Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


साप्ताहिक राशिभविष्य


Main News

वर्षाच्या शेवटच्या दिवसात मंगळ आणि शनीचे अशुभ योग नष्ट होत असल्यामुळे कामामध्ये येणारे अडथळे दूर होतील. नवीन वर्षाची सुरुवात काही राशींसाठी चांगली राहील. नोकरदर आणि बिझनेस करणारे अनेक लोक नवीन प्लानिंगने वर्षाची सुरुवात करतील. धनु राशीतील सूर्य नोकरीत पदोन्नती करू देईल.

मेष
राशीचा स्वामी मंगळ आणि गुरूच्या कृपेसोबतच चतुर्थेतील चंद्रामुळे कामाची गती मंद आणि आवक कमी राहील. उत्साहसुद्धा कमी असेल. बुधवारपासून यात वृद्धी होण्याची शक्यता आहे. प्रवासाचा योग असून परदेशी जाणाऱ्यांच्या अडचणी सुटतील. आनंदवार्ता कानी पडतील.

मिथुन
सूर्याच्या कृपेमुळे आत्मविश्वास वाढीस लागेल. स्वभाव आक्रमकही होऊ शकतो. राग अधिक राहील. सर्व कामं वेळेवर होतील. एखाद्या पर्वतावर सफारीस जाण्याची संधी मिळेल. शत्रूंचा पराभव होईल. वादग्रस्त प्रकरणांत यश मिळेल. चंद्राच्या गोचरामुळे उत्पन्न चांगले राहील.
 
कर्क
राशीचा स्वामी चंद्राचे गोचर बुधाच्या कृपेने आठवड्याची सुरुवात खूपच चांगली राहील. उत्पन्न चांगले राहील. मात्र, अनावश्यक शंका कायमच असतील. प्रतिष्ठितांच्या भेटीगाठी होत राहतील. आठवड्याच्या मध्यात उत्पन्न कमी होऊ शकते. शेवटी पुन्हा सर्वकाही ठिक होईल. 

सिंह
गुरूचे गोचर शनीची राशीवर कृपा राहील. मानसिक त्रास होऊ शकतो. आठवड्याच्या मध्यात चंद्राच्या राशीतील प्रवेशामुळे गजकेशरी योग बनेल. नशीब चांगले राहील राजपक्षाकडून लाभ मिळेल. महत्त्वाचे पद मिळेल. कामं वेळेवर होतील आणि आनंद मिळेल.

कन्या
राहूचा गोचर राशीत कायम आहे. कित्येक दिवसांपासूनच्या अडचणी संपुष्टात येतील. कामांबाबत नवे करार होऊ शकतात. प्रवास यशस्वी ठरेल आणि एखादे मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. धन आवक चांगलीच राहील. आठवड्याच्या मध्यात उत्पन्नात काहीशी घट होईल.

तूळ
राशीत शत्रू मंगळाचे गोचर आहे. उत्पन्न प्रभावित होईल. स्वभावात चिडचिडेपणा येईल. सरकारी यंत्रणांशी वाद होऊ शकतो. न्यायालयीन जमिनीसंबंधी वादात पीछेहाट होण्याची भीती आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत अनावश्यक खर्च होईल. प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचे प्रयत्नही होतील.

वृश्चिक
शत्रू शुक्र, शनीचा गोचर नवमेत चंद्र राहील. उत्पन्न येईल. मात्र, अडचणी कमी होणार नाहीत. निराशेचा भाव वरचढ ठरू शकतो. चिंता जास्त राहतील तणाव कमी होणार नाही. या आठवड्यात मोठ्या समस्यांवर उपाययोजना मिळण्याची शक्यता. शत्रू अयशस्वी ठरतील.

धनू
राशीत सूर्याचे गोचर राहील आणि चंद्र अष्टमेत असेल. आठवड्याच्या सुरुवातीला उत्पन्नासंबंधीत अडचणी येतील. बुधवारपासून स्थितीत सुधारणा. नाराज लोकांची मनधरणी यशस्वी ठरेल. कुटुंबात आनंदप्राप्ती होईल. आत्मविश्वास कायम राहील. प्रतिष्ठाही मिळेल.

मकर
मित्र बुधाचा गोचर आणि चंद्राच्या कृपेमुळे काळ चांगला राहील. अडकलेले धन मिळेल. कामही वेळेवर होतील. प्रवास शुभ प्रसन्नता देणाऱ्या वार्ता कानी पडतील. मित्रांपासून सावध राहा. चंद्राच्या गोचरामुळे उत्पन्न चांगले राहील. विरोधक नरम पडतील.

कुंभ
आठवड्यात गुरूसोबतच चंद्राचीही पूर्ण कृपादृष्टी असेल. हा योग सर्वप्रकारे शुभ आहे. उत्पन्नात वृद्धी होईल आणि कामकाज नियमित सुरू राहील. राजपक्षाकडून लाभ होईल. कामकाजाच्या ठिकाणी प्रतिष्ठेत वाढ होईल. कुटुंबीयांच्या अपेक्षा पूर्ण होतील. आठवड्यात आर्थिक नुकसानाची शक्यता.

मीन
पंचमेतील चंद्र, केतूचे गोचर राहूच्या कृपेने राशीत सर्वकाही चांगलेच राहण्याची शक्यता आहे. गुप्त शत्रूंच्या चाली निरर्थक ठरतील बलप्राप्ती होईल. उत्पन्न चांगले आणि प्रवास यशदायी ठरतील. आजोळकडून निराशाजनक माहिती मिळू शकते. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin