Breaking News
 • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
 • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
 • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
 • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
 • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
 • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


नीरा नदीच्या पात्रात दुधाचा कंटेनर पडल्याची शक्यता; शोध सुरू


Main News

पुणे, दि. ११ (पीसीबी) - पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीवरील नीरा नदीच्या पात्रात दुधाचा कंटेनर पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शिवापूर टोलनाका पार केल्यानंतर कंटेनरचा थांगपत्ता लागत नसल्यामुळे सर्वत्र शोध सुरु आहे.

सातारमधील शेळके ट्रान्सपोर्टचा कंटेनर नऊ जानेवारीला पुण्याहुन सातारच्या दिशेने निघाला होता. या कंटेनरने पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोलनाका पार केल्याचे टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. परंतु त्यानंतर या कंटेनरचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.

त्याचबरोबर कंटेनरचा ड्रायव्हर आणि क्लीनर यांचेही मोबाईल फोन तेव्हापासून बंद आहेत. कंटेनरला जीपीएस  यंत्रणा होती, नीरा नदीवर असलेल्या पुलाचा कठडा तुटलेला आढळल्याने कंटेनर नदीच्या पात्रात पडला असावा, अशी भीती व्यक्त होत आहे.

अडीच वर्षांपूर्वी याच ठिकाणी एक कार नदीत पडून दोन जणांचा मृत्यू झाला होता. चुकीचे वळण, जुने झालेले कठडे आणि नव्या आणि जुन्या पुलाच्या मध्ये असलेले अंतर यामुळे हा भाग वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin