Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


सदाशिव पेठेतील सांडपाण्याच्या चेंबरमधून मुलगा वाहून गेला


Main News

पुणे, दि. ७ (पीसीबी) - सदाशिव पेठ येथील अंबिल ओढा झोपडपट्टीच्या परिसरातील एका  सांडपाणी वाहून नेणाऱ्या चेंबरमधून एक दहा वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना आज (शनिवारी) घडली आहे.  गणेश किशोर चांदणे असे या मुलाचे नाव आहे. हा मुलगा त्याचा हरवलेला चेंडू शोधत असताना अचानकपणे चेंबरमध्ये पडला आणि वाहून गेला.  अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. 

मिळालेल्या माहितीनुसार या चेंबरला एका ठिकाणी खड्डा पडला होता. याच खड्ड्यामधून हा मुलगा चेंबरमध्ये पडला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पालिकेचे अधिकारी याठिकाणी दाखल झाले. त्यांनी शोधकार्य सुरू केले आहे. काही कर्मचारी झोपडपट्टीलगतच्या नाल्यात मुलाचा शोध घेत आहेत. या नाल्यातील सांडपाणी मुळा आणि मुठा नदीत सोडले जाते. याठिकाणीही काही अधिकारी मुलाचा कसून शोध घेत आहेत. 

अंबिल ओढा झोपडपट्टी ही सदाशिव पेठेत आहे. या ओढ्याजवळ पुरग्रस्त चाळ, महापालिका सेवकांची चाळ आहे. त्याचबरोबर दांडेकर पूल झोपडपट्टी आहे. त्यामुळे या परिसरात अनेक मुले येथे खेळत असतात. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin