Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

राशी


सूर्य रेषा असणाऱ्या व्यक्तीसाठी


Main News

व्यक्तीला सन्मानासोबत पैसा मिळतो की नाही हे हातावरील सूर्य रेषा सांगते. सूर्य रेषा अनामिका फिंगरच्या एकदम खालच्या म्हणजेच सूर्य पर्वतावर असते. सूर्य पर्वतावर जी उभी रेषा असते तिला सूर्य रेषा म्हटले जाते. जर एखाद्या व्यक्तिच्या हातावर ही रेषा दोष रहित असेल तर त्या व्यक्तीला घरा-कुटूंबात, समाजात मान-सन्मानासोबत पैसा देखील मिळतो. ही रेषा सर्वांच्या हातावर नसते. येथे जाणुन घ्या सुर्य रेषासंबंधीत काही खास गोष्टी...

सूर्य रेषा सूर्य पर्वतापासुन हाताच्या खालचा भाग मणिबंध किंवा जीवन रेषेकडे जाते. सूर्य रेषा जर दूस-या रेषांपासुन तुटलेली असेल तर याचा शुभ प्रभाव नष्ट होऊ शकतो.

- हाताच्या तळव्यावर भाग्य रेषा पासुन सूर्य रेषा अनामिका बोटाकडे जात असेल तर ही शुभ स्थिती मानली जाते. याच्या प्रभावामुळे व्यक्ति खुप नाव आणि पैसा कमावतो.
- जर एखाद्या व्यक्तिच्या हातामध्ये मणिबंधपासुन अनामिका बोटापर्यंत सूर्य रेखा असेल तर खुप शुभ मानले जाते. अशे लोक जीवना थुप यशस्वी होतात आणि खुप पैसे कमावतात.

जर एखादया व्यक्तिच्या हातावर सूर्य रेषा जीवनरेषेपासुन अनामिका बोटापर्यंत जात असेल तर ही रेषा व्यक्तीला भाग्यशाली बनवते. अशे लोक जीवनात सुख-सुविधासोबतच मान-सन्मान प्राप्त करतात.

सूर्य रेषा चंद्र पर्वतापासुन निघायला हवी
जर एखाद्या व्यक्तिच्या हातावर चंद्र पर्वतातुन एखादी रेषा निघुन सूर्य पर्वतापर्यंत जात असेल तर ती देखील सूर्य रेखाच असते. हाताच्या अंगठ्याच्या दूस-या बाजूच्या शेवटच्या भागाला चंद्र पर्वत म्हणतात. येथुन रेषा निघून अनामिका बोटापर्यंत जात असेल तर व्यक्तिची कल्पना शक्ती खुप चतुर असते. या लोकांची भाषेवर पकड असते.

सूर्य रेषेवर बिंदु असेल तर...
सूर्य रेषेवर बिंदु असेल तर हा अशुभ संकेत असतो. अशी रेषा असलेल्या व्यक्तिचे नाव खराब होण्याची भीती असते. जर बिंदु एकापेक्षा जास्त असतील तर समाजात अपमानित होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे अशा रेषा असलेल्या व्यक्तिला सावधगिरीने काम करणे आवश्यक असते.

सूर्य रेषा लहरदार असेल तर
जर एखादया व्यक्तिच्या हातावर सूर्य रेषा लहरदार असेल तर तो व्यक्ति कोणतेच काम एकाग्रतेने करु शकत नाही. जर ही रेषा मध्येच लहरदार आणि सूर्य पर्वतावर सरळ किंवा सुंदर होत असेल तर व्यक्ति एखाद्या विशेष कार्यात यश मिळवतो.

सूर्य रेषावर क्रॉस असेल तर
जर सुर्य रेषांवर क्रॉस असेल तर व्यक्तिला जीवनात अनेक दुखांचा सामना करावा लागतो. असे लोक अडचणींमध्ये काम पुर्ण करतात. परंतु त्यांना उचित लाभ मिळत नाही.
 
जेव्हा सूर्य रेषांसोबत दुस-या रेषा असतील तर...
जर एखाद्या व्यक्तिच्या हातावर सूर्य रेषांसोबतच एकापेक्षा अधिक उभ्या रेषा दिसत असतील तर हे सूर्य रेषेच्या शुभ प्रभावांना वाढवते. अशा प्रकारच्या रेषांमुळे व्यक्ति समाजात प्रसिध्द होतो आणि धन प्राप्त करतो.

लांब सूर्य रेषा असेल तर जास्त लाभ
हातावर सूर्य रेषा जेवढी लांब आणि स्पष्ट असते, तेवढीच अधिक लाभ देते आणि तो व्यक्ती बुध्दिमान असतो. अशा व्यक्ति घर-कुटूंबासोबतच समाजात देखील एक खास स्थान मिळवतो.

हातावर सूर्य रेषा नसेल तर
 जर एखाद्या व्यक्तिच्या हातावर सूर्य रेषा नसेल तर याचा अर्थ असा होत नाही की, त्या व्यक्तीच्या जीवनात यश नाही. काही लोकांच्या हातावर सूर्य रेषा नसते. ही रेषा जीवनात व्यक्तिच्या यशाला सोपे बनवते. सूर्य रेषा नसल्यावर व्यक्तिला परिश्रम जास्त करावे लागते. परंतु व्यक्ति यशस्वी देखील होऊ शकतो. हातावर सूर्य रेषा नसतील आणि अन्य रेषांचा प्रभाव शुभ असेल तर व्यक्ति जीवनात उल्लेखनीय कार्य करु शकतो.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin