Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


हडपसरमध्ये कुत्र्याचा मृत्यू झाल्याने तरूणाची आत्महत्या


Main News

पुणे, दि. ११(पीसीबी) - कुत्र्याचा मृत्यू झाल्याच्या नैराश्यातून सहाव्या मजल्यावरून  उडी घेऊन एका तरूणाने आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना हडपसर येथे घडली आहे.   कुत्र्याच्या मुत्युमुळे शोकाकुल झालेल्या या तरूणाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  

हर्षवर्धनसिंग राघव असे त्या २२ वर्षीय तरूणाचे नाव असून तो खडकी येथील रहिवासी होता. सिम्बॉयसिस महाविद्यालयात शिकणाऱ्या हर्षवर्धनसिंगने काल रात्रीच्या सुमारास आत्महत्या केली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.  आपल्या लाडक्या कुत्र्याचा मृत्यू झाल्यामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचे' त्याने सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. 

हर्षवर्धनसिंग मुळचा छत्तीसगडचा राहणारा होता. मागील दोन वर्षांपासून तो शिक्षणासाठी पुण्यात सिम्बॉयसिस कॉलेजच्या हॉस्टेलमधे राहत होता. शनिवार आणि रविवार या दोन सुट्टीच्या दिवशी हडपसरला नातेवाईकांच्या फ्लॅटमध्ये रहायला जायचा. पुण्यात राहत असला तरी हर्षवर्धनसिंगला त्याच्या छत्तीसगडमधील घरातील कुत्रा, बोस्कीचा खूप लळा होता.  मात्र, काही दिवसांपूर्वी बोस्कीचा मृत्यू झाला, त्यामुळे हर्षवर्धनसिंग निराश होता. 

 हर्षवर्धनसिंगने नातेवाईकांच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमधून उडी मारुन आत्महत्या केली. ‘मी माझ्या बोस्कीकडे जात आहे. त्याबद्दल कोणाला दोष देऊ नये’, असे त्याने  सुसाईड नोटमध्ये नमूद केले. हडपसर पोलिस ठाण्यात हर्षवर्धनच्या आत्महत्येची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin