Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


१६ ते २२ नोव्हेंबर : असा राहील आठवडा


Main News

या आठवड्याची सुरुवातच सूर्याच्या रास परिवर्तनाने होत आहे. १७ तारखेला सूर्य आणि बुध वृश्चिक राशीमध्ये शनिसोबत येतील. या ग्रहस्थितीचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर पडेल. सूर्य आणि शनि एकमेकांचे शत्रू ग्रह आहेत. हे दोन्ही ग्रह एकाच राशीत असणे शुभ मानले जात नाही. यांच्या प्रभावाने वाद, कलह, नुकसान, मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. शनि बुध एकत्र आल्यामुळे शेअर मार्केट, वायदे बाजार, मिशनरीचे काम करणाऱ्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा काळ चढ-उताराचा राहू शकतो. विमा कंपनीत काम करणाऱ्या, बँकिंग, कोर्ट आणि गुत्तेदारी करणाऱ्यांसाठी हे सात दिवस खास राहतील.

या सात दिवसांमध्ये चंद्र धनु राशीतून मीन राशीपर्यंत जाईल. आठवड्याच्या मध्यात चंद्र जवळपास अडीच दिवस मकर राशीत असताना त्यावर शनीची वक्रदृष्टी राहील. हे दोन दिवस काही लोकांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतात. या व्यतिरिक्त इतर ग्रहांच्या स्थितीनुसार शुभ-अशुभ फळांचा प्रभाव कमी-जास्त प्रमाणात राहील.

मेष

सूर्याची दृष्टी समाप्त होणार. राशी स्वामी मंगळ अष्टमात व गुरूची नवम दृष्टी प्राप्त होत राहील. कामात गती व योजना यशस्वी होतील. धार्मिक कार्ये संपन्न होतील व धनाची आवक उत्तम राहील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. प्रतिष्ठा वाढेल.

 

नोकरी, व्यापार - व्यापारात लाभ, परदेश गमनाची संधी. ध्येय साध्य होईल.

शिक्षण - चांगले सादरीकरण व प्रकल्पांना यश. अध्ययन व्यापक व चांगले निकाल.

आरोग्य - रक्तदाब, तणाव, नसांची दुखणी उद्भवतील.

प्रेम - जुना सोबती भेटेल. प्रेमात अपयश. लग्नाचे प्रस्ताव येतील.

करण्याजोगे - महाकालीला ७ हिरव्या लिंबाची माळ चढवा.

मिथुन 

चंद्राची दृष्टी असल्याने आवक चांगली. कामात यश मिळेल. सप्ताहाच्या मध्यावर संकट येऊ शकते. गुरुवारी स्थिती सुधारेल. मोठ्या कटकटीतून मुक्तता मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीचा हिस्सा मिळेल व शेजाऱ्यांशी वाद संभवतो.

 

नोकरी, व्यापार - व्यापारातील अडचणी दूर होतील. सहकारी अनुकूल राहतील.

शिक्षण - मदत मिळेल. शिक्षक प्रसन्न राहतील. अभ्यासात मन लागेल.

आरोग्य - उजव्या पायाला जखम होण्याची शक्यता. छातीत वेदनेची शक्यता.

प्रेम - साथीचे समर्थन मिळेल, प्रेमात यश. वैवाहिक संबंधात सुधारणा.

करण्याजोगे - मारुतीसमोर तुपाचा दिवा लावा.

वृषभ

अष्टम चंद्रमा असल्याने आवक कमी होईल. मंगळवारपासून शनीसोबत सूर्य व बुधाची दृष्टी प्राप्त होईल. हा काळ चांगला असेल. उत्साह, आनंद नांदेल. कामात वाढ होईल. उत्सवात सहभागाचे योग आहेत. विवादांवर विजय मिळवाल. जमिनीचे लाभ संभवतात.

 

नोकरी, व्यापार - व्यापारात तेजी. नोकरीनिमित्त प्रवासयोग आहे.

शिक्षण - स्पर्धकांपेक्षा सरस राहाल. अभ्यासात एकाग्रता. निकाल चांगले येतील.

आरोग्य - डोकेदुखी वा डोळ्यांचे दुखणे संभवते. खांद्यात वेदनेची शक्यता.

प्रेम - साथी अनुकूल राहील. प्रेमात अपयश. वैवाहिक सुख मिळेल.

करण्याजोगे - दुर्गेला नारळ अर्पण करा.

कन्या

चतुर्थ चंद्र असल्याने आवक कमी राहील. मात्र, मंगळवारी सकाळी पुन्हा तेजी येण्याची शक्यता. अनुचित कार्यांकडे मन ढले जाईल. यापासून बचावण्याचा प्रयत्न करा. मित्रांची चेष्टा करणे टाळा. कोर्टकज्जे प्रलंबित राहतील. कुटुंबीयांच्या अतिरिक्त अपेक्षा राहणार.

 

नोकरी, व्यापार - गुंतवणूक टाळा. नोकरीत वरिष्ठ त्रास देण्याची शक्यता.

शिक्षण - मेहनत केल्यास चांगले परिणाम. नाहक आत्मविश्वास बाळगू नका.

आरोग्य - रक्तदाब, नसांचे आजार व खांद्याला जखमेची शक्यता आहे.

प्रेम - प्रेम प्रस्तावात अपयश. जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता.

करण्याजोगे - हनुमान चालिसा पठण करा.

कर्क

षष्ठम चंद्र आहे. इतर ग्रहांची साथ नाही. हा काळ सामान्य राहील. कार्ये सुरळीत सुरू राहतील. विघ्ने कमी होतील. धनाची आवक चांगली राहणार. शुक्रवारी व शनिवारी अडचणी संभवतात. या दिवशी वादांपासून दूर राहा.

 

नोकरी, व्यापार - कर्मचाऱ्यांकडून त्रास. नोकरीत वरिष्ठ खुश.

शिक्षण - संकटे येतील. मात्र, प्रयत्नपूर्वक मात करण्यात यश मिळेल.

आरोग्य - पोट व कमरेची दुखणी. दातांतही वेदनेची शक्यता.

प्रेम - सोबत्याशी विवाद समाप्त होणार. विवाह प्रस्ताव मिळतील.

करण्याजोगे - शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण करा.

सिंह

पंचमात चंद्र व गुरूमुळे रास बलशाली आहे. अपेक्षित यश न मिळाल्याने विचलित होण्याची शक्यता. योजना तयार कराल, मात्र अमलात आणण्याचे धाडस होणार नाही. सोबती शोधण्यास विलंब झाला आहे. स्वप्रयासाने यशप्राप्तीची शक्यता. आवक चांगली राहील.

नोकरी, व्यापार - करिअरमध्ये आलेख उंचावेल. कामात यशप्राप्तीचा योग.

शिक्षण - स्वानुभव व संपादित ज्ञान कामी येईल. स्पर्धकांपेक्षा सरस राहणार.

आरोग्य - कमरेचे दुखणे संभवते. तणाव वाढेल.

प्रेम - प्रेमापेक्षा करिअरला महत्त्व द्याल. वैवाहिक सुखप्राप्ती.

करण्याजोगे - मंगळवारी सुंदरकांड पठण करावे

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin