Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


गडकरींचा पुतळा हटविण्याचा बोलविता धनी शोधून काढल्याशिवाय राहणार नाही - मुख्यमंत्री


Main News

पुणे, दि. ५ (पीसीबी) -  संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा उखडण्याच्या प्रकाराचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. या घटनेमागील बोलविता धनी कोण आहे, हे शोधून काढल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिला. काही संकुचित विचारसरणीच्या आणि नादान लोकांकडूनच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना एका जाती-धर्मात अडकिवण्याचा प्रयत्न केला जात आहेत. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवरच जातीयवादी राजकारणाची खुमखुमी सुरू आहे. अशा लोकांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे, असेही आवाहन फडणवीस यांनी केले.

भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांचा संभाजी उद्यानातील पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उखडून टाकल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली होती. त्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले. या पाश्र्वभूमीवर वडगाव शेरी येथील महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत हा इशारा दिला.

उद्यानाला देण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा संदर्भ देत ते म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या आशीर्वादामुळेच आम्ही सत्तेत आलो. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच संभाजी महाराजही सर्वांच्या मनात आहेत. संभाजी महाराजांचे जीवन हे सगळ्यांना प्रेरणाच देते. दुर्दैवाने त्यांच्या नावाने काही संकुचित विचारसरणीचे लोक त्यांना ठरावीक जाती-पातीत अडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुमखुमी येऊन काही नादान लोकांनी निंदनीय प्रकारही केले. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या लोकांना कळालेच नाहीत. झालेल्या प्रकाराचा निषेध करावा तेवढा कमीच आहेत. मात्र या घटनेचा बोलविता धनी कोण आहे, हे आम्ही शोधल्याशिवाय राहणार नाही. सर्व प्रकारच्या विचारांचे राज्य असेल याबाबत आम्ही काळजी घेऊ.

‘महापालिकेत सत्ता मिळेल’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जंगली महाराज रस्त्यावरील पक्षाच्या हंगामी निवडणूक कार्यालयाला भेट दिली. या वेळी त्यांच्या उपस्थितीत काही कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. तत्पूर्वी निवडणूककार्यालयातील वॉर रूम, पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रंथालयांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि महापालिकेत सत्ता काबीज होईल, असा विश्वासही व्यक्त केला. पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले, खासदार अनिल शिरोळे आणि पक्षाचे आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin