Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


गडकरींचा पुतळा हटवून कतृत्व संपत नाही; साहित्य, कलावंतांच्या प्रतिक्रिया


Main News

पुणे, दि. ४ (पीसीबी) - राज्यातील सर्व साहित्यिक, कलावंतांचे पुतळे काढून टाका. त्यांचे साहित्य आम्ही वेगवेगळ्या कलाकृतीतून जिवंत ठेवू, अशा शब्दांत साहित्य, कलाक्षेत्रातून संताप व्यक्त करण्यात आला. नाटककार राम गणेश गडकरी हे मराठी भाषेचा डौल असून, पुतळा उखडल्याने त्यांचे वाङ्मयीन कर्तृत्व कमी होणार नाही, अशा भावना व्यक्त करून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

गडकरी यांचा पुतळा हटविल्याप्रकरणी महाराष्ट्र साहित्य परिषद, नाट्य परिषद पुणे शाखा, चित्रपट महामंडळ, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना यांच्या वतीने संभाजी उद्यानासमोर निदर्शने करण्यात आली. या वेळी नाटककार श्रीनिवास भणगे, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, नाटय परिषदेचे पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, डॉ. सतीश देसाई, मकरंद टिल्लू, रजनी भट, निकिता मोघे, दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे, प्रसाद ओक, योगेश सोमण, किरण यज्ञोपवित उपस्थित होते.

प्रा. जोशी म्हणाले, ‘लोकशाहीत सनदशीर मार्गाने भूमिका मांडणे शक्य असतानाही गुंडशाही वृत्तीचा अवलंब करणे योग्य नाही. गडकरींचा पुतळा उखडल्याने त्यांचे वाड्.मयीन कर्तृत्व कमी होणार नाही. अशा घटना लोकशाहीला मारक आहेत.’

गडकरींचा पुतळा महापालिकेने पुन्हा उभारू नये. गडकरी कोण होते; हे आम्ही जगाला त्यांच्या साहित्यातून दाखवून देऊ. गडकरींची पुस्तके खरेदी करून, रसिकांनी पुढील पिढीपर्यंत ते पोहचवावेत,’ असे आवाहन तरडे यांनी केले. 

कलाकार हे जातीपातीपलीकडे असतात. कलेच्या प्रकारात जात आड येणे हे कलाकार कदापि सहन करणार नाही, याकडे ओक यांनी लक्ष वेधले. ‘साहित्यिकांचे पुतळे काढून टाका; जेणेकरून पुन्हा कुठल्याही पुतळ्याची विटंबना होणार नाही. जातीय समीकरणे निर्माण केली जात आहेत,’ अशा शब्दांत यज्ञोपवित यांनी निषेध व्यक्त केला.

सोमण म्हणाले, ‘साहित्यिक, कलाकार यांचे सगळीकडचे पुतळे काढावेत. त्यांच्या कलाकृती अजरामर आहेत. हे घडल्यामुळे पुढच्या पिढीला राम गणेश गडकरी कोण होते हे कळेल. त्यामुळे ज्यांनी हे कृत्य केले त्यांचे अभिनंदन करून निषेध व्यक्त करतो.’

साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “इतिहास विवेकाने लिहायचा, वाचायचा आणि मूल्यमापन करायचे असते. इतिहासात चूक अथवा विकृती आढळल्यास त्याचा विवेकाने प्रतिवाद करता येतो. पुतळा फोडून गडकरींचा प्रतिवाद करणे ही कृती योग्य नाही. ब्राह्मण, ब्राह्मणेतर वादातून महाराष्ट्राला वाचवण्याचे काम विठ्ठल रामजी शिंदे आणि यशवंतराव चव्हाण यांनी केले. तसे, वर्तमान महाराष्ट्रात कोणी करताना दिसत नाही. सध्याची परिस्थिती महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक आहे.”

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin