Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


राम गणेश गडकरींचा पुतळा हटविणाऱ्यास ५ लाखांचे बक्षीस – नितेश राणे


Main News

पुणे, दि. ७ (पीसीबी) - पुण्यातील राम गणेश गडकरींचा पुतळा हटविल्यामुळे सुरु झालेला वाद शमण्याची चिन्हे नाहीत. आता काँग्रेस आमदार नितेश राणे यांचा वर्षभरापूर्वीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नितेश राणे यांनी राम गणेश गडकरींचा पुतळा हटवणाऱ्यास ५ लाख रुपये रोख देऊन जंगी सत्कार करु अशी वादग्रस्त घोषणा करताना दिसत आहेत. त्यामुळे गडकरींचा पुतळा हटवण्यामागे नितेश राणेंची चिथावणी होती की काय अशा चर्चांना उधाण आले आहे.

नितेश राणे यांचे जानेवारी २०१६ मध्ये पुणे जिल्ह्यातील तुळापूर येथे भाषण झाले होते. शिवपूत्र शंभूराजे राज्याभिषेक ट्रस्टतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोशल मीडियावर या कार्यक्रमात नितेश राणे यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या भाषणात नितेश राणे यांनी वसंत कानेटकर, राम गणेश गडकरी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले. संभाजी महाराजांचा चुकीचा इतिहास राम गणेश गडकरी यांनी लिहीला. पण त्याविरोधात काही न बोलता आपण संभाजी उद्यानात त्यांचा पुतळा उभारला. आता आमचे मराठे कुठे गेले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

वसंत कानेटकर आणि राम गणेश गडकरी यांनी चुकीचा इतिहास दाखवला. आपण त्यांच्या नावाने पुतळे उभारले, सभागृहांना त्यांचे नाव दिले. पण या लोकांना त्यांची जागा दाखवणारा खरा मराठा असल्याचे चिथावणीखोर विधान त्यांनी केले. संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरींचा पुतळा हटवणाऱ्यास पाच लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन जाहीर सत्कार करु अशी वादग्रस्त घोषणाच त्यांनी या कार्यक्रमात केली. नितेश राणे यांच्या भाषणाचा व्हिडीओ एक वर्षापूर्वीचा आहे. त्यामुळे या भाषणाचा थेट घटनेशी संबंध जोडता येणार नाही असे सांगितले जाते.  या भाषणाच्या एक वर्षानंतर संभाजी गार्डनमधील पुतळा हटवण्यात आला. पण आता राणे यांच्या या चिथावणीखोर भाषणामुळे गडकरींचा पुतळा हटवला गेला की काय यावरही चर्चा रंगली आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin