Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

न्युज -पुणे


पुणे मेट्रोच्या कामाला राष्ट्रीय हरित लवादाची स्थगिती


Main News

पुणे, दि. २ (पीसीबी) - महाराष्ट्र मेट्रो कार्पोरेशन कंपनी स्थापन होईपर्यंत नदीपात्रात मेट्रोचे कोणतेही काम करण्यास राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) स्थगिती दिली आहे. कंपनी स्थापन झाल्यावर याचिकेमध्ये कंपनीला प्रतिवादी करा, त्यांची बाजू ऐकल्यानंतरच पुढची सुनावणी होईल, असे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे न्यायमूर्ती यू. डी. साळवी आणि डॉ. अजय देशपांडे यांनी दिले.

मेट्रोच्या नदीपात्रातील प्रस्तावित मार्गामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे पर्यावरण अभ्यासकांनी एनजीटीकडे दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. 

पुण्यात मेट्रोची अंमलबजावणीची जबाबदारी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडे (महामेट्रो) असल्याने त्यांनाही प्रतिवादी केले जावे, अशी मागणी करण्यात आली. या कंपनीच्या स्थापनेची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे, तोपर्यंत नदीपात्रातील मेट्रोशी निगडित काम थांबवावे, असे आदेश एनजीटीने दिले.

कंपनीच्या अधिकृत नोंदणीनंतर याचिकेमध्ये त्यांनाही प्रतिवादी करून घ्यावे, त्यांची बाजू जाणून घेतल्यानंतर पुढील कार्यवाही होईल, असे एनजीटीने स्पष्ट केले असून, या प्रकरणी २५ जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे, अशी माहिती याचिकाकर्ते सारंग यादवाडकर आणि अॅड. असीम सरोदे यांनी दिली.

दरम्यान, मेट्रोच्या नियोजनाशी संबंधित कामांवर एनजीटीने कोणतेही बंधन घातलेले नाही. केवळ नदीपात्रातून जाणाऱ्या प्रस्तावित मेट्रोमार्गापुरते हे आदेश मर्यादित आहेत. मेट्रो मार्गांचे नियोजन, त्याची रचना-आरेखन किंवा इतर भागांत सुरू असणारे मृदा सर्वेक्षण (जिओ-टेक्निकल सर्व्हे) ही कामे पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin