Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


‘सुर्यदत्त’च्या चित्रपट महोत्सवात ‘बळीराजा’ आणि 'कोष’ ठरले उत्कृष्ट


Main News

पुणे, दि. २२ (पीसीबी) – सुर्यदत्ता महाविद्यालयाच्या व्यवस्थापन, संशोधन, माहिती आणि तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित चित्रपट महोत्सवात अनिमेशन विभागात अक्षय काकडे यास उत्कृष्ट दिग्ददर्शनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नॉन फिक्शन विभागात भावेश पाटील यांच्या ‘बळीराजा’ चित्रपटास, तर फिक्शन विभागात सुनील वंजारी यांच्या ‘कोष’ या चित्रपटास उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.


फिक्शन, नॉन फिक्शन आणि अनिमेशन अशा प्रमुख तीन वर्गवारीत घेण्यात आलेल्या स्पर्धेत १५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यावेळी सूर्यदत्ता ग्रूप ऑफ इन्स्टिटयूटचे संजय चोरडिया उपस्थित होते. वैभव ठाकरे, डॉ चिन्मय खराडे आणि अवधूत नवले यांनी स्पर्धेचे परिक्षण केले. 

 “उत्कृष्ट कलाकृती सादर करण्यासाठी कल्पकता, सृजनशीलता आणि नाविण्यता असणे अत्यावश्यक असते. सध्याच्या पिढीत ही ताकद आहे परंतु, त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध होणे गरजेचे आहे. चित्रपट महोत्सवाचे आयोजन करून सुर्यदत्ता इन्स्टिट्यूटने एक वेगळा आदर्श प्रस्थापित केला, असल्याचे गौरवोद्गार चिल्ड्रन फिल्म सोसायटी, भारत आणि सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टीफिकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण कुमार यांनी काढले.
">

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin