Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


नवे चित्रपट मनाला भिडणारे- डॉ. जब्बार पटेल


Main News

पुणे, दि. १० (पीसीबी) - जुने चित्रपट कृष्णधवल चित्रफितीद्वारे दाखवले जात. तरीदेखील त्यातील बारकावे प्रेक्षकांच्या मनाला सहजगत्या भिडायचे. चित्रीकरणासाठी प्रगतीशील असतानाही निर्मिलेल्या या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण केले. सध्या आधुनिक तंत्रज्ञान, कॅमेऱ्यांचे विविध प्रकार, लेन्सद्वारे चित्रीत केलेले चित्रपट मनाला भिडत नाहीत, अशी खंत ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केली.  

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यम व संज्ञापन अभ्यास विभागातर्फे ‘सिनेमा अ कॅलिडोस्कोपिक व्ह्यु’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवादात डॉ. पटेल बोलत होते. ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. मोहन आगाशे, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दीपक टिळक, डॉ. गीताली टिळक-मोने, प्रभारी कुलसचिव डॉ. अभिजित जोशी यावेळी उपस्थित होते. मराठा रीसर्च जर्नलच्या ‘सिनेमा अ कॅलिडोस्कोपिक  व्ह्यु’ या शोधनिबंधाचे प्रकाशन या वेळी करण्यात आले.

पटेल म्हणाले, समाजात बदल घडविण्याची ताकद असलेला स्त्रोत म्हणून चित्रपट माध्यमाकडे पाहिले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात चित्रिकरणाची साधने सहजतेने वापरणे शक्य असले तरी, पूर्वीच्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. चित्रपटासाठी दिग्दर्शकाला संपूर्ण तांत्रिक गोष्टींचे ज्ञान असणे गरजेचे आहे. कमीत कमी संवाद, आणि मुद्राभिनयाव्दारे प्रेक्षकांना चटकन उमगते. आगाशे म्हणाले,  माध्यमांमध्ये टिकण्यासाठी भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे. चित्रपटातील एखादी व्यक्तिरेखा साकारताना अतिशयोक्तीपणाऐवजी नैसर्गिक अभिनयाची कास धरली पाहिजे.”  

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin