Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


पालकांना ‘व्हॉट्सअॅप’वर गृहपाठ समजणार


Main News

पुणे , दि. ६ (पीसीबी) –  पेरुगेट येथील मुलांच्या भावे हायस्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेने डिजिटल होमवर्क ही नावीन्यपूर्ण संकल्पना आणली आहे. शिक्षकांनी दिलेल्या गृहपाठाची माहिती पालकांना व्हावी आणि विद्यार्थांनी नियमित गृहपाठ करावा यासाठी शाळेने स्मार्टफोन व व्हॉट्सअॅपचा प्रभावी वापर केला आहे. त्या अंतर्गत शाळेतील सुमारे अठराशे विद्यार्थांचा वर्गांनुसार त्यांच्या पालकांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे.

डिजिटल होमवर्कच्या माध्यमातून ग्रुपमध्ये आठवड्याचे गृहपाठ दिवसानुसार टाकण्यात येणार आहेत. त्यामध्ये सोमवारी, मंगळवारी भाषा विषयाचे, बुधवारी, गुरुवारी  इतिहास आणि भूगोलचा गृहपाठ देण्यात येणार आहे. शुक्रवारी आणि शनिवारी विद्यार्थांना तुलनेने अवघड वाटणाऱ्या गणित आणि विज्ञान या विषयांचे गृहपाठ टाकण्यात येणार आहेत, असे प्राचार्य के. एन. अर्नाळे यांनी सांगितले.

डिजिटल होमवर्क संकल्पना राबविण्यासाठी इयत्ता पाचवी ते अकरावीच्या विद्यार्थांच्या पालकांचे वर्गांनुसार सुमारे ३५ ग्रुप तयार केले आहेत. यात सुमारे अठराशे विद्यार्थांच्या पालकांना विद्यार्थांला काय गृहपाठ दिला आहे, याची माहिती होईल. शाळेत दिल्या जाणाऱ्या गृहपाठाची माहिती विद्यार्थी त्यांच्या पालकांना देत नाहीत. त्यामुळे पालकसभेत पालक याबाबत शिक्षकांकडे तक्रारी करतात. ही बाब लक्षात घेऊन डिजिटल होमवर्क ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे अर्नाळे यांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin