Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


फर्ग्युसन महाविद्यालयात कन्हैयाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी


Main News

पुणे, दि. २२ (पीसीबी) – दिल्लीतील ‘जेएनयू’तील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारच्या समर्थनार्थ आज  फर्ग्युसन महाविद्यालयात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

‘जेएनयू’तील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष अलोक सिंगचा याचा आज (मंगळवार) फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये कार्यक्रम होता. या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी कन्हैय्याच्या समर्थनात घोषणाबाजी केली. यावेळी 'अभाविप'च्या कार्यकर्त्यांनीही घोषणा देत प्रत्युत्तर दिले. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरू असल्यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करीत दोन्ही बाजूच्या विद्यार्थ्यांना शांत केले. सध्या महाविद्यालयाच्या आवारात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीन निरीक्षक प्रवीण चौगुले पुढील तपास करीत आहेत. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin