Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


चेंबरमध्ये पडून मृत्यू पावलेल्या गणेश चांदणेच्या कुटुंबीयांना तीन लाख रूपये


Main News

पुणे, दि. १० (पीसीबी) -  गेल्या आठवड्यात अंबिल ओढ्याजवळील चेंबरमध्ये पडून वाहून गेलेल्या गणेश किशोर चांदणे या १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या मुलाच्या कुटुंबीयांना महापालिका प्रशासनाच्या वतीने तीन लाख रुपये भरपाई देण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी दिली. पुणे महापालिकेच्या आज, मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत त्यांनी हे आदेश दिले.

पुणे येथे गेल्या आठवड्यात अंबिल ओढ्यात बॉल काढताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढून गणेश किशोर चांदणे हा तेथील चेंबरमध्ये पडला होता. त्याचा मृतदेह कसबा पंपिंग स्टेशनमध्ये सापडला होता. या घटनेला महापालिका प्रशासन जबाबदार असून, त्याच्या कुटुंबीयाना आर्थिक मदत केली जावी, संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी केली होती. त्यावर महापौर प्रशांत जगताप यानी महापालिकेच्या वतीने मृत मुलाच्या कुटुंबीयांना तीन लाख रुपये देण्यात येणार असल्याचे सर्वसाधारण सभेत जाहीर केले.

अंबिल ओढा घटनेचा तपास त्रिस्तरीय समितीमार्फत करण्यात येणार असून, त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधितावर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले. अंबिल ओढा घटनास्थळाला महापालिका आयुक्तांसमवेत भेट देण्यात येणार आहे. तसेच गणेश चांदणे याच्या कुटुंबीयांना मदत केली जाणार आहे, असे महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin