध्ये कायम राहील. सप्टेबर, ऑक्टोबर मध्ये तुम्ही केलेले काम तुम्हाला अधिक प्रतिष्ठा मिळवून देईल. नोव्हेबर प्रकृतीच्या समस्या काहीशा डोके वर काढतील. डिसेंबरमध्ये आपले शत्रू कमी झालेले असतील.

सिंह - आपली या वर्षाची सुरूवात तर धमाकेदार होणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात आपला दबदबा वाढेल. प्रसिध्दी आणि आर्थिक फायद्यासाठी जानेवारी महिना आपणास शुभस्थानी राहणार आहे. मात्र जानेवारी संपून आपण फेब्रुवारीत प्रवेश करताच आपणास घरगुती अडचणींचा सामना  करावा लागेल. या महिन्यात पती-पत्नींनी वाद विवाद टाळावेत. जमिनीचे खटले,  सरकारी कामे निकाली निघण्याकडे वाटचाल सुरू होईल. मात्र, या कालावधीत पडेल ते काम करण्याची तयारी ठेवावी लागेल. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये प्रकृतीला सांभाळा. एप्रिलपासून आपला या वर्षातला उत्तम काळ सुरू होईल. या महिन्यात आपण पाठिमागे केलेल्या कामांचे फळ घ्याल. त्यामुळे आर्थिक फायदाही वाढेल. मार्चपासून सुरू झालेली ही स्थिती एप्रिल व मे च्या मध्यापर्यंत कायम राहील. जून, जुलैमध्ये कोर्टाच्या कामांना हात घालाल तर फायदा होईल.  ऑगस्ट, सप्टेबरमध्ये थोडी सावधगिरी बाळगा. या काळात आपण फसवले जावू शकता. ऑक्टोबर, नोव्हेबर हा काळ संमिश्र राहील. या काळात आपला फार फायदा होणार नाही. मात्र, तोटाही होणार नाही. डिसेंबरमध्ये आपणास शत्रूंपासून सुटका होण्याचा संभव आहे.
 
कन्या - या वर्षात आर्थिक खर्चावर नियंत्रण घालून घेतल्यास हे वर्ष तुमचेच आहे, असे समजा. शुभकार्यासाठी हे वर्ष तुम्हाला चांगलेच फायदेशीर राहणार आहे. वर्षाची सुरूवात काहीशी धिमी होणार असली तरी, जानेवारीच्या मध्यापासून आपला काळ चांगला राहणार आहे. फेब्रुवारीत ही स्थिती कायम राहील. मात्र, आपले शत्रू डोके वर काढतील.  एप्रिलमध्ये आपण काहीशा रोमॅंटीक मुडमध्ये असाल.  मध्ये आपले विरोधक काहीसे थंडावतील. महिना अखेरीस आपला दबदबा वाढून आपण विरोधकांनाही आपल्या प्रभावाखाली आणाल. जूनमध्ये कोणतेही पाऊल टाकताना काळजी घ्या.  जुलै महिन्यात नैतिक प्रतिष्ठेला सांभाळा. आपल्या जवळच्याच मित्र-मैत्रिणींकडून झालेल्या आरोपांमुळे आपल्या प्रतिष्ठेला बाधा येण्याची शक्यता आहे. या महिन्यात आपल्या लैंगिक भावनांवर नियंत्रण मिळवा. जवळच्याच लोकांकडून (मित्र, मैत्रिणी, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड / विवाहबाह्य संबंध आदी.) आपणावर लैंगिक शोषणाचे आरोप लागू शकतात. त्यातून फार काही निष्पन्न होणार नसले तरी, तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लावायला हे आरोप पुरेसे असतील. ऑगस्ट महिन्यात आर्थिक तंगी होईल. सप्टेंबरमध्येही ही स्थिती कायम असेल. तसेच, जुलै महिन्यातली प्रकरणे निपटविण्यात बराच वेळ जाईल. मात्र, या प्रकरणातून तुम्ही सही-सलामत सुटाल. फक्त रागावर नियंत्रण ठेवा. ऑक्टोबर, नोव्हेंबर डिसेंबर तिनही महिन्यात आर्थिक फायद्याचे योग आहेत. मात्र, त्यात सातत्य न राहता. अचानक धनप्राप्ती होण्याचा योग आहे.  

तुळ - पर्यटन, अध्यापन, मोडिकल, कन्सल्टन्सी,  व्यापार, विमा क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींसाठी हे वर्ष विशेष फायद्याचे राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.  जानेवारीत आरोग्य उत्तम राहील. फेब्रवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून आर्थिक वृद्धी होण्याचे योग. एप्रिल हितशत्रू दगा देण्याची शक्यता. मे महिन्याच्या मध्यापासून आपणास आरोग्याच्या समस्या भेडसावण्याची शक्यता. जून आर्थिक स्थिती सुधारण्याचा संभव. जुलै काळजीपूर्वक प्रयत्न करा. यश मिळेल. जुलैमध्ये केलेल्या कामाच्या फळाची आपेक्षा करू नका. त्या कामाचे फळ ऑगस्टमध्ये  मिळण्याची शक्यता. मात्र, ऑगस्टमध्ये वाढणाऱ्या खर्चाला तयार रहा. सप्टेंबर महिना आपणास काहीसा सौम्य जाईल. या महिन्याकडून कार्याची फार अपेक्षा करू नका. ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेबर आपणास जास्त लाभदायी ठरेल. कोर्ट कचेरीची कामे होतील.  डिसेंबर महिन्यात आरोग्याच्या समस्या सतावतील, परंतु, वर्षाचा शेवट छान होईल.  

वृश्चिक - २०१६  या वर्षात प्रत्येक कामात पुढचे पाऊल पढेल. परंतु, साडेसातीचा योग असल्याने मार्गात अडथळेही येत राहतील. त्यावर शिताफीने मात करावी लागेल. प्रत्येक गोष्टीत जागरूक रहावे लागेल. जानेवारी महिन्यात नव्या घरात प्रवेश करण्याचे योग. या महिन्यात आपणास शत्रूंपासून धोका नाही. मात्र, रागावर नियंत्रण ठोवा. राग हाच तुमचा या महिन्यातील मोठा शत्रु संभवतो. फेब्रुवारी महिन्यात कामावर जोर द्या.  एप्रिलमध्ये प्रवासाचे योग येतील. मे, आणि जून मध्ये स्वत: ला सांभाळा. कोणत्याही मोहात पडू नका. जुलैमध्ये आपल्या कामात अधिक सुधारणा होईल. तसेच त्याचे फायदेही तसेच राहतील. ऑगस्टमध्ये धनलाभाची शक्यता. ही शक्यता पूर्ण सप्टेबर व ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता. नोव्हेबर, डिसेंबरमध्ये अधिकारी व समाजातील मान्यवर मंडळींसोबत काम करण्याची संधी मिळण्याची शक्यता. डिसेंबरच्या मध्यानंतर वर्षाअखेर त्रासदायक होण्याची शक्यता.

धनु - या वर्षात समाधानकारक धनप्राप्ती होईल. मात्र, आर्थिक खर्चांमध्ये वाढ झाल्याने तंगी सतावेल. खरेदी – विक्रीचे योग वाढतील. वाहन खरेदीचे काम मार्गी लागण्याची शक्यता. वर्षाच्या उत्तरार्धात राजकीय यश मिळण्याची शक्यता. शासकीय कामांत आपल्या शब्दाला किंमत प्राप्त होईल. जानेवारीच्या सुरूवातीस काहीसा चिडचिडेपणा, खटके अशा अवस्थेतच वर्षारंभ होईल. त्यानंतर बऱ्याच गोष्टी सुरळीत पार पडतील. फेब्रुवारीत खर्च वाढण्याची शक्यता. कोर्ट कचेरीच्या कामात काहीशी मंदी येईल. मार्चमध्ये कामे मार्गी लागतील. पण त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. शत्रुपक्षाकडून अडथळे आणण्याचे काम केले जाईल. एप्रिल संमिश्र राहील. मे महिन्यात शत्रुपक्षाचा क्षय होईल. जूनमध्ये व्यवहार वाढतील. व्यापार, नोकरीत यश. जूनच्या तूलनेत जूलै कमजोर राहील. सप्टेबरपर्यंत खर्च वाढतच राहतील. ऑगस्टमध्ये आपल्या योजना पूढे रेटल्यास मनासारखे यश मिळू शकते. मात्र, कच खाल्यास हाती काहीही न लागण्याचा संभव. पुढे डिसेंबरपर्यंत काळ उत्तम.

मकर - हे वर्ष कमजोर मनाच्या व्यक्तिंना अकारण ताण (टेन्शन) जाणवेल. प्रकृतीसाटी सर्वसाधारण राहील. मात्र, व्यापार वाढेल. उलाढाल होईल. जानेवारीत धनप्राप्ती होईल. छोट्याशा यशाने हूरळून जावू नका. यशाच्या आनंदावर नियंत्रण ठेवा.  फेब्रुवारीत स्थिती जैसे थे राहील. मार्चच्या मध्यापासून आपणात उत्साह संचारेल. आपले मनोबल वाढेल. त्याचा परिणाम कामावर होऊन अपेक्षित परिणाम दिसू लागतील. एप्रिल मानसन्मान वाढेल. मे मध्ये मनोकामना पूर्ण होतील. त्यासाठी आपल्या कामात इतरांनाही सहभागी करून घेतल्यास अधिक फायदा. जूनमध्ये आपली सरकारी कामे मार्गी लागतील. जुलैपासून, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत उत्तम काळ. ज्या कामाला हात घालाल त्याला यश येण्याची अधिक शक्यता. ऑक्टोबर ते नोव्हेबर या काळात तयारी न करता मैदानात उतरू नका. तुम्हाला जे काम करायचे त्याचा आगोदर पुरेसा अभ्यास करा. मगच कामाला हात घाला. डिसेंबरमध्ये आपली वर्षाखेर चांगली होईल. शत्रु दुर्बल होतील.

कुंभ - घरगुती बाबी नेहमीसारख्याच राहतील. किरकोळ समस्या होण्याची शक्यता असली तरी, गुरु सातव्या स्थानी राहिल्यानं परिस्थिती हाताबाहेर जाऊ देणार नाही. मेंदूला काही आरोग्यविषयक समस्या होण्याची शक्यता आहे. २०१६  हे वर्ष तुमचं आर्थिक जीवन सुंदर ठेवेल.  नोकरी करणारे कुंभ व्यक्तींना हे वर्ष नाव, प्रसिद्धी, प्रतिष्ठा आणि प्रगती मिळवून देईल. तुमचे वरिष्ठ किंवा जोडीदार असोत, प्रत्येकाला तुमच्यातील कुशल कर्मचारी दिसेल, आणि तुमच्यावर ते प्रशंसेचा पाऊस पाडतील. तुम्ही व्यवसायिक असाल तर दुःखी होण्याचं कारण नाही, कारण  २०१६ तुमच्यासाठी देखील लाभदायक ठरणार आहे. अखेरीस; प्रेम जीवन देखील  योग्य मार्गावरच राहील.

मीन -  हे वर्ष थोडेसे त्रासदायक ठरणार आहे. कौटुंबिक स्थिती फारशी आशादायक नाही. काळजीपुर्वक वर्तन आणि हुशारीने कृती करणे तुमच्या मार्गातील समस्या दूर ठेवण्यासाठी अत्यावश्यक आहे. तुम्ही केलेली कोणतीही चूक मोठे परिणाम घडवू शकते; त्यामुळे, प्रत्येक गोष्टीबाबत अतिशय काळजीपूर्वक राहा. आतडे, यकृत आणि मूत्रपिंड आपल्या चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबी सामान्य राहतील. नोकरीच्या आरंभिक टप्प्यांमध्ये समस्या उद्‌भवू  शकतात; परंतु, तुम्हाला नंतरच्या काळात प्रचंड यश मिळेल. नोकरीतील प्रगती ही तुमच्या जीवनासाठी नशीब आणि कल्याण होण्याकरिता एक संचालन बलाचं काम करेल. व्यवसायिक नसलेल्या मीन राशीच्या व्यक्तिंना, ऑगस्टनंतर यशाची मोठी फळे चाखायला मिळतील. तुम्ही नव्या व्यवसायिक जोडीदारांसोबत देखील भागीदारी कराल. प्रेम जीवनाला ऑगस्टनंतर योग्य दिशेने गती मिळेल. त्यापूर्वी प्रेमाचे प्रसंग घडण्याची अपेक्षा ठेवू नका.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin