Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


पुण्यात नायजेरीयन नागरीकाला अमली पदार्थांसह अटक


Main News

पुणे, दि. १० (पीसीबी) – पुण्यात अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या नायजेरीयन नागरीकाकडून पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अमली पदार्थ व गाडी मिळून एकूण पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी कॅम्प परिसरातील एसजीएस मॉलसमोर सोमवारी (दि. ९) रात्री आठ वाजता सापळा रचून ही कारवाई केली. 

मायकल औकेये क्लेम (वय२८) असे अटक करण्यात आलेल्या नायजेरियन आरोपीचे नाव आहे. तो सध्या मुंबईत राहतो.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक नायजेरीयन पुण्यात रात्री उशीरा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी  येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मायकल क्लेम यास कॅम्प परिसरातील एसजीएस मॉलसमोर अटक केली. त्याच्याजवळ सव्वा लाख किमतीचे २५ ग्रॅम मेफेड्रोन व एक लाख दहा हजार रुपये किमतीचे ११ ग्रॅम कोकेन अमली पदार्थ सापडले. तसेच त्याच्याजवळील मारूती सुझूकी ( एमएच १४, बीव्ही २५५४) ही गाडी ताब्यात घेण्यात आली. पोलिसांनी एकूण २ लाख ७५ हजार ७१० रुपये किमतीचा माल जप्त केला आहे.

ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रमुख वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिमा जोशी, पोलिस निरीक्षक स्वाती थोरात, सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, पोलिस कर्मचारी राकेश गुजर, ज्ञानदेव घनवट, राजेंद्र बारशिंगे, रामचंद्र यादव, अमित छडीदार, स्नेहल जाधव यांच्या पथकाने केली.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin