Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


गडकरी यांचा पुतळा हटवणाऱ्या चार संशयित तरुणांना अटक


Main News

पुणे, दि. ३ (पीसीबी) - पुण्याच्या संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवणाऱ्या चार संशयित तरुणांना पोलिसांनी अटक केली. हर्षवर्धन मगदूम, प्रदीप कणसे, स्वनिल काळे, गणेश कारले अशी अटक केलेल्या तरूणांची  नावे आहेत. हे सर्वजण संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहे.

काल मध्यरात्री ४ तरुण पुतळा हटवतानाची दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली होती. यात हे तरूण स्पष्टपणे दिसून येत आहेत. आधीच संभाजी ब्रिगेडने या कृत्याची जबाबदारी स्वीकारली होती. याआधारे या तरूणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुण्याच्या संभाजी उद्यानातील पुतळा हटवण्यात आला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा हटवला आहे. मात्र गडकरींचा पुतळा हटवण्यात संभाजी ब्रिगेडचा काहीही संबंध नसल्याचा दावा काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

‘राजसंन्यास’ या नाटकातून राम गणेश गडकरींनी  छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. यातील मजकूर खटकल्याने संभाजी ब्रिगेडच्या १० ते १५ कार्यकर्त्यांनी रात्री अडीचच्या सुमारास पुतळा हटवला आणि मुठा नदीत पुतळा फेकून दिला होता. 

दरम्यान चार कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहे आणि त्याआधारेच आता पोलिस तपास करत आहेत. पण पुतळ्याचा शोध अद्याप लागलेला नाही.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin