Breaking News
 • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
 • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
 • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
 • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
 • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
 • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


कुत्र्याच्या विरहातून विद्यार्थ्याची आत्महत्या


Main News

हडपसर, दि.११ (पीसीबी) – लाडका कुत्रा मरण पावल्याच्या विरहातून सिम्बायोसिसमध्ये एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थाने सहाव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी घडला. विद्यार्थाने आत्महत्येपूर्वी लिहलेली चिठ्ठी पोलिसांना आढळली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

कंवर हर्षवर्धन राघव (वय २२) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थाचे नाव आहे. तो मुळचा छत्तीसगडचा असून सध्या सिम्बायोसिस हॉस्टेल, खडकी येथे शिक्षणासाठी राहत होता.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कंवर एमबीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. त्याचे वडील लष्करात कर्नल आहेत. हडपसरच्या गोंधळेनगर येथे कंवरच्या वडिलांचे मित्र कर्नल ठाकूर राहतात. पुण्यामध्ये दुसरे कोणी जवळचे नातेवाईक नसल्यामुळे सुट्टीत कंवर ठाकूर यांच्याकडे येत असे. रविवारी सायंकाळी तो नेहमीप्रमाणे ठाकूर यांच्याकडे आला होता. त्याने ठाकूर यांच्या घरी मुक्कामही केला. मात्र सोमवारी त्याने सहाव्या मजल्यावरुन उडी मारल्याचे आढळून आले. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला.

तपासणी दरम्यान पोलिसांना कंवरच्या वहीत चिठ्ठी सापडली. त्यामध्ये मी बॉस्कीचा (कुत्र्याचा )विरह सहन करु शकत नाही. मी त्याच्याकडे जात आहे. माझ्या मृत्युला कोणालाही जबाबदार धरु नये. आई-वडीलांनी मला माफ करावे, असा मजकूर चिठ्ठीत लिहिलेला आहे. कंवरच्या बॉस्की  नामक कुत्र्याचा सहा महिन्यांपूर्वी मृत्यु झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणी हडपसर पोलिस तपास करत आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin