Breaking News
 • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
 • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
 • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
 • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
 • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
 • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


जेएसपीएमच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन व तांत्रिक मेळावा संपन्न


Main News

पुणे, दि.११ (पीसीबी) – आजच्या शैक्षणिक पिढीतून उद्याचे शास्त्रज्ञ मिळावेत म्हणून जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ, यांच्या वतीने राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरींग व पॉलिटेक्नीकमध्ये दोन दिवशीय राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन व तांत्रिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व्यंकटराव भताने यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यंकटराव भताने म्हणाले, की कृतीतून ज्ञान मिळाले तर ते विसरले जात नाही जे विज्ञानाचे प्रयोग करण्यासाठी वापरले जाते. ज्याच्यातून विद्यार्थी अनुभवातुन शिकतो म्हणून विद्यार्थांच्या  चिकित्सक वृत्तीमध्ये वाढ होते. हे घडवून आणण्यासाठी अशा प्रदर्शनाची आवश्यकता आहे. प्रा.ए.के.भोसले म्हणाले, की विद्यार्थांच्या अंगभूत कौशल्याचा विकास करण्यासाठी सखोल मार्गदर्शनाची आवश्यकता असते. प्रयोगातून विद्यार्थी कृती करतात. त्यामुळे विद्यार्थांच्या कौशल्याचा विकास होऊन जीवन जगण्यासाठी मदत होते.
 
यावेळी टिएसएसएमचे सचिव गिरिराज सावंत, संचालक डॉ.पी.पी.विटकर, जेएसपीएमचे संचालक प्रा.ए.के.भोसले. प्रा.डॉ.आर.के.जैन,संचालक प्रा.एस.एल.भिलारे, व्यवस्थापक रवी सावंत, उपप्राचार्य ए.एस,देवस्थळी ,प्रा.ए.एन.दुबे, मुख्यध्यापिका मिश्रा मॅडम, विभागप्रमुख प्रा.एस.पी.माहामुनी आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रदर्शनात महाराष्ट्रातील ७० शाळेतून १०५ प्रकल्प सहभागी झाले आहेत. हे बघण्यासाठी मावळ व पिंपरी चिंचवड परिसरातील तीन हजार विद्यार्थी दोन दिवसात भेट देण्यासाठी येणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर जाधव यांनी केले तर आभार प्रा.ए.एन दुबे यांनी मानले.  

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin