Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


पुणे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार - रमेश बागवे


Main News

पुणे, दि. ५ (पीसीबी) - आगामी पुणे महापालिकेची निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. पुणे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसही स्वबळावर लढण्यास सज्ज आहे, असे पक्षाचे नेते अजित पवार यांनी सांगितले. विशेष म्हणजे पुणे महापालिकेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आहे.

महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असून त्या संदर्भाचा निर्णय पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण घेतील, अशी माहिती शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी आज गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

आघाडीचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून अद्यापपर्यंत आला नाही. कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहेत. तसेच दोन दिवसांमध्ये काँग्रेस पक्षाच्या माजी आमदारांची बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीमध्ये आघाडीसंदर्भात चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याचे त्यानी सांगितले.


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin