Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


नाना पाटेकरची “नाना”विध रुपे पुस्तकातून उलगडणार


Main News

पुणे, दि. ६ (पीसीबी) - प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या जीवनाची विविध रुपे लवकरच पुस्तकरुपाने उलगडणार आहेत. बालपणीचे खडतर जीवन आणि त्यानंतर अभिनेता ते समाजसेवा, असा नाना पाटेकर यांचा झालेला जीवनप्रवास या पुस्तकातून वाचकांसमोर येईल. ‘तुमचा आमचा नाना’ या शीर्षकाचे हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार असल्याची माहिती नानांचे मित्रलेखक श्रीकांत गद्रे यांनी दिली. 

नाना कलाकार म्हणून कसे घडले, त्यांचा जीवनप्रवास कसा झाला आदी अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांना जवळून पाहणाऱ्या आणि त्यांच्या बालपणापासूनच्या मित्रांनी लिहिलेल्या लेखांमधून मिळणार आहेत. या सर्व मित्रांचा नानांशी स्नेह आहे. या लेखांचे संपादन आणि शब्दांकन गद्रे करणार असून पुस्तकाचे प्रकाशन ‘इंद्रायणी साहित्य’ ही संस्था करणार आहे. पुस्तकाचे प्रकाशन फेब्रुवारी महिन्यात नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

शालेय जीवनात अंगठे धरून शिक्षा भोगणारा, मुरूड सोडून महानगरात दाखल झालेला, क्रिकेटचे विलक्षण वेड असलेला, हौशी नाट्य संस्थेतून रंगभूमीवर दाखल झालेला, मोठा कलाकार असूनही शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणारा अशी नानांची विविध रूपे त्यांच्याच गोतावळ्यातील दिग्गजांच्या लेखणीतून पुस्तकात साकारली आहेत.

दोनशे चाळीस पानांच्या या पुस्तकात ना. धों. महानोर, रवी परांजपे, डॉ. रवी कसबेकर, रीमा लागू, मंगेश तेंडुलकर, एन. चंद्रा, विक्रम गोखले, डॉ. मोहन आगाशे, शुभांगी गोखले, मकरंद अनासपुरे, मीना कर्णिक, राहुल रानडे, सुधीर गाडगीळ, दिलीप प्रभावळकर, किशोरी आमोणकर, किरण यज्ञोपवित, सुनील गावसकर, भारती आचरेकर, डॉ. विकास आमटे आदींचे लेख असून नाना पाटेकर यांची दुर्मिळ छायाचित्रे, त्यांनी स्वत: काढलेली चित्रे यांचाही समावेश पुस्तकात आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin