Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह कसबा पंपिंग स्टेशनमध्ये सापडला


Main News

पुणे, दि. ८ (पीसीबी) -  सदाशिव पेठ परिसरातील झोपडपट्टीत शनिवारी सांडपाणी वाहून नेणाऱ्या चेंबरमध्ये पडून वाहून गेलेल्या दहा वर्षीय मुलाचा मृतदेह कसबा पंपिंग स्टेशनमध्ये सापडला आहे. अंबिल ओढा झोपडपट्टी परिसरातील एका सांडपाणी वाहून जाणाऱ्या चेंबरमध्ये गणेश किशोर चांदणे हा मुलगा खेळता असताना पडला होता. 

याठिकाणी असणाऱ्या नाल्याच्या भिंतीला भगदाड पडले होते. तेथून या मुलाला नाल्यातून वाहत जाणारा चेंडू दिसला. चेंडू बाहेर काढण्यासाठी मुलाने नाल्याच्या काठावर उभे राहून त्याठिकाणी असणाऱ्या बांबूच्या सहाय्याने चेंडू बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. नेमक्या याचवेळी नाल्यातील पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. पाण्याच्या लोंढ्यामुळे बांबू काहीसा हालला आणि त्यामुळे मुलाचाही तोल जाऊन तो नाल्यात पडला. त्यानंतर तो मुलगा पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला आणि तीन ते चार फुट अंतरावर असणाऱ्या चेंबरमध्ये फेकला गेला.

दरम्यान या मुलाचा शोध पालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी शनिवारी दिवसभर घेतला. मात्र त्याचा काही ठावठिकाणी  लागला नाही. आज सकाळी शोधकार्य सुरू केले असता कसबा पंपिंग स्टेशन येथे त्या मुलाचा मृतदेह आढळून आला.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin