Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


भाई वैद्य यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर


Main News

पुणे, दि. २२ (पीसीबी) –  ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांना पुण्यभूषण फाऊंडेशन, त्रिदल संस्था आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ यंदा जाहीर झाला आहे. ही माहिती पुण्यभूषण फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी पत्रकाद्वारे  दिली आहे.

एक लाख रूपये रोख आणि बालशिवाजींची पुण्याची भूमी सोन्याच्या फाळाने नांगरत असलेली प्रतिमा, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार भाई वैद्य यांना सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी देण्यात येत आहे. मे महिन्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्काराबरोबर सहा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांनाही गौरविण्यात येणार आहे. यामध्ये शंकर बुरुंगले, बाबूराव पाटील (किवळकर), यशवंत नामजोशी, बाळासाहेब जांभुळकर, अरविंद मनोलकर, दत्ता गांधी यांचा समावेश आहे. 

‘पुण्यभूषण पुरस्कार’ यापूर्वी भीमसेन जोशी, पु. ल. देशपांडे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, योगाचार्य बी. के. अय्यंगार, डॉ. मोहन धारिया, डॉ. जब्बार पटेल, डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्यासह अनेक मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकात देण्यात आली आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin