Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


मोबाईलचे बनावट स्पेअर पार्ट विकणाऱ्या दुकानावर छापा; दोघांना अटक


Main News

पुणे, दि.३ (पीसीबी) - मायक्रोमॅक्स मोबाईल कंपनीच्या बनावट बॅटऱ्या, फ्लिप कव्हर, प्लॅस्टीक कव्हर, हेडफोन, प्लॅस्टीक बॉडी विकणाऱ्या दुकानावर छापा टाकून १३ लाख २१ हजार ९६४ रुपये किमतीचा बनावट माल जप्त करण्यात आला. ही कारवाई वसंत टॉकीज समोरील मोबाईल दुकानात शनिवारी (दि. ३१) संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.   

रमेश प्रतापजी पटेल (वय २२ रा,मंदा सोसायटी, प्लॉट क्रं.५, तिसरा मजला धनकवडी)  सावळाराम जेपारामजी चौधरी (वय २४ रा,अमीट कोर्ट सोसायटी, प्लॉट क्रं.१ शुक्रवार पेठ, पुणे) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी मंगेश जगन्नाथ देशमुख यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, वसंत टॉकीज समोरील तपकिर गल्लीत समर्थ प्लाझा या बिल्डींगच्या पहिल्या मजल्यावरील शॉप क्रं.५ लक्ष्मी सेल्स व शॉप क्रं.१२ चामुंडा टेलीकॉम या दुकानामध्ये मायक्रोमॅक्स मोबाईल कंपनीचे बनावट कव्हर, बॅटरी, हेडफोनची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सदर दुकानात गिऱ्हाईक म्हणून जाऊन छापा टाकला. यावेळी दुकानातील मायक्रोमॅक्स कंपनीच्या मोबाईलच्या बॅटऱ्या, फ्लिप कव्हर, प्लॅस्टीक कव्हर, हेडफोन, प्लॅस्टीक बॉडी असा एकूण १३ लाख २१ हजार ९६४ रुपये किमतीचा बनावट माल जप्त करण्यात आला. अधिक तपास पोलीस करत आहेत. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin