Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


...आता हेल्मेट न घालणाऱ्या पोलिसांवर होणार कारवाई


Main News

पुणे, दि.७ (पीसीबी) - हेल्मेट न घालता दबंगिरी करणाऱ्या पोलिसांवर आता संक्रात येणार आहे. हेल्मेट न घालणारे पोलिस पकडले गेले, तर ही नोंद थेट सेवा पुस्तकात (सर्व्हिस रेकॉर्ड) केली जाणार आहे. पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी याबाबतचे आदेश दिले असून त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.

हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी ही पोलिसांपासून सुरु करण्यात आली आहे. यापूर्वीही वारंवार आदेश देत पोलिसांना हेल्मेट सक्ती करण्यात आली होती. मात्र, पहिल्यांदाच नियम मोडल्याप्रकरणी त्याची नोंद सेवा पुस्तकात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशामुळे पोलिसांना धडकीच भरली आहे. वाहतूक पोलिसांकडून दुचाकीस्वारांना हेल्मेट घालावे यासाठी वेगवेगळे प्रयत्न करण्यात येते आहे, त्याची पहिली पायरी म्हणून पोलिसांसाठी हेल्मेट सक्तीचे आदेश काढण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या आदेशांना अनेकदा पोलिस कर्मचाऱ्याकडून केराची टोपली दाखवली जाते. त्यामुळे कारवाईचा हा नवीन बडगा उगारण्यात आला आहे.  

आयुक्तालयाच्या गेटवर दुचाकी घेऊन येणाऱ्या दुचाकीस्वरांच्या डोक्यात हेल्मेट नसेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात येणार आहे. हेल्मेट सक्तीचा पहिला टप्पा हा पोलिसांपासून सुरु करण्यात आला आहे. पोलिसांना हेल्मेटचे वाटप करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान हेल्मेट न घालणाऱ्या पोलिसांच्या पुस्तकात शिस्तभंग केल्याप्रकरणी नोंद केली जाईल. या नोंदीमुळे संबंधित पोलिसांना सरकारी सेवेतील फायदे मिळण्यास अडचणी येऊ शकतात. त्याची बढती, त्यांना मिळणारे विविध पुरस्कार यालाही या नोंदीचा फटका बसू शकतो, असे उच्चपदस्थ सुत्रांनी सागितले.    

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin